एक्स्प्लोर

दारू प्यायची इच्छा झाली तर भाजपवाल्यांनी पाठवलेली दारू प्या, पण मत काँग्रेसलाच द्या; काँग्रेसच्या बंटी शेळकेंचे वादग्रस्त वक्तव्य

Central Nagpur Assembly Constituency : भाजपवाले भ्रष्टाचाराच्या पैशाने निवडणूक लढवत आहेत, त्यांनी पैसे दिले तर घ्या पण मत काँग्रेसलाच द्या असं वक्तव्य काँग्रेसचे नागपूर मध्यचे उमेदवार बंटी शेळके यांनी केलं. 

नागपूर : जर तुमची दारू प्यायची इच्छा झाली तर भाजपवाल्यांनी तुमच्या घरी पाठवलेली दारू घ्या, मात्र मत काँग्रेसला द्या असा वादग्रस्त सल्ला नागपूर मध्यचे  काँग्रेस उमेदवार ऋषीकेश उर्फ बंटी शेळके यांनी केलं. नागपुरात शेकडो मतदारांच्या उपस्थितीत काँग्रेस उमेदवाराने असा वादग्रस्त सल्ला दिला आहे.  त्यावर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहावं लागेल. 

रविवारी मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रात बंटी शेळके यांच्यासाठी प्रियंका गांधी यांनी रोड शो केले. प्रियंका गांधी त्या ठिकाणी पोहोचण्यापूर्वी बंटी शेळके यांनी रोड शोसाठी आलेल्या शेकडो काँग्रेस कार्यकर्ते आणि मतदारांसमोर भाषण केले.  त्यावेळी बोलताना बंटी शेळके म्हणाले की, भाजप पक्ष भ्रष्टाचाराचे पैशातून ही निवडणूक लढवत आहे. त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यामुळे ते तुमच्या घरी आमिष म्हणून दारू घेऊन आले आणि तुमची ती पिण्याची इच्छा झाली, तर ती दारू तुम्ही घेऊन घ्या. जर भाजपवाले त्यांच्या भ्रष्टाचाराचा पैसा घेऊन तुमच्या घरी आले, तर तुम्ही तेही ठेऊन घ्या. मात्र मत काँग्रेसला द्या.

माझ्याकडे लोकांना वाटण्यासाठी पैसा नाही. मी दुचाकीवर फिरणारा नेता आहे आणि भविष्यातही दुचाकीवालाच राहीन असं ही बंटी शेळके या भाषणात म्हणाले.

काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके काय म्हणाले? 

मी दारू पीत नाही. दारू पिणे चुकीचे आहे. लिव्हर खराब होते.मात्र भाजपवाले पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत. पाचशे कोटींची निवडणूक ते लढवत आहेत. ते मतदारांना सोन्याचे दागिने देत आहेत. भाजपवाले तुमच्या घरी दारू देण्यासाठी आले आणि जर तुमची दारू प्यायची इच्छा झाली तर तुम्ही ती दारू घ्या. मात्र, त्यानंतरही मत काँग्रेसला द्या.

मी तर पैसा वाटू शकत नाही. मात्र त्यांच्याकडे भ्रष्ट मार्गाचा खूप पैसा आहे. जर तुमची इच्छा त्यांच्याकडून तो पैसा घेण्याची झाली तर तेही घेऊन घ्या. मात्र मत काँग्रेसला द्या. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई आहे. आमच्याकडे पैसा नाही. माझं घर आजही कच्चं आहे. माझ्याकडे दुचाकी आहे. नगरसेवक असूनही माझ्याकडे दुचाकीच राहिली आहे. मी आजही दुचाकीवर आहे आणि उद्याही दुचाकी वरच राहणार.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...Uddhav Thackeray BKC Speech | अमित शाह डोक्याला तेल लावा, बुद्धी वाढेल, उद्धव ठाकरेंचा भाजपवर वारSpecial Report Baramati Vidhan Sabha : बारामतीत पवारांमध्ये शाब्दिक-इमोशनल युद्ध, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Manipur Violence : मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
मणिपुरात पुन्हा रक्तपात, मुख्यमंत्र्यांसह 10 आमदारांच्या घरावर हल्ला; अमित शाह तीन सभा रद्द करून तडकाफडकी दिल्लीत
Embed widget