एक्स्प्लोर

जालन्याचा तिढा सुटला, दानवेच उमेदवार; ईशान्य मुंबईचं काय होणार?

आता अर्जुन खोतकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. मात्र त्याचवेळी ईशान्य मुंबई मतदारसंघाचा प्रश्नही कायम आहे. कारण किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईची जागा कोण लढणार अशा प्रश्न सध्या दोन्ही पक्षांसमोर आहे.

मुंबई : जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. जालन्यातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच लढणार आहेत. तर ईशान्य मुंबईची जागाही भाजपच लढवणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. जालन्याची जागा रावसाहेब दानवेच लढवणार असल्याने आता अर्जुन खोतकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष झालं आहे. तर शिवसेनेचा विरोध पाहता ईशान्य मुंबईत कोण उमेदवार द्यायचा असा प्रश्न भाजपसमोर आहे. त्यामुळे आता अर्जुन खोतकर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. मात्र त्याचवेळी ईशान्य मुंबई मतदारसंघाचा प्रश्नही कायम आहे. कारण किरीट सोमय्या यांच्या नावाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईची जागा कोण लढणार अशा प्रश्न सध्या दोन्ही पक्षांसमोर आहे. जालन्यातून मला निवडणूक लढू द्या, अर्जुन खोतकरांचा रावसाहेब दानवेंकडे आग्रह अर्जुन खोतकरांची भूमिका काय? गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर यांनी बंड करत जालनाच्या जागेवर दावा केला होता. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांचा शब्द अंतिम राहिल असं वक्तव्य खोतकरांनी सांगितलं होतं. मात्र आता दानवेंना उमेदवारी मिळणार असल्याने अर्जुन खोतकर यांची वैयक्तिक भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ठाकरे घराण्याशी गद्दारी करणार नाही, अर्जुन खोतकरांच स्पष्टीकरण भाजपचा उमेदवार कोण? दुसरीकडे ईशान्य मुंबईतही भाजप लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण इथे किरीट सोमय्यांविरोधात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे भाजपचा ईशान्य मुंबईचा उमेदवार कोण या प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. जालन्याच्या तिढ्यावर उतारा जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी युतीमधला नेत्यांनी चांगलीच शक्कल लढवली. मराठवाड्यातील युतीच्या समन्वयकपदी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांची नेमणूक केली. नव्या जबाबदरीमुळे अर्जुन खोतकर यांची गोची होण्याची शक्यता आहे. तर पक्ष श्रेष्ठींकडून सुंठीवाचून खोकला घालवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दुसरीकडे अर्जुन खोतकर समर्थकांनी रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक लढवण्यासाठी दबाव वाढवला आहे. संबंधित बातम्या जालन्याच्या जागेबाबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो मान्य, अर्जुन खोतकरांचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांच्या वतीने सहकारमंत्र्यांकडून दानवे-खोतकरांची कट्टी सोडवण्याचा प्रयत्न, जालन्यात दिलजमाई बैठक

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!

व्हिडीओ

Amit Shah On Hindi Language : भाषा, 'पाप' आणि राजकीय माप |Amit Shah On Hindi Language
Manoj Jarange Mumbai Andolan | लढणार एकटा, निर्धार पक्का | Special Report ABP Majha
Sangli AdityaRaj Patwardhan : आदित्यराज पटवर्धन यांच्या वारसाहक्कावरून वाद Special Report
Disha Salian Case CBI : सीबीआयचा FIR, आरोपीच्या पिंजऱ्यात कोण? Special Report
Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
BLOG : शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
शोभिता ठाकूरच्या 'खिलावडी’ला रशियात 'बेस्ट शॉर्ट फिल्म'चा पुरस्कार
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त
Embed widget