एक्स्प्लोर

Sada Sarvankar Vs Amit Thackeray: माहीममध्ये सदा सरवणकरांच्या माघारीसाठी जोरदार प्रयत्न, वर्षा बंगल्यावर रात्री गुप्त खलबतं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे Vs सदा सरवणकर Vs महेश सावंत असा तिहेरी सामना रंगण्याचा शक्यता आहे.

मुंबई: माहीम मतदारसंघात राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा मार्ग निर्धोक करण्यासाठी महायुतीच्या गोटात जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी गुरुवारी रात्री शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर महायुतीचे नेते बंडखोरांची समजूत काढण्याच्या कामाला लागले होते. 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी सदा सरवणकर यांची समजूत काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

राज ठाकरे यांनी लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे माहीममध्ये अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये, असे महायुतीमधील अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. आशिष शेलार, नितेश राणे, दीपक केसरकर यांनी अमित ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, सदा सरवणकर हे आपल्या हक्काचा मतदारसंघ सोडायला तयार नाही. चर्चा करायची वेळ आता निघून गेली, मी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी घेतली होती. मात्र, सदा सरवणकर यांच्याशी सतत चर्चा करुन माहीममधून माघार घ्यावी, यासाठी अजूनही जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे आता सदा सरवणकर हे खरोखरच माहीम मतदारसंघावरचा दावा सोडणार का, हे पाहावे लागेल. तसे करताना कोणती राजकीय तडजोड होणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांचा राज ठाकरेंना शह?

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी काळात भाजपचा मुख्यमंत्री होतील, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी आता राज ठाकरे यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचे सूत्रांकडून सांगितले जाते. माहीममध्ये सदा सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, आनंद मोठा आहे. प्रत्येक पक्षाला कार्यकर्त्यांच्या भावना जपण्याची गरज असते. सदा सरवणकर यांच्या उमेदवारीचा निर्णय मी कार्यकर्त्यांच्या मनावर सोडला आहे, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे हे माहीमची जागा अमित ठाकरे यांच्यासाठी सोडण्यास फारसे उत्सुक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आणखी वाचा

अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघच का निवडला?; समजून घ्या, यामागचं 'राज'कीय गणित!

महायुतीकडून सदा सरवणकर यांना मोठी ऑफर, अर्ज माघारी घेणार?; राजकीय वर्तुळात खळबळ

महत्त्वाच्या बातम्या

Smita Jadhav: तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
तरुणांचे स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट आणि तरुणांसाठी काम करण्याची संधी मला मिळेल; स्मिता जाधवांनी व्यक्त केला विश्वास
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
Someshwar Sugar Factory Election: ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑक्टोबर 2026 | सोमवार
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटी परिसरात मोठी आग; अग्निशमनच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
संभाजीनगर पदवीधरची लढाई ठरली; ठाकरेंकडून दिलीप घुगे अन् राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आमनेसामने, राजकीय खलबतं
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
तुकाराम मुंढेंचं FDA दिवाळीपूर्वी अ‍ॅक्शन मोडवर; अकोल्यात 1900 किलो मिठाईचा साठा जप्त, परवानेही निलंबित
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं MPSC च्या अध्यक्षांसंदर्भात मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
देवेंद्र फडणवीस यांचं MPSC चे अध्यक्ष, सदस्यांविरोधातील कारवाईसाठी मोठं पाऊल, राज्यपालांना समिती स्थापन करण्याची विनंती
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
मंगेश चिवटे, सानप पुढे मला पाठिंबा देतील, भाजप उमेदवाराला विश्वास; पुणे शिक्षक मतदारसंघात मोठ्या घडामोडी
Supreme Court Form 6 : 'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
'फॉर्म 6' मधील बदलाला सुप्रीम कोर्टाची मान्यता नाही, ECI च्या दाव्यावर CJI सूर्यकांत यांनी ठणकावले, काय आहे वाद?
SDCCB Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत चुरस; 21 जागांसाठी 236 अर्ज..चार मंत्री, दोन खासदार, दोन आमदारांसह अनेक दिग्गज नेते मैदानात..
सातारा जिल्हा बँकेत शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली भाजपची तयारी; जयकुमार गोरे बाजूला? चर्चांना उधाण
Embed widget