एक्स्प्लोर

Solapur : सोलापुरात भाजपला फटका का बसला? प्रणिती शिंदेंच्या विजयाची वैशिष्ट्ये

Solapur Lok Sabha Election Results 2024 : सोलापुरात भाजपचा पराभव का झाला? सोलापूरच्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? काँग्रेसच्या विजयाची कारणे नेमकी कोणती ? याबाबत जाणून घेऊयात... 

Solapur, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघाला पहिल्या महिला उमेदवार मिळाल्या. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा 74197 मतांनी पराभव केला. मागील 10 वर्षांपासून सोलापुरात भाजपचा खासदार होता, पण यावेळी चित्र बदलले. सोलापूरकरांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या पदरात विजय टाकला. सोलापुरात भाजपचा पराभव का झाला? सोलापूरच्या निकालाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत? काँग्रेसच्या विजयाची कारणे नेमकी कोणती ? याबाबत जाणून घेऊयात... 

प्रणिती शिंदेंना कुठे आघाडी मिळाली ?

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी चार विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना आघाडी मिळाली. काँग्रेसला मताधिक्य मिळालेल्या पंढरपूर, दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार तर मोहोळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. स्वतः आमदार राहिलेल्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना केवळ 796 मतांचे मताधिक्य मिळाले. पण 2019 च्या निवडणुकीत भाजपला येथे आघाडी होती.  

वंचित फॅक्टर -

मागील निवडणुकीत 1 लाख 70 हजार मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडी फॅक्टर या निवडणुकीत चालला नाही. 2019 च्या निवडणुकीत वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी तब्बल दीड लाखांच्या आसपास मते मिळाली होती. प्रकाश आंबेडकर यांनी वचिंतकडून राहुल गायकवाड यांना रिंगणात उतरवले होतं. मात्र, गायकवाड यांनी ऐनवेळी माघार घेत काँग्रेसमध्येच प्रवेश केला. त्यामुळे वचिंतने अपक्ष उमेदवार अतिष बनसोड यांना पाठिंबा दिला. मात्र तरीही प्रकाश आंबेडकरांची जादू म्हणावी तितकी चालली नाही.

भाजपविरोधी वातावरण -  

मराठा आरक्षण, कांदा निर्यातबंदी, सोलापूरचा विकास, बेरोजगारी, मागील दोन खासदारांच्या बाबतीत असलेल्या निष्क्रियेतेचे आरोप या मुद्यावरून सोलापुरात  भाजपविरोधात वातावरण होते. हे मुद्दे काँग्रेसने उचलून धरले.

अल्पसंख्यांक मतदारमध्ये समान नागरी कायद्याची असलेली भीती आणि मागासवर्गीय समाजमध्ये  संविधान बचाव हा केला गेलेला प्रचार काँग्रेसला फायदा देणारा ठरला.  

सुशीलकुमार शिंदेंचा डाव -

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी बेरजेचे राजकारण केले. काँग्रेस सोडून गेलेल्यांना परत घेतले, विरोधात जाणाऱ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत त्यांना आपल्या बाजूने करण्यात यश मिळवले. लेकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांनी जिवाचे रान केले.  दिवसरात्र मेहनत घेतली.

हे मुद्देही ठरले महत्वाचे -

ग्रामीण भागातील मतदारांशी प्रणिती शिंदे यांनी केलेला थेट संपर्क फायद्याचे ठरले.  

स्वतःला सोलापूरची लेक म्हणून मतदारांना भावनिक साद तर राम सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच पत्र लिहून त्यांना ‘बाहेरचा उमेदवार’ असे ठरवले. 

भाजपच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यामध्ये समन्वयाचा अभाव जाणवला 

सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडल्याने कारखान्याच्या सभासदामध्ये असलेली नाराजीचा भाजपला मोठा फटका 

मोहोळ, पंढरपूर भागात जरांगे फॅक्टर मोठ्या प्रमाणात चालला, दोन विधानसभा मतदार संघात भाजपला तब्बल एक लाख मतांचा फटका बसला

प्रणिती शिंदेंचा राजकीय प्रवास?

आमदार प्रणिती शिंदेनी जाई-जुई विचारमंच या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याला सुरुवात केली. त्यानंतर 2009 साली सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या. तत्कालीन आमदार नरसय्या आडम यांचा पराभव देखील आमदार प्रणिती शिंदेनी केला. 2014, 2019 च्या मोदी लाटेत जिथे काँग्रेसच्या अनेक दिग्गजांचा निभाव लागला नाही. त्याही वेळी आमदार प्रणिती शिंदेनी विजयश्री खेचून आणला. सलग तीन वेळा आमदार राहिल्याने सोलापूर शहरात आमदार प्रणिती शिंदेची चांगली पकड आहे. तर प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी संधी देऊन प्रणितींना चांगलेच बळ देखील दिले आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget