एक्स्प्लोर

संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही, सत्यजित तांबेंचा आदित्य ठाकरेंना सल्ला

युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना 'संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही' असा सल्ला दिला आहे. तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहित राजकारणातील 'संधी'संदर्भात स्वानुभव कथन करत आदित्य यांना सल्ला दिला आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेला जरी जागा कमी मिळाल्या असल्या तरी ताकत मात्र वाढलेली आहे. भाजपला स्पष्ट बहुमतापासून बरंच दूर राहावं लागत असल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली असून शिवसेनेच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवावं अशी मागणी सुरु केली आहे. यात आता काँग्रेसकडून देखील आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रह केला जाऊ लागला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आदित्य ठाकरे यांना 'संधी दवडू नका, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही' असा सल्ला दिला आहे. तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहित राजकारणातील 'संधी'संदर्भात स्वानुभव कथन करत आदित्य यांना सल्ला दिला आहे. फेसबुक पोस्टमध्ये तांबे यांनी म्हटलं आहे की, 2007 सालची गोष्ट आहे. माझेही वय 24 चं होते. अहमदनगर जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत मी काँग्रेसचा जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आलो होतो. जिल्हा परिषदेत कॉंग्रेसचे बहुमत झाले होते. बहुतांशी सदस्यांची इच्छा मी 'अध्यक्ष' व्हावा ही होती. मात्र जिल्ह्यातील काही नेत्यांना कुणाला तरी दुसऱ्यांना अध्यक्ष करायचे होते. बऱ्याच ओढाताणी नंतर सव्वा- सव्वा वर्षे अध्यक्षपद वाटण्याचे ठरले. मी पहिले सव्वा वर्ष मागितले, मात्र सर्वजण मी लहान असल्याने दुसऱ्या सदस्याला पहिले अध्यक्ष करण्याच्या मनस्थितीत होते. सर्वांचे म्हणणे होते, 'सत्यजीतला, थोडा अनुभव मिळेल व तो सव्वा वर्षांने चांगले काम करेल'. पुढे सर्व जिल्हा मला 'भावी अध्यक्ष' म्हणून लागला. बोलता बोलता सव्वा वर्ष संपलं, ज्यांना अध्यक्ष केलं होतं त्या काही केल्या राजीनामा घ्यायला तयार नाही झाल्या, असे तांबे यांनी म्हटले आहे. पुढे अडीच वर्षाने पुन्हा जिल्हापरिषद अध्यक्षाची निवडणूक झाली. पुन्हा काँग्रेस पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली, पुन्हा काहीतरी कारण सांगून त्याच विद्यमान अध्यक्षांनी सेना-भाजपच्या मदतीने माझा पराभव केला,  अशा शब्दात तांबे यांनी आपला अनुभव सांगितला आहे. हे सर्व सांगण्याचा खटाटोप ह्यासाठी की, राजकारणात आलेली वेळ परत येत नाही. संधीही पुन्हा दरवाजा ठोठावेलंच याची खात्री नाही. म्हणून एक मित्र म्हणून एवढाच सल्ला आहे, जे मिळवायचे आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका. लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका, एवढीच विनंती, असा सल्ला शेवटी तांबे यांनी आदित्य ठाकरेंना दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Embed widget