एक्स्प्लोर

Sudhir Mungantiwar : लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार, सुधीर मुनगंटीवार नेमकं काय म्हणाले?

Sudhir Mungantiwar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.

Sudhir Mungantiwar on Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकांना मोठी आश्वासनं दिलं होती. महाविकास आघाडीने लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेऐवजी महालक्ष्मी योजना राबवत 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार, असं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, महाविकास आघाडीच्या या आश्वासना काऊंटर करण्यासाठी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली होती. आमचं सरकार आल्यानंतर लाडक्या बहि‍णींना देण्यात येणारा हप्ता 1500 वरुन 2100 करु , असं आश्वासन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलं होतं. दरम्यान, याबाबत आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी भाष्य केलं आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी आश्वासनांचा पाऊस पडला. मात्र, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. विशेष म्हणजे महायुतीने या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलाय. त्यामुळे आता महायुतीसमोर दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने 45000 हजार कोटींचे बजेट ठेवले होते. आता यामध्ये वाढ करावी लागणार आहे. 

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

असा कोणीही तर्क काढला नाही. मला मुलाखतीत विचारलं, 2100 रुपये कधी वाढणार. मी त्यांना म्हटलं, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. बजेटमध्ये वाढवायचं, रक्षाबंधनाला सुरु झाली, रक्षाबंधनाच्या दिवशीपासून वाढवायचा, हा निर्णय मंत्रिमंडळाचा असतो. पुढच्या वर्षात निश्चितपणे वाढेल, इतकीच प्रतिक्रिया मी दिली. पण काही लोकांनी त्याचा विपर्यास केला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले. लाडक्या बहीण योजनेचे 2100 रुपये करण्याचे आश्वासन भाजपच्या संकल्पपत्रात आहे. पैसे वाढवले नाहीत तर मी स्वत: पत्र लिहेन. मी आग्रह करेन, हे पैसे दिले पाहिजे. हा राजा हरिश्चंद्राचा देश आहे, रघुकल रीत सदा चले आये, प्राण जाये पर वचन न जाए, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

लाडक्या बहि‍णींना 3000 देण्यात यावे, अंबादास दानवे यांची मागणी 

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे म्हणाले, आमची मागणी आहे की, लाडकी बहीण योजनचे पैसे 3000  केले पाहिजेत. तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे. आधीतरी कमी आमदार होते. आता तुमचे त्यापेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत. 3000 रुपये लाडक्या बहीणींना दिले पाहिजेत. पुढची भाऊबीज वगैरे या सर्व गोष्टी खोट्या होतील, ही फसवणूक होईल. लोक म्हणतील हा निवडणुकीसाठी केलेला जुमला होता का? तुमच्या जाहीरनाम्यात 2100 रुपये होते, आमचं मत आहे की, 3000 रुपये द्यावेत.. नवे सरकार आल्यापासून लाडकी बहीणच्या पैशांमध्ये वाढ केली पाहिजे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Embed widget