एक्स्प्लोर

Ajit Pawar: "तू आमदार कसा होतो तेच बघतो"; अजित पवारांनी खुल आव्हान दिलेला पुण्यातला तो नेता हारला की जिंकला?

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षातील एका बड्या नेत्याला तू आमदार कसा होते ते मी पाहतो, असं आव्हान दिलं होतं. त्या आमदारांचं निवडणुकीत काय झालं?

पुणे: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेली विधानसभा निवडणुकीची धामधूम काल अखेर कमी झाली. आता सत्ता स्थापनेकडे आणि मुख्यमंत्रीपदाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्यात महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं, तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. या दरम्यान असे काही महत्त्वाचे मतदासंघ होते त्याकडे लक्ष वेधलं गेलं होतं. दरम्यान लोकसभा निवडणुकीचा वचपा महायुतीने विधानसभेला काढल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षातील एका बड्या नेत्याला तू आमदार कसा होते ते मी पाहतो, असं आव्हान दिलं होतं. त्या आमदारांचं निवडणुकीत काय झालं यावर आता चर्चा सुरू झाल्या आहेत. 

कोण आहे तो नेता?

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते अशोक पवार यांना भरसभेत खुलं आव्हान दिलं होतं. त्यांना तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अशा शब्दात खुलं आव्हान दिलं होतं. या विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवारांनी अशोक पवार यांना शिरुरमधून उमेदवारी दिली होती. तर त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ज्ञानेश्वर कटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं. 

शिरूर मतदारसंघातून अजित पवारांच्या उमेदवाराने दणदणीत विजय मिळवला आहे, ज्ञानेश्वर कटके यांना 192281 इतकी मतं मिळाली आहेत. तर अशोक पवारांना (Ashok Pawar) 117731 इतकी मते मिळाली आहे. 74550 मतांच्या फरकाने अजित पवारांचा उमेदवार निवडून आला आहे. त्यामुळे अजित पवारांनी दिलेलं आव्हान पूर्ण केल्याच्या चर्चा अजित पवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांनी सुरू आहेत.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांना खुलं आव्हान दिलं होतं. "आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?",असं अजित पवारांनी आव्हान दिलं होतं.

"दिलीप वळसेंचा शपथविधी झाला आणि यांची (अशोक पवार यांची) सटकली. ते म्हणाले, दादांनी दिलीप वळसे पाटलांना मंत्रिमंडळात घ्यायला नको होतं. दादा एकटे जिल्ह्यातून गेले असते तरी आमची कामं झाली असती. त्यांच्या डाव्या आणि उजव्या हाताला कोण आमदार बसले होते. त्यांच्या कानात यांनी (अशोक पवार यांनी) असं सांगितलं." 

"आता अशोक पवार काय म्हणत होते ते मला त्या आमदारानं सांगितलं. त्यानंतर ते (अशोक पवार) तिकडे (शरद पवार गटात) गेले. त्यांना पवार साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्याकरता त्यांनी कारखान्याची वाट लावली आणि मंत्री व्हायला निघाले. आरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय? अजित पवारांनी एकदा मनावर घेतलं तर मी आमदार होऊ देत नाही. आता मी पण चॅलेंज देतो तु आमदारच कसा होतो ते बघतो. मी लोकांना सांगेन की यांची खरी औकात काय आहे", असं आव्हान लोकसभेच्यावेळी  भर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Embed widget