एक्स्प्लोर

शरद पवार यांची माढा मतदारसंघातून माघार

माढामधून निवडणूक लढवण्याचा सगळ्यांचा आग्रह होता, परंतु पक्षातर्फे माझी उमेदवारी जाहीर झालेली नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्याचं जाहीर केलं आहे. "मी माढ्यातून निवडणूक लढवावी असा सगळ्यांचा आग्रह आहे. मात्र पक्षाने अद्याप माझी उमेदवारी जाहीर केलेली नाही. आम्ही कुटुंबात बसून चर्चा केली. मी स्वत: उभं न राहता नव्या पिढीला संधी द्यायचं ठरवलं आहे," असं शरद पवार यांनी सांगितलं. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. तसंच माढा लोकसभा मतदारसंघातील नेत्यांना आम्ही एकत्र केलं. दोन दिवसांत माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार कोण असेल याबाबत निर्णय घेऊ, असं पवारांनी स्पष्ट केलं. विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाची चर्चा माढ्यातील राष्ट्रवादी काँग्रेच्या उमेदवारीवरुन आज पुन्हा खल झालं. माढ्यातून शरद पवार यांच्याऐवजी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नावावर चर्चा रंगली होती. विजयसिंह मोहिते-पाटलांना डावलल्यामुळे माढा लोकसभेतल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं होतं. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात माढ्याबाबत पुनर्विचार सुरु असल्याची चर्चा होती. या जागेबाबत पुण्यातल्या बारामती हॉस्टेलमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची शरद पवारांसोबत बैठकही पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी उमेदवारी मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मी आतापर्यंत चौदा निवडणुका लढलोय. कधीही अपयश न घेणारा. तुमच्यापैकी काहींनी बातमी चालवली की मी माघार घेतली. चौदा निवडणुकांमधे मी माघार घेतलेली नाही, असं शरद पवार यांनी नमूद केलं. पार्थला संधी द्यायचं ठरवलं तसंच मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनही होत आहे. त्यामुळे एका घरातील किती उमेदवार द्यायचे असा प्रश्न होता. त्यामुळे मी पार्थला संधी द्यायचं ठरवलं. नगरची जागा राष्ट्रवादीचीच अहमदनगरच्या जागेवरुन सुजय विखे पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. याविषयी विचारलं असता शरद पवार म्हणाले की, "अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघातील सहापैकी दोन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. ही जागा आम्ही जिंकू शकतो. आम्हीच या मतदारसंघातून बाळासाहेब विखे-पाटील यांचा पराभव केला होता. सुजय विखे-पाटील भाजपमध्ये जातील असं वाटतं नाही. त्यांच्या कॉंग्रेस निष्ठेबद्दल माझ्या मनात शंका नाही." 'मी राज ठाकरेंना पढवलं, ठीक आहे' हल्ली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीतून येते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला होता. याबाबत शरद पवार म्हणाले की, "राज ठाकरेंना मी भेटलो. पण आघाडीत या असं मी त्यांना कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्री म्हणाले की राज ठाकरेंना मी पढवलं. ठीक आहे. बारामतीची परंपरा आहे. मोरोपंत बारामतीचे होते, पेशवे काळात. शरद पवारांसमोर राडा करणारे शेखर गोरे काय म्हणतात?

शरद पवार माढ्यातून फायनल, बैठकीत शिक्कामोर्तब

शरद पवारांची पत्रकार परिषद

पत्रकार परिषेदेतील महत्त्वाचे मुद्दे : सुप्रिया सुळे बारामतीमधून लढणार आहे, पार्थ पवार यांनी लोकसभा लढवावी अशी मागणी होत आहे त्यामुळे एकाच घरातील तिघांनी निवडणूक लढवणं योग्य ठरणार नाही आमची यादी तयार आहे. आम्ही काँग्रेसच्या निर्णयाची वाट पाहतो आहे. यावेळी आम्हाला अनुकूल अशी परिस्थिती आहे नव्या पिढीला प्रोत्साहित करावं अहमदनगर राष्ट्रवादी पक्ष चांगल्या स्थितीत असताना ती जागा काँग्रेसला सोडण्याचं कारण नाही बाळासाहेब विखेंचा पराभव आम्हीच केला होता. त्यामुळे ही जागा आम्ही जिंकू शकतो. हा विश्वास आहे. सुजय विखे आघाडीत नव्हते, त्यांचं काही योगदान आघाडीत नव्हतं वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याच्या चर्चेत मी कधीच नव्हतो पुण्यात मी एकही नाव दिलेलं नाही पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादीचं संख्याबळ अधिक असतानाही पुण्याची जागा आम्ही मागितली नाही. पुणे जिल्ह्यातील चार पैकी तीन जागा राष्ट्रवादीकडं आहे. सगळ्या जागा मागणं योग्य नाही

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Railway Bonus :रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्र सरकारकडून बोनस जाहीर, प्रत्येक कर्मचाऱ्याला किती रुपये मिळणार?
Smriti Irani On Rahul Gandhi : 'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
'अमेठीत एकट्याने लढायची धमक नाही अन्...' स्मृती इराणींचा राहुल गांधींवर बोचरा वार
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Embed widget