एक्स्प्लोर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांचा राजीनामा

आज मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. त्यांनी राजीनाम्यात नाराजीचे कारण स्पष्ट केले नसले तरी ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

मुंबई :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला आहे. रविकांत तुपकर हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. रविकांत तुपकरांनी कालच घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून मुख्यमंत्री आणि रविकांत तुपकरांमध्ये एक तास चर्चा झाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का, प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकरांचा राजीनामा
दरम्यान, राजू शेट्टी यांनी रविकांत तुपकर यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी चळवळीमध्ये आजपर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद. त्यांच्या भावी वाटचालीस स्वाभिमानी परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे. प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा राजू शेट्टी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे स्वाभिमान शेतकरी संघटनेनेला विदर्भात मोठा धक्का बसला आहे. सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीपासून काडीमोड घेतल्यानंतर तुपकर यांचे पक्षात वजन वाढले होते.
मी अनेक वर्षापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये एक सक्रीय कार्यकर्ता होतो. माझ्याकडे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. परंतु आज मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.त्यांनी राजीनाम्यात नाराजीचे कारण स्पष्ट केले नसले तरी ते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातून उमेदवारी मिळण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आघाडीकडे  मागणी केली होती. परंतु फार आग्रह न धरल्याने सदर लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडण्यात आला होता. त्यामुळे नाराज रविकांत तुपकर भाजपच्या गळाला लागले असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीकता पाहता तुपकर भाजप प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या चार दिवसांपासून तुपकर मुंबईत असल्याची माहिती असून लवकरच ते भाजपात प्रवेश करतील अशी माहिती देखील आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Bollywood Actor Prem Adib Life Stroy: ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', लोक देवघरात फोटो लावून पुजायचे, ओळखलं का कोण?
ना अरुण गोविल, ना रणबीर कपूर; 9 सिनेमांत प्रभू श्रीराम साकारलेला 'हा' अभिनेता खरा 'सिल्वर स्क्रीनचा राम', ओळखलं का कोण?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Embed widget