एक्स्प्लोर

Sharad Pawar : जो गद्दारी करतो त्याला शिक्षा द्यायची असते, गद्दारांना सुट्टी नाही, या निवडणुकीत वळसे पाटलांना 100 टक्के पराभूत करा, शरद पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar : शरद पवार यांनी आंबेगावातील सभेत दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केल्याचं म्हटलं. गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, असा हल्लाबोल देखील त्यांनी केला.

पुणे (आंबेगाव) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंबेगावमध्ये देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत शरद पवारांनी दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावर हल्लाबोल केला. दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केलीय,  जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, या निवडणुकीत वळसे पाटलांना 100 टक्के पराभूत करा, अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी देवदत्त निकम यांना विजयी करण्याचं आवाहन करत हल्लाबोल केला. 

दिलीप वळसे पाटलांना जे शक्य असेल ते दिलं...

आंबेगाव तालुक्याचं अन माझं एक अतूट नातं आहे. अगदी दिलीप वळसेंना इथून मी संधी देण्याआधी पासून माझं या तालुक्याशी संबंध येत गेलाय. दिलीप वळसेंना मी संधी दिली, ते आमदार झाले याचा मला आनंद होता. पुढं मी त्यांना मंत्री केलं. विविध पदं दिली. विश्वास ठेवला, संधी दिली. जे जे शक्य होतं, ते दिलं, असं शरद पवार म्हणाले. 

दिलीप वळसे पाटलांनी गद्दारी केलीय, गद्दारांना सुट्टी नाही : शरद पवार

शरद पवार यांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले  ज्यांना मी पद दिली, शक्ती दिली, अधिकार दिला, सन्मान दिला यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत. मंत्रिमंडळात ते गेल्यानं जनतेला हे आवडलेलं नाही. आज म्हणतात आमचे आणि पवार साहेबांचे संबंध अतिशय सलोख्याचे आहेत, असं अजिबात नसल्याचं शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना उद्देशून म्हटलं. 

शरद पवार पुढे म्हणाले, माझी पत्नी वर्षातून एकदा भीमाशंकरला जाते, आता अलीकडे ही ती भीमाशंकरला जाऊन आली. मी विचारलं नेहमी सारखी व्यवस्था होती का? त्या म्हणाल्या यावेळी दिलीप वळसेंच्या घरी गेलीच नाही, थेट भीमाशंकर दर्शन घेऊन परतले.

ते म्हणतात साहेब माझ्याबद्दल काही बोलणार नाहीत, आता यांनी बोलायला काय ठेवलं आहे का? त्यांनी एकचं गोष्ट ठेवली, दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली, त्यांना शिक्षा द्यायची असते. गद्दारांना सुट्टी द्यायची नसते. साडे तीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजेंसोबत गणोजी शिर्केंनी गद्दारी केली होती. ती गद्दारी महाराष्ट्र विसरलेला नाही.  त्यामुळं आता आपल्यासोबत ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही. वळसे पाटलांचा मोठ्या फरकाने पराभव करा आणि देवदत्त निकमांना आमदार बनवा, असं शरद पवार म्हणाले. 

इतर बातम्या : 

शरद पवारांचा व्हिडीओ पोस्ट करणं भोवलं, अजित पवारांची सुनावणीत अडचण, अमोल मिटकरींनी थेट सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, पोस्टही डिलीट

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget