एक्स्प्लोर

शिवसेना-भाजप युती झाली, तर मुंबईतील एकमेकांच्या 'या' विधानसभा मतदारसंघांवर डोळा

मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत भाजपचे तीन, तर शिवसेनेचे तीन खासदार आहेत. युती झाली, तर शिवसेनेच्या काही जागांवर भाजपचा, तर भाजपच्या काही जागांवर शिवसेनेचा डोळा आहे.

मुंबई : मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहे. मराठी भाषिक मतदारसंघात शिवसेनेसोबत भाजपचं प्राबल्य वाढताना 2014 मधील निवडणुकांमध्ये दिसलं. त्यामुळे युती झाली, तर शिवसेनेच्या काही जागांवर भाजपचा, तर भाजपच्या काही जागांवर शिवसेनेचा डोळा आहे. मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघांत भाजपचे तीन, तर शिवसेनेचे तीन खासदार आहेत. पण विधानसभा मतदारसंघामध्ये चित्र वेगळं आहे. दक्षिण मुंबईत शिवसेनेला फक्त दोन जागा जिंकता आल्या, तर भाजपलाही दोन जागांवर यश आलं होतं. त्यामुळे यंदा कुलाबा विधानसभा म्हणजे राज पुरोहितांच्या जागेवर शिवसेनेचा डोळा आहे. राज पुरोहित यांच्या विरोधात पांडुरंग सकपाळ यांना तयारीचे आदेश देण्यात आले आहेत. 1) कुलाबा - राज पुरोहित (भाजप)/ शिवसेनाचा दावा 2) मलबार हिल - मंगल प्रभात लोढा (भाजप) 1) वरळी - सुनिल शिंदे (शिवसेना)/ भाजपचा दावा 2) शिवडी - अजय चौधरी (शिवसेना)/ भाजपचा दावा दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे तीन आमदार आहेत तर भाजपचा एकच आमदार आहे. या भागात असलेल्या वडाळा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आमदार आहेत. सध्या शिवसेनेने इकडे जोरदार तयारी केली आहे. पण कोळंबकर भाजपच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कालिदास कोळंबकरांच्या विरोधात माजी महापौर श्रद्धा जाधव यांना तयारी करण्याचे आदेश शिवसेनेने दिले आहेत. 1) सायन कोळीवाडा - कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप) 1) माहिम - सदा सरवणकर (शिवसेना)/ भाजपचा दावा 2) चेंबुर - प्रकाश फातर्फेकर (शिवसेना) 3) अणुशक्तिनगर - तुकाराम काते  (शिवसेना) ईशान्य मुंबईत शिवसेनेचे दोनच आमदार आहेत. या भागात भाजपचे राम कदम आमदार आहेत. त्यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना या जागेवर आपला दावा करु शकते. तशी तयारी या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने सुरु केली आहे. राजा राऊत या विभागप्रमुखाला तयारी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत 1) मुलुंड - सरदार तारासिंह (भाजप) 2) घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप) / शिवसेनेचा दावा 1) विक्रोळी - सुनील राऊत (शिवसेना) 2) भांडुप पश्चिम - अशोक पाटील (शिवसेना) उत्तर मुंबई या भागातील सहा विधानसभांपैकी चार विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. या भागात मुख्यत्वे गुजराती, जैन आणि उत्तर भारतीय समाज मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे या भागात शिवसेनेला आपलं प्राबल्य मिळवायचं असेल तर एखादी जागा जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे दहिसरच्या जागेवर शिवसेना दावा करु शकते 1) मागाठाणे - प्रकाश सुर्वे (शिवसेना) 1) बोरिवली - विनोद तावडे (भाजप) 2) चारकोप - योगेश सागर (भाजप) 3) दहिसर - मनिषा चौधरी (भाजप) 4) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (भाजप) उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या खासदार पूनम महाजन असल्या, तरी तीन विधानसभेत शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे या भागात भाजप कुर्ल्याच्या जागेवर सध्या तयारी करत आहे. 1) कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिवसेना) 2) कलिना - संजय पोतनीस (शिवसेना) 3) वांद्रे पूर्व - तृप्ती सावंत (शिवसेना) 1) वांद्रे पश्चिम - आशिष शेलार (भाजप) 2) विलेपार्ले - पराग अळवणी (भाजप) उत्तर पश्चिम भागात शिवसेना आणि भाजपची ताकद समान आहे पण गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून सुभाष देसाईंचा पराभव करत भाजपच्या विद्या ठाकूर यांनी बाजी मारली होती. आता याच मतदारसंघातून खासदार गजानन कीर्तीकरांचे पुत्र अमोल कीर्तीकर यांना तयारीचे आदेश देण्यात आले आहेत. 1) अंधेरी पूर्व - रमेश लटके (शिवसेना) 2) जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर (शिवसेना) 3) दिंडोशी- सुनील प्रभू (शिवसेना) 1) वर्सोवा - भारती लवेकर (भाजप) 2) अंधेरी पश्चिम - अमित साटम (भाजप)/ शिवसेनाचा दावा 3) गोरेगाव - विद्या ठाकूर (भाजप) / शिवसेना दावा मुंबई विभाग : एकूण जागा 36 शिवसेनेचे एकूण आमदार - 14 भाजपचे एकूण आमदार - 15 भाजपचे आमदार कुलाबा- राज पुरोहित (भाजप)/ शिवसेनाचा दावा मलबार हिल - मंगल प्रभात लोढा (भाजप) घाटकोपर पूर्व - प्रकाश मेहता (भाजप) वांद्रे पश्चिम - आशिष शेलार(भाजप) घाटकोपर पश्चिम - राम कदम (भाजप) / शिवसेनेचा दावा बोरिवली - विनोद तावडे (भाजप) मुलुंड - सरदार तारासिंह (भाजप) चारकोप - योगेश सागर (भाजप) दहिसर - मनिषा चौधरी (भाजप) कांदिवली पूर्व - अतुल भातखळकर (भाजप) गोरेगाव - विद्या ठाकूर ( भाजप)/ शिवसेनेचा दावा वर्सोवा - भारती लवेकर (भाजप) अंधेरी पश्चिम - अमित साटम (भाजप)/ शिवसेनेचा दावा विलेपार्ले - पराग अळवणी (भाजप) सायन कोळीवाडा - कॅप्टन तमिळ सेलवन (भाजप) शिवसेनेचे आमदार चेंबूर - प्रकाश फातर्फेकर (शिवसेना) कुर्ला - मंगेश कुडाळकर (शिवसेना) कलिना - संजय पोतनीस (शिवसेना) अंधेरी पूर्व - रमेश लटके (शिवसेना) जोगेश्वरी पूर्व - रविंद्र वायकर (शिवसेना) वांद्रे पूर्व - तृप्ती सावंत (शिवसेना) दिंडोशी - सुनील प्रभू (शिवसेना) माहिम - सदा सरवणकर (शिवसेना)/ भाजपचा दावा वरळी - सुनिल शिंदे (शिवसेना)/ भाजपचा दावा शिवडी - अजय चौधरी (शिवसेना)/ भाजपचा दावा अणुशक्तिनगर - तुकाराम काते (शिवसेना) विक्रोळी - सुनील राऊत (शिवसेना) भांडुप पश्चिम - अशोक पाटील (शिवसेना) मागाठाणे - प्रकाश सुर्वे (शिवसेना)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget