एक्स्प्लोर

शिवसेना यूपीमध्ये पंचायत निवडणुका लढवणार, काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न

शिवसेनेचे उत्तर प्रदेश मधील प्रदेशाध्यक्ष अनिल सिंह म्हणाले की, पंचायत निवडणुकीसाठी जिल्हावार आढावा घेऊन पक्षाच्या वतीने प्रभारी नियुक्त केले जात आहेत.

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या पंचायत निवडणुकीत आम आदमी पार्टी (आप) आणि अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षानंतर आता शिवसेनाही आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सेमीफायनल मानल्या जाणार्‍या पंचायत निवडणुका मार्च-एप्रिलमध्ये होणार आहेत. यासाठी अनेक राजकीय पक्ष तयारीमध्ये गुंतले आहेत.

शिवसेनेचे उत्तर प्रदेश प्रदेश प्रमुख अनिल सिंह म्हणाले की, पंचायत निवडणुकीसाठी जिल्हावार आढावा घेऊन पक्षाच्या वतीने प्रभारी नियुक्त केला जात आहे. सर्व जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देणार आहे.

निवडणूक व्यवस्थापनाची माहिती जाणून घेण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात येणार आहे. हे लोक सुमारे एक आठवडा मुक्काम करतील. शिवसेना बीएमसी व ग्रामीण भागात कशी कार्यरत आहे, हे शिकवण्यात येणार आहे. तेथून परत आल्यानंतर पूर्वांचल, पश्चिम बंडल विभागात प्रशिक्षण होईल. यानंतर उमेदवारांची निवड करुन त्यांना मैदानात उतरवले जाईल. दरम्यान, काँग्रेसशी चर्चा झाल्यास त्यांच्याशी युती केली जाणार असल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेसशी वाटाघाटी सुरु - अनिल सिंह

अनिल सिंह म्हणाले की, आमचे संघटन संपूर्ण राज्यात चांगलं काम करीत आहे. मागील निवडणुकीत 16 जिल्हा पंचायत सदस्य आणि 150 हून अधिक प्रधान निवडले गेले होते. काँग्रेससोबत युती करुन पंचायत निवडणुका लढवण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार अरविंद सावंत 16 जानेवारीला राज्यात येणार आहे. त्यांच्यासमवेत बैठक आयोजित केली जाईल. महाराष्ट्रात आमची युती आहे. येथे देखील असू शकते. त्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. उर्वरित बैठकीत निर्णय होईल.

संबंधित बातमी : 

'शेण खाऊन नाचण्याचा अधिकार तुम्हाला कोणत्या घटनेने दिला?', 'सामना'तून भाजपवर जहरी टीका

Atul Bhatkhalkar | 'सामना'च्या अग्रलेखातून भाजप नेत्यांवर टीका; आमदार अतुल भातखळकर यांचं उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget