एक्स्प्लोर
'माझ्या वयाबद्दल बोलू नका, मी तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे', वयाचा उल्लेख करणाऱ्या नेत्याची पवारांनी घेतली फिरकी
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांनी पवारांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर पवारांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली.

वाडेगाव (अकोला) : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या वयाचा उल्लेख करणाऱ्या नेत्यांची चांगलीच फिरकी घेताना दिसत आहेत. आज वाडेगाव येथे आयोजित सभेत देखील त्यांनी "अभी तो मै जवान हू" असं म्हणत 'सर्वांना घरी पाठवूनच, मग मी घरी जाणार' असं म्हणत चौफेर फटकेबाजी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील वाडेगाव येथे आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांनी पवारांच्या वयाचा उल्लेख केल्यानंतर पवारांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे. 'अभी तो मै जवान हू. सर्वांना घरी पाठवूनच, मग मी घरी जाणार. माझ्या वयाबद्दल बोलू नका, मी तुमच्या पक्षाचा अध्यक्ष आहे, असं पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार राज्यभरात ठिकठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी देखील शरद पवारांनी राज्यात दौरा केला होता. त्यावेळी या वयात देखील शरद पवार राज्यभर फिरत असल्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं होतं. अभी तो मैं जवान हूं, शरद पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा
आणखी वाचा




















