एक्स्प्लोर
दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक बबन साळगावकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर
पाच महिन्यापूर्वी बबन साळगावकर यांनी शरद पवार यांची आंबोली इथे भेट घेतली होती.
सिंधुदुर्ग : शिवसेनेचे सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. बबन साळगावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारकीची ऑफर असल्याची चर्चा राजकीय गोटात रंगली आहे. येत्या काही दिवसातच बबन साळगावकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार साळगावकर यांच्या प्रवेशासाठी सावंतवाडीत येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
बबन साळगावकर हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. साळगावकर यांनी तीन वेळा सावंतवाडीचं नगराध्यक्षपद भूषवलं आहे. दीपक केसरकर यांचे खंदे समर्थक अशी बबन साळगावकर यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना पक्षात घेऊन आगामी काळात दीपक केसरकरांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीला साळगावकर यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाच महिन्यापूर्वी बबन साळगावकर यांनी शरद पवार यांची आंबोली इथे भेट घेतली होती. त्या भेटीनंतरच ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
भारत
भारत
क्राईम
Advertisement