Sharad Pawar: मोठी बातमी: घर कुणी फोडलं?; शरद पवारांचं अजितदादांना जशास तसं उत्तर, सभा गाजवली, Video
Sharad Pawar On Ajit Pawar: पक्ष-चिन्ह दोन्ही गेलं. आम्हाला नवीन चिन्ह दिलं. लोकांना विनंती केली आमचे उमेदवार निवडून द्या, असं शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar On Ajit Pawar: आम्ही सत्ता लोकांसाठी वापरली. आम्ही रोजगार दिले. बारामतीत मलिदा गँग शब्द आहे. आम्ही ही गँग कधी वाढू दिली नाही, असं शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. मला बारमतीकरांनी आजपर्यंत खूप साथ दिली. मला दिली, अजित पवारांना (Ajit Pawar) दिली, सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढला, तेव्हाही तुम्ही मला साथ दिली. अनेकांना निवडून दिलं, असं शरद पवारांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रवादी पक्ष कुणी काढला?, पक्ष मी काढला. काही लोकांनी आमच्यावर खटला केला. कधी मी कोर्टात उभा राहिलो नाही. काहींनी दावा केला की हा पक्ष त्यांचा नाही आमचा आहे. समन्स काढलं. कोर्टात माझ्या नावाने समन्स काढले. समन्स कधी पाहिल नव्हतं. निकाल दिला, पक्ष चिन्ह दुसऱ्याचे शरद पवारांचा काही संबंध नाही, असं म्हणाले. त्यानंतर पक्ष-चिन्ह दोन्ही गेलं. आम्हाला नवीन चिन्ह दिलं. लोकांना विनंती केली आमचे उमेदवार निवडून द्या, असं शरद पवार म्हणाले.
निवडणुकीत नव्या पिढीला निवडून द्या- शरद पवार
मी चार महिन्यात अनेक तालुके उलटे पालटे केले. कारण मला सत्ता बदलायची आहे. जनाई शिरसाई योजना कुणी आणली.. गेली अनेक वर्षे पाटबंधारे खाते कुणाकडे होते? मग का झालं नाही?, असा सवालही शरद पवारांनी उपस्थित केला. या निवडणुकीत नव्या पिढीला निवडून द्या. नेहमी नवीन नेतृत्व तयार करायचा असते, म्हणून आम्ही युगेंद्रचा निर्णय घेतला आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले.
घर मोडणे माझा स्वभाव नाही- शरद पवार
मी मार्गदर्शन करायची जबाबदारी घेतली आणि नवी पिढ्याच्या हातात अधिकार दिला. सत्ता नाही, म्हणून सहकारी आहेत त्यांची साथ सोडली. आमच्या काही लोकांनी उद्योग केला आणि शपथ घेतली पहाटे शपथ घेतली राज्यपाल यांना उठवले, कशासाठी?, असा मिश्किल टोलाही शरद पवारांनी अजित पवारांना लगावला. अनेक पद दिली, अनेकांना मंत्री केलं. सुप्रियाला एक पद दिले का? तिनेही कधी मागितले नाही. घर एक ठेवण्याचे काम केलं. चार महिन्यांनी पद मिळाले असते. पद मिळाले नाही म्हणून घर मोडायचे असतं का?, घर मोडणे माझा स्वभाव नाही. कुटुंब एक राहिले पाहिजे ही माझी भूमिका, असंही शरद पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.