एक्स्प्लोर

EVM शिवाय भाजप ग्रामपंचायत निवडणुकाही जिंकू शकत नाही - संजय राऊत

उत्तर प्रदेशमध्ये 300 ईव्हीएम (EVM) मशीन एका दुकानात मिळाल्या आहेत, आसाममध्ये एका कारमधून 400 मशिनी मिळाल्या आहेत. ईव्हीएम बनवणारी सरकारी कंपनीमधील चार डायरेक्टर भाजपचे (BJP) आहेत.

Sanjay Raut :  शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  उत्तर प्रदेशमध्ये 300 ईव्हीएम (EVM) मशीन एका दुकानात मिळाल्या आहेत, आसाममध्ये एका कारमधून 400 मशिनी मिळाल्या आहेत. ईव्हीएम बनवणारी सरकारी कंपनीमधील चार डायरेक्टर भाजपचे (BJP) आहेत. ईव्हीएममध्ये लावलेला सिक्रेट कोड देखील त्याच कंपनीत बनतो, या कंपनीतील डायरेक्टर जास्त गुजरातमधून आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.  या देशात भाजप पक्ष निवडणुकीच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने कोणत्याही निवडणुका जिंकू शकत नाहीत ईव्हीएम हटी भाजप गयी, ईव्हीएम है तो मोदी है, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊतांनी केला.

2024 मध्ये निवडणुका ज्या पद्धतीने लढवल्या जाण्याची तयारी आहे, त्यात दोन पॅर्टन आणि दोन फॉर्मुले आहेत. एक मनसुख भाई फॉर्मुला जे ईव्हीएमचे डायरेक्टर बनले आणि दुसरा चंदीगड फार्मूला. 'आप'ने आणि काँग्रेसने निवडणुका जिंकले आहेत पण भाजप मानायला तयार नाही मतपत्रिकांचं अपहरण केलं गेलं, असाही आरोप संजय राऊतांनी केला. 

हेमन सोरेन, केजरीवाल झुकायला तयार नाहीत -

मुख्यमंत्री हेमन सोरेन झुकायला तयार नाहीत, नितीश कुमार यांच्यासारखं पलटी मारायला तयार नाहीत. हेमन सोरेन आणि केजरीवाल पलटूराम बनायला तयार नाहीत, त्याची किंमत ते चुकवत आहेत,  इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले. 

चंदीगड महापौर निवडणूक - 

चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचं पूर्ण बहुमत असताना आणि मतदान हे काँग्रेस आणि आपचे 20, भाजपचे 14 नगरसेवक आहेत. मतदान हे काँग्रेस आणि आमच्या बाजूने झाले असताना तरीही त्या पिठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीने आठ मतं बाद करून टाकली. ज्या पद्धतीने राहुल नार्वेकरांनी आमचे आमदार अपात्र ठरवले, तोच फॉर्मुला आणि त्याच पॅटर्नने आठ मतं बाद केली, असे राऊत म्हणाले. 

आम्ही आत्तापर्यंत रामायणामध्ये सितेचं अपहरण रावणाने केलं हे वाचून आणि ऐकून होतो. पण चंदीगडमध्ये लोकशाहीरूपी पवित्र सितेचं अपहरण कथाकथित राम भक्तांनीच केलं हे देशाने पहिलं. हेच चंडीगड पर्यटन 2024 मध्ये भाजप अशाप्रकारे वापरणार आहे. भाजप पक्ष हा डरपोक पक्ष आहे, ते लोकांसमोर जाऊ शकत नाहीत, ईव्हीएमशिवाय ते ग्रामपंचायत निवडणुका जिंकू शकत नाहीत, असा हल्लाबोल यावेळी संजय राऊतांनी केला.

ईडी कारवाईवर काय म्हणाले ?

काल किशोरीताई पेडणेकर संदीप राऊत यांचे चौकशी झाली पण महानगरपालिकेत ज्यांनी खऱ्या अर्थाने घोटाळे केले आहेत ते भारतीय जनता पक्षात आहेत किंवा शिंदे गटात सामील झालेले आहेत.  खिचडीची कामं ज्यांना मिळाली त्यांची यादी जाहीर करा, त्यातली किती लोक त्या गटांमध्ये गेली आहेत? ते जाहीर करा, लुटीचा पैसा घेऊन संरक्षणासाठी पळालेली ही लोक आहेत.  त्यांनी पत्रकार परिषद घेऊ द्या सर्वांचं वस्त्रहरण करतो, असे संजय राऊत म्हणाले.

मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका -

पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात वारंवार यावं लागेल, कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला  आणि त्यांची जी काही कथाकथित महायुती आहे लोकसभेच्या चार जागा ही ते जिंकू शकत नाही. म्हणून मोदींना वारंवार या ठिकाणी प्रचारासाठी यावं लागतंय. मोदी विकास कामांच्या उद्घाटनासाठी नाही तर प्रचारासाठी येत असतात त्यांना प्रचार करु द्या, असे संजय राऊत म्हणाले. 

आणखी वाचा :

 MLA Anil Babar Passed Away : सरपंच ते 4 वेळा आमदार, एकनाथ शिंदेंना बंडावेळी साथ, 'पाणीदार' आमदार अनिल बाबर

महत्त्वाच्या बातम्या

Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Rishabh Pant News : 3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
3 वर्षांपासून इकडेतिकडे भटकतोय... ऋषभ पंत भावूक, मध्यरात्री 1 वाजता मुख्यमंत्र्यांना मागितली मदत, नेमकं प्रकरण काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तैनात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; नेमकं घडलं काय?
Embed widget