Rajya Sabha Election Maharashtra Results Celebration 11 June Live : आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभेच्या सहापैकी पाच जागांचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात या विजयाचं सेलिब्रेशन सुरु आहे. पाहा प्रत्येक अपडेट्स....

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jun 2022 03:44 PM
राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनीच आम्हाला मदत केली - आमदार संतोष दानवे

राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनीच आम्हाला मदत केली,गद्दारांच्या यादीत अब्दूल सत्तार यांचं नाव पहिलं असायला हवं अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांनी दिलीय. राज्यसभा निवडणुकीत सत्तारांनी भाजपला मदत केल्याचा आमदार संतोष दानवे यांनी दावा केलाय... काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे फुटून महाविकास आघाडी ला मतदान करतील असा दावा केला होता, त्याला  प्रत्युत्तर देताना आमदार संतोष दानवे यांनी हा नवीन दावा केलाय.

Nanded : नांदेड - राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाचा पेढे वाटून व आतिषबाजी करून कार्यकर्त्यांचा जल्लोष

राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा नांदेडमध्ये भाजपने जल्लोष साजरा केलाय. ढोल ताश्याच्या आवाजावर भाजप कार्यकर्त्यांनी भांगडा करत व नाचत,आनंदोत्सव साजरा केलाय. यावेळी पेढे वाटून व फटाक्याची मोठया प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली

Devendra Fadnavis LIVE :  आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

Devendra Fadnavis LIVE : आपला विजय हा लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे 


त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा निवडून आली 


आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले आहे, काही बावचले आहेत काही पिसाळले आहेत 


जिंकलेल्यांनी उन्माद करायचं नसतं 


जे म्हणतायत आम्ही कोणामुळे जिंकले तरी ते काही करणार नाही कारण त्यांना सरकार टिकवायचे आहे 


विधान परिषदेची जागा आपण लढवत आहोत निवडणूक सोपी नाही 


इथे आपल्याला मतदान करुन जसं जिंकवलं तिथे तर जास्त लोकांची सतसत विवेकबुद्धी जागृत असेल

आमच्या कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की कळलं नाही- चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil LIVE : इतक्या दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती त्याचा निकाल 3 वाजता आला, जे बोलत होते गुडग्यात आहे त्यांचे आता गुडघ्यात आलेय. आमच्या कोल्हापूरच्या पैलवानाने असा डाव टाकला की कळलं नाही. देवेंद्र फडणवीस हे या कुस्तीच्या मैदानात होते


शरद पवारांनी सकाळी प्रतिक्रिया दिलीय ,फडणवीस यांच्याबद्दल चांगलं  बोललेत. त्यांना माहीत होतं पराभव होतोय म्हणून पुण्याला शरद पवार गेले. आता विधानपरिषद निवडणूकीत ही आम्ही जागा जिंकू. विधानपरिषदेसाठी देवेंद्र फडणवीस प्रेमळ असल्याने त्यांना विनंती होईल मात्र देवेंद्र फडणवीस बघतील 

BJP Celebration : देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणास सुरुवात

देवेंद्र फडणवीस यांचे भाषण LIVE:


BJP Celebration : भाजपचे विजयी उमेदवार पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचा सत्कार

BJP Celebration :  भाजपचे विजयी उमेदवार पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांचा सत्कार करण्यात आला. 

BJP Celebration : ढोल-ताशांच्या गजरात देवेंद्र फडणवीस यांचे भाजप कार्यालयात स्वागत

BJP Celebration : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. राज्यसभा निवडणूक निकालानंतर आज भाजप कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशांच्या गजरात फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले आहे. 

संजय राऊत हे काय ब्रह्मदेव आहेत का? हे ब्रह्मदेवापेक्षा मोठे आहेत असं वाटायला लागलंय. मतदान गोपनीय राहतं, मी दिलं नाही हे यांना कसं माहित. मी महाविकास आघाडीत सुरुवातीपासून आहे हे नंतर आले. किमान समान कार्यक्रम ठरला त्यावेळी मी सोबत होतो, शिवसेना नंतर आली.
BJP Celebration : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयात दाखल; राज्यसभा निवडणूक निकालानंतर भाजपचा जल्लोष

BJP Celebration : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. राज्यसभा निवडणूक निकालानंतर आज भाजप कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. 

BJP Celebration : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयात दाखल; राज्यसभा निवडणूक निकालानंतर भाजपचा जल्लोष

BJP Celebration : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजप कार्यालयात दाखल झाले आहेत. राज्यसभा निवडणूक निकालानंतर आज भाजप कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात येत आहे. 

Akola : राज्यसभा निवडणुकीतील विजयाबद्दल अकोल्यात भाजपचा जोरदार जल्लोष

akola : राज्यसभा निवडणुकीतील तिन्ही जागांवरील विजयाबद्दल अकोल्यात भाजपनं जोरदार जल्लोष केलाय. गांधी चौकातील भाजप कार्यालयासमोर हा जल्लोष करण्यात आलाय. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडत बँडच्या तालावर धरला ठेका धरलाय.

Aurangabad : भाजप कार्यकर्त्यांचा वाजत गाजत ,फटाके फोडून जल्लोष

औरंगाबाद - राज्यसभा निवडणुकीच्या यशानंतर राज्यात विविध ठिकाणी भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात येतोय. औरंगाबादमध्ये देखील भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात ठेका धरत एकमेकांना पेढे भरवून जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी ठेका धरत कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद  साजरा केला.

भाजप कार्यकर्त्यांचा कल्याणमध्ये जल्लोष

राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे तिन्ही उमेदवार विजय झाल्यानंतर भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. आज कल्याण पश्चिमेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या विजयाबद्दल जल्लोष साजरा केला .यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाके वाजवून गुलाल उधळून एकमेकांना पेढे भरवून  जल्लोष साजरा केला 

Rajya Sabha Election 2022 : राजसभेच्या निकालानंतर नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष 

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाला असून, भाजपच्या धनंजय महाडिकांनी बाजी मारली. त्यामुळे भाजपकडून तिन्ही उमेदवार विजयी झाल्याच्या निमित्ताने नाशिकच्या भाजप कार्यालयात फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. 

नाशिक भाजपच्या एकमेकांना पेढे भरवून फटाक्यांची आतषबाजी
राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिनही जागा जिंकल्याबद्दल नाशिक भाजपच्या वतीनं आज एन डी पटेल रोडवरील भाजप कार्यालयाबाहेर एकमेकांना पेढे भरवून फटाक्यांची आतषबाजी आणि देवेंद्र फडणवीस तुम आगे बढोची घोषणाबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजप आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यसभाच नाही तर विधान परिषदेच्याही जागा भाजपच जिंकेल असा विश्वास सिमा हिरे यांनी पत्रकारांशी बोलतांना यावेळी व्यक्त केला. 
Mumbai BJP Celebration : सागर बंगल्याहून निघाले देवेंद्र फडणवीस, थोड्याच वेळात भाजप कार्यालयामध्ये पोहोचणार

Mumbai BJP Celebration : सागर बंगल्याहून निघाले देवेंद्र फडणवीस, थोड्याच वेळात भाजप कार्यालयामध्ये पोहोचणार

Parbhani Maharashtra BJP Celebration LIVE : परभणीत भाजप कार्यकर्त्यांकडून सेलिब्रेशन





Parbhani BJP Celebration LIVE : राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राज्यभर भाजप कार्यकर्ते जल्लोष करताना दिसत आहेत. परभणीतही भाजप जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वात शहरातील शिवाजी चौकात फटाके फोडून बँडबाजाच्या गजरात भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला आहे.


 

 



 


ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे- संजय राऊत

ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीचे तीन आमदारांची तीन मतं आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानीचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मतं दिली नाहीत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. 

Rajya Sabha Election LIVE : राज्यसभेतील एका जागेच्या पराभवानंतर मविआच्या नेत्यांची तातडीची बैठक,आज दुपारनंतर सर्व मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीची शक्यता

राज्यसभेतल्या
पराभवानंतर मविआच्या
नेत्यांची तातडीची बैठक
----------
आज दुपारनंतर सर्व
मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांच्या
उपस्थितीत बैठकीची शक्यता
-----------
मंत्री गुलाबराव
पाटलांची 'माझा'ला
एक्स्क्लुझिव्ह माहिती
------------
भाजपचा विजय
धक्कादायक आणि
चिंताजनक-पाटील
------------
पक्षाची मतं फुटली नाही
छोट्या पक्षांची मतं
भाजपला मिळाली-पाटील

निवडणुकीत अंपायरिंगचे काम निवडणूक आयोगाकडे असते, आयोगाच्या हेतूबद्दल शंका घेऊ नये : घटनातज्ज्ञ उल्हास बापट

Rajya Sabha Election 2022 : प्रेफरेन्शियल व्होटची ही निवडणूक प्रक्रिया किचकट आहे. मात्र त्याचा स्वीकार करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकप्रतिनिधी ती समजून घेऊन मतदान करतील असे अपेक्षिले होते. राजकीय पक्षांनी यातून हाच धडा घ्यायचाय की अशा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने समजून घ्यायला हवी. निवडणुकीत अंपायरिंगचे काम निवडणूक आयोगाकडे असते. निवडणूक आयोगाच्या हेतूबद्दल शंका घेऊ नये. ते घटनेत बसणारं नाही. पराभूत उमेदवार आणि त्यांचा पक्ष न्यायालयात या निकालाच्या विरोधात अपील करु शकतात. परंतु तिथे निकाल बदलेल असं वाटत नाही. त्यांनी न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये, असं घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

राज्यसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्याची बैठक बोलावली : गुलाबराव पाटील

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्याची बैठक बोलावली, अशी माहिती शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली. आज दुपारनंतर ही बैठक होण्याची शक्यता आहे. भाजपचा विजय धक्कादायक आणि चिंताजनक आहे. यावर चिंतन करण्याची गरज आहे, असं पाटील म्हणाले. शिवसेनेची मते फुटली नाहीत. सुहास कांदे यांचं एक मत संजय राऊत यांना होतं, त्यामुळे संजय पवार यांचा पराभव झाला नाही. अपक्ष आणि छोटे पक्ष यांची मतं भाजपला मिळाली असावीत, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

Sharad Pawar On Election : महाविकास आघाडीची मतं फुटली नाहीत, भाजपकडं मतं कुठुन आली याची मला कल्पना, शरद पवार यांची प्रतिक्रिया

Sharad Pawar On Election : महाविकास आघाडीची मतं फुटली नाहीत, भाजपकडं मतं कुठुन आली याची मला कल्पना, शरद पवार यांची प्रतिक्रिया

ठाकरे यांच्या माफिया सरकारचे काउन्टडाऊन सुरु, किरीट सोमय्यांची टीका

Rajya Sabha Election 2022: धनंजय महाडिकांची पराभवाची मालिका खंडित... संजय पवार यांचा पराभव

भाजपच्या धनंजय महाडिकांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे.

Rajya Sabha Election 2022: संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं तर भाजपच्या धनंजय महाडिकांना 27 मतं

सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून शिवसेनेच्या संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मतं तर भाजपच्या धनंजय महाडिक यांना 27 मतं मिळाली आहेत. 

Rajya Sabha Election 2022: Live Updates : सहाव्या जागेसाठी संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यात लढत


राज्यसभेसाठी पहिल्या पसंतीची मतं घेऊन प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी झाले आहेत. आता सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांच्यात लढत सुरू आहे. 

Rajya Sabha Election 2022: Live Updates : प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी

प्रफुल्ल पटेल, संजय राऊत, पियुष गोयल, अनिल भोंडे, इम्रान प्रतापगडी विजयी


पहिल्या पसंतीची मतं


प्रफुल्ल पटेल यांना 43 मतं 


संजय राऊत 41


पियुष गोयल 48 मतं 


अनिल भोंडे 48 मतं 


प्रतापगडी 44

Rajya Sabha Election 2022: काँग्रेसच्या अजय माकन यांचा पराभव, अपक्ष उमेदवार कार्तीकेय शर्मा विजयी

हरियानामध्ये काँग्रेसचे एक मत बाद झाल्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांचा पराभव झाला आहे. त्यांच्या विरोधात कार्तीकेय शर्मा या अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. 

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या मतमोजणीला सुरुवात, 284 मतं वैध ठरवली

तब्बल आठ तासानंतर आता राज्यसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 284 मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. आता थोड्याच वेळात निकाल यायला सुरू होईल.

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या मतमोजणीला सुरुवात, 284 मतं वैध ठरवली

तब्बल आठ तासानंतर आता राज्यसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. एकूण 284 मतांचा कोटा ठरवण्यात आला आहे. आता थोड्याच वेळात निकाल यायला सुरू होईल.

Rajya Sabha Election 2022: संजय राऊत यांच्या पारड्यातील मत बाद, भाजपचा उत्साह दुणावला

केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर आता मतपत्रिका छाननीला सुरुवात


शिवसेनेच्या पारड्यातील एक मत बाद झाल्याने भाजपा नेत्यांचा उत्साह दुणावला 


छाननीत महाविकास आघाडीमधील प्रत्येक मतपत्रिका भाजप बारकाईनं तपासणार असल्याची सूत्रांची माहिती 


मत पत्रिकेत किरकोळ चूक मिळाली तरी मत बाद करण्याचा भाजपचा डाव 


महाविकास आघाडी समोरील अडचणी आणखी वाढवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु- सूत्र 


संजय राऊत यांच्या पारड्यातील मत बाद झाल्याने पहिल्या फेरीतील विजय अशक्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या मतमोजणीला सुरुवात

तब्बल आठ तासानंतर आता राज्यसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता थोड्याच वेळात निकाल यायला सुरू होईल.

Rajya Sabha Election 2022: सुहास कांदेंचं मत बाद, जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकुर याचं मत वैध

शिवसेनेच्या सुहास कांदे यांचे मत बाद झाले आहे, तर यशोमती ठाकुर आणि जितेंद्र आव्हाड यांचे मत वैध असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. 


 





निवडणुक आयोगाकडून अद्याप कुठलाही निर्णय न आल्यानं शिवसेना आक्रमक 

निवडणुक आयोगाकडून अद्याप कुठलाही निर्णय न आल्यानं शिवसेना आक्रमक 


संजय राऊत निवडणुक अधिका-याला जाब विचारण्यासाठी गेले 


मतमोजणी प्रकरणी आता थांबवा, उद्या सकाळी  ११ वाजता पुन्हा मतमोजणी करा शिवसेना करणार मागणी

Rajya Sabha Election 2022: निवडणूक आयोगाची बैठक संपली, अर्ध्या तासामध्ये मतमोजणीला सुरुवात होण्याची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक संपली भाजपने केलेल्या तक्रारीवर निर्णय देण्यात येणार आहे. येत्या अर्ध्या तासामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

Rajya Sabha Election 2022: पक्षांच्या परस्पर आरोपांवरती केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक अजूनही सुरू 

पक्षांच्या परस्पर आरोपांवरती केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक अजूनही सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त अनुप कुमार पांडे, मुंबईतून राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, महाराष्ट्राची निवडणूक निरीक्षक अजय नायक यांच्या उपस्थितीत ऑनलाइन बैठक सुरू आहे. भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेच्या परस्पर आरोपांवर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.
 

Rajya Sabha Election 2022: गुलाल महाविकास आघाडीच उधळणार, राजेश टोपेंचा विश्वास

राजेश टोपे म्हणाले की, "इथले जे आयओ आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं की, असं काहीही चुकीचे झाले नाही. ही कायदेशीर बाब आहे, दूध का दूध पाणी का पाणी होईल. अंतिम निर्णयमध्ये विजय आमचा होईल, थोडी वाट बघावी लागेल. मात्र गुलाल महाविकास आघाडीच उधळणार."

Rajya Sabha Election 2022: भाजपनंतर आता महाविकास आघाडीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार

भाजपच्या तक्रारी पाठापोठ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे महाविकास आघाडीचीही तक्रार.


आमदार रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतपत्रिकेवर महाविकास आघाडीचा आक्षेप.


महाविकास आघाडीने तक्रार केल्याची काँग्रेस मंत्री अस्लम शेख यांची माहिती.


त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोग भाजप आणि महाविकास आघाडीच्या तक्रारीवर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष.

Rajya Sabha Election 2022 LIVE : शिवसेनेचीही निवडणूक आयोगाकडे तक्रार, रवी राणा आणि सुधीर मुंनगटीवार यांच्यावर आक्षेप

भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर घेतलेल्या आक्षेपानंतर आता शिवसेनाही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. सेनेने भाजपच्या रवी राणा आणि सुधीर मुंनगटीवार यांच्यावर आक्षेप घेतला असून त्यासंबंधी पत्र पाठवण्यात येणार आहे. 

Rajya Sabha Election 2022 LIVE : केंद्रीय निवडणूक आयोगाना व्हिडीओ फुटेज मागवले

राज्य निवडणूक आयोगाने पाठवलेल्या अहवालावर केंद्रिय निवडणुक आयोगाचा अद्याप निर्णय नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणी रोखून ठेवली असून तपासासाठी मतदान केंद्रावरील चित्रीकरण मागवले. चित्रीकरण तपासूनच केंद्रीय निवडणूक आयोग तीन मताबाबत निर्णय जाहीर करणार आहे. काँग्रेसकडून मात्र भाजपच्या मतांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली नाही. 

Rajya Sabha Election 2022 LIVE : मतमोजणीला एक तासाचा विलंब होण्याची शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी नाही

राष्ट्रवादीकडून जल्लोषाची तयारी सुरू झाली असून दोन बुके मागवण्यात आले आहेत. तसेच भाजपकडूनही जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणीसाठी एक तासाचा विलंब लागणार असल्याची माहिती आहे. भाजपने केलेल्या तक्रारीची दखलकेंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. त्यामुळे अद्याप मतमोजणी सुरु नसून त्याला एक तासाचा विलंब होण्याची शक्यता आहे. 

Rajya Sabha Election 2022 LIVE : राष्ट्रवादीकडून जल्लोषाची तयारी सुरू, दोन बुके मागवले

राष्ट्रवादीकडून जल्लोषाची तयारी सुरू झाली असून दोन बुके मागवण्यात आले आहेत. तसेच भाजपकडूनही जोरदार तयारी करण्यात येत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणीसाठी एक तासाचा विलंब लागणार असल्याची माहिती आहे.

Rajya Sabha Election 2022 LIVE : राज्यसभेच्या मतमोजणीला अद्याप सुरुवात नाही, केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी नाही

राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू नसल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आोयगाने मतमोजणीला परवानगी दिली नसल्याने ही मतमोजणी सुरू झाली नसल्याची ताजी माहिती आहे. 

Rajya Sabha Election 2022 LIVE : मतमोजणी पूर्ण, काही क्षणात निकाल येणार

राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणी पूर्ण झाली असून काही क्षणात निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर विधीमंडळ परिसरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. 

Rajya Sabha Election 2022 LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान भवनाकडे येतील 

राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून काही वेळातच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान भवनाकडे येतील अशी माहिती आहे. 

Rajya Sabha Election Result 2022 LIVE : राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून काही वेळातच निवडणुकीचा पहिला निकाल समोर येणार आहे. 

Rajya Sabha Election 2022 LIVE : भाजपने केलेल्या मागण्या निवडणूक आयोगाने फेटाळल्या

महाविकास आघाडीचे तीन मतं अवैध ठरवावीत ही भाजपने केंद्रीय निवडणूक आयागोकडे केलेली मागणी फेटाळण्यात आली आहे. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती.

Rajya Sabha Election 2022 : भाजपची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार, राज्यसभेच्या मतमोजणीला वेळ लागू शकतो


भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी वेळाने सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली आहे. 

Rajya Sabha Election 2022: राज्यसभेसाठी मतदान पूर्ण, 285 आमदारांनी केलं मतदान

राज्यसभेसाठी आतापर्यंत 285 आमदारांनी मतदान केलं आहे. त्यामुळे आतापर्यंत मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती आहे. मतमोजणी चार वाजल्यापासून सुरू होणार आहे. 


 

Rajya Sabha Elections 2022 LIVE : अपक्ष आमदार रवी राणा विधानभवनात पोहोचले

Rajya Sabha Elections 2022 LIVE : भाजपकडून मतदान करण्यासाठी अपक्ष आमदार रवी राणा विधानभवनात पोहोचले आहेत. 101 वेळा हनुमान चालीसा पठण करुन रवी राणा मतदानासाठी विधानभवनात आले.  

Rajya Sabha Elections 2022 : राज्यसभा निवडणुकीत केवळ तीन सदस्यांचं मतदान अद्याप बाकी

Rajya Sabha Elections 2022 : राज्यसभा निवडणुकीत केवळ तीन सदस्यांचं मतदान अद्याप शिल्लक आहे. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील, काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण आणि अपक्ष आमदार रवी राणा यांचं मतदान बाकी आहे. शिवसेनेच्या सर्व सदस्यांचं मतदान पूर्ण झालं आहे.

नवाब मलिक यांची मतदान करण्याची शक्यता मावळली

नवाब मलिक यांची मतदान करण्याची शक्यता मावळली आहे. मलिक यांच्या सुधारित याचिकेवर सुनावणी देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे





Rajya Sabha Elections 2022 : नवाब मलिकांच्या सुधारीत याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार

Rajya Sabha Elections 2022 : नवाब मलिकांच्या सुधारीत याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाचा नकार, नवाब मलिकांच्या मतदानाच्या अपेक्षांना सुरूंग, महाविकास आघाडीच्या गोटातील चिंता वाढली 

Rajya Sabha Election 2022 LIVE : विधानभवनात काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक सुरु

Rajya Sabha Election 2022 LIVE : विधानभवनात काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरु आहे. दोन्ही पक्षाच्या आमदारांच्या मतदान प्रक्रियेनंतर आकडेमोड सुरु केली जात आहे. शिवसेनेच्या 42 आमदारांची पहिली पसंतीची मतं संजय राऊत यांना मिळाली आहेत. तर शिवसेनेने पहिल्या पसंतीची 13 मते, राष्ट्रवादी काँग्रेसची 9 आणि काँग्रेसची दोन मतं संजय पवार यांना. 

Rajya Sabha Election 2022 LIVE : आत्तापर्यंत झालेलं मतदान वैध झाल्याची सूत्रांची माहिती, भाजपकडून पराग आळवणी आणि आशीष शेलार यांनी घेतलेले आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्याची माहिती

 Rajya Sabha Election 2022 LIVE :  आत्तापर्यंत झालेलं मतदान वैध झाल्याची सूत्रांची माहिती, भाजपकडून पराग आळवणी आणि आशीष शेलार यांनी घेतलेले आक्षेप निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळल्याची माहिती

Rajya Sabha Election 2022 LIVE : राज्यसभा निवडणुकीसाठी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 285 पैकी 238 आमदारांचं मतदान

Rajya Sabha Election 2022 LIVE : राज्यसभा निवडणुकीसाठी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत 285 पैकी 238 आमदारांनी मतदारांनी हक्क बजावला. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली. तीन तासात 238 आमदारांनी मत दिलं. संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. 

 Rajya Sabha Election 2022 LIVE :  आदित्य ठाकरे यांनी मतदान करताना त्यांच्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता, त्यांना दुसरी मतपत्रिका दिली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला

 Rajya Sabha Election 2022 LIVE :  आदित्य ठाकरे यांनी मतदान करताना त्यांच्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची पहिली मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना दुसरी मतपत्रिका दिली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या मतपत्रिकेवर शिक्का का नव्हता याचा तपास निवडणूक अधिकारी करतील

 Rajya Sabha Election 2022 LIVE :  जितेंद्र आव्हाड यांनी मतदान लिहिल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली, भाजपकडून हरकत

 Rajya Sabha Election 2022 LIVE :  जितेंद्र आव्हाड यांनी मतदान लिहिल्यानंतर थेट जयंत पाटील यांच्या हातात मतपत्रिका दिली, खरं तर मतपत्रिका दाखवायची असते ती हाताळायला द्यायची नसते


भाजपचे पराग अळवणी यांनी यावर हरकत घेतली आहे



काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी अशाच पद्धतीने नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे


या दोन्ही मुद्द्यांवर भाजपने हरकत घेतली आहे


ही दोन्ही मतं बाद करावी अशी भाजपची मागणी आहे

Rajya Sabha Election LIVE :  कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला

Rajya Sabha Election LIVE :  राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची रणधुमाळी मुंबईत सुरू आहे...मात्र कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण भाजप आणि सेनेचे उमेदवार हे कोल्हापुरातील आहेत. शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळत आहेत.

Rajya Sabha Election 2022 Live Update :  राज्यसभा निवडणुकीत दुपारी 12.25 वाजेपर्यंत 238 आमदारांचं मतदान

Rajya Sabha Election LIVE :  राज्यसभा निवडणुकीत दुपारी 12.25 वाजेपर्यंत 238 आमदारांनी मतदान केले आहे.

Rajya Sabha Election LIVE :  देवेंद्र फडणवीस स्वतः आमदार लक्ष्मण जगताप यांना घ्यायला विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले  

Rajya Sabha Election LIVE :  देवेंद्र फडणवीस स्वतः आमदार लक्ष्मण जगताप यांना घ्यायला विधानभवनाच्या पायऱ्यांवर आले  

Rajya Sabha Election LIVE : पिंपरीमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे मुंबईतच, आमदारांच्या स्वीय सहाय्यकांची माहिती

Rajya Sabha Election LIVE : पिंपरीमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे हे मुंबईतच आहेत. पुढच्या एक तासात ते मतदानाच्या ठिकाणी पोहचतील. आमदारांच्या स्वीय सहाय्यकांची माहिती.

Rajya Sabha Election LIVE :  लक्ष्मण जगतापांना घेऊन अॅम्ब्युलन्स विधानभवनात दाखल

Rajya Sabha Election LIVE :  लक्ष्मण जगतापांना घेऊन अॅम्ब्युलन्स विधानभवनात दाखल

राज्यसभेसाठी मतदान सुरु असताना शिवसेनेची विधानपरिषदेसाठी रणनीती, हॉटेल ट्रायडंटमध्ये शिवसेना नेत्यांची बैठक

राज्यसभेसाठी मतदान सुरु असताना शिवसेनेची विधानपरिषदेसाठी रणनीती, हॉटेल ट्रायडंटमध्ये शिवसेना नेत्यांची बैठक, एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांची बैठक सुरु

Rajya Sabha Election LIVE : नवाब मलिकांच्या याचिकेवर दुपारच्या सत्रात नव्या मागणीसह पुन्हा सुनावणी, मलिकांना ऐनवेळी मंजुरीची अपेक्षा मात्र देशमुखांच्या मतदानाची शक्यता कमीच

नवाब मलिकांच्या याचिकेवर  दुपारच्या सत्रात नव्या मागणीसह पुन्हा सुनावणी होणार, याचिकेत बंदोबस्तात जाऊ देण्याची मागणीच नसताना तो मुद्दा कसा?,ईडीचा आक्षेप, वेळ फारच थोडा शिल्लक असताना तांत्रिक मुद्यावर मतदानाची परवानगी लांबली, मलिकांना ऐनवेळी मंजुरीची अपेक्षा मात्र देशमुखांच्या मतदानाची शक्यता कमीच

Rajya Sabha Election LIVE :  सपाचे आमदार अबू आझमी, रईस शेख विधानभवनात पोहोचले; अबू आझमी म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीसोबत

Rajya Sabha Election LIVE :  सपाचे आमदार  अबू आझमी, रईस शेख विधानभवनात पोहोचले, अबू आझमी म्हणाले आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत. मविआला मतदान करणार, कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला करायचं ते आत जाऊन ठरवतो. आम्हाला आमच्या पत्रानंतर उत्तर मिळालं. समाधानी आहोत म्हणूनच मतदान करायला आलो. 

Rajya Sabha Election LIVE : शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात

राज्यसभेसाठी विधान भवनात एकीकडे मतदान होतंय... तर दुसरीकडे हॉटेल ट्रायडंटमध्ये शिवसेनेनं विधान परिषदेसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि उदय सामंत विधान परीषदेच्या रणनितीसाठी बैठक सुरू 

Rajya Sabha Election LIVE : आज विधानभवन, मुंबई येथे 11.30 वाजेपर्यंत 180 आमदारांनी मतदान केले

Rajya Sabha Election LIVE : आज विधानभवन, मुंबई येथे 11.30 वाजेपर्यंत 180 आमदारांनी मतदान केले 

Rajya Sabha Election LIVE :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

Rajya Sabha Election LIVE :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनात दाखल

BIG BREAKING : नवाब मलिकांना मतदानाची तूर्तास परवानगी नाहीच, मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम

BIG BREAKING : नवाब मलिकांना मतदानाची तूर्तास परवानगी नाहीच, मुंबई सत्र न्यायालयानं दिलेला निकाल हायकोर्टाकडून कायम, मात्र नवाब मलिकांना याचिकेत सुधारणा करून पुन्हा दाद मागण्याची परवानगी, याचिकेतील जामीनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी, थोड्यावेळात नव्या याचिकेसह पुन्हा सुनावणी होणार

Rajya Sabha Election LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानभवनाकडे रवाना
Rajya Sabha Election LIVE : आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधान भवनात घेतली अजित पवार यांची भेट

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी विधान भवनात घेतली अजित पवार यांची भेट, दिलीप मोहिते-पाटील यांना मुख्यमंत्री यांच्यावर नाराजी व्यक्त केल्यानंतर अजित पवार यांनी स्वतः मोहिते यांच्याशी संपर्क साधून त्यांना मतदानाला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. अजित पवार यांच्या मध्यस्थीनंतर दिलीप मोहिते पाटील राज्यसभेच्या मतदानासाठी विधानभवन परिसरात पोहोचले

Rajya Sabha Election 2022 LIVE:  राष्ट्रवादीची पहिल्या पसंतीची 10 मतं शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना

Rajya Sabha Election 2022 LIVE:  राष्ट्रवादीची पहिल्या पसंतीची 10 मतं शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना

Nawab Malik News : नवाब मलिकांची जामीनासाठी मागणी नाही, ती आम्ही मागे घेतो, आम्हाला केवळ बंदोबस्तात जाऊन मतदानाची परवानगी द्या,अमित देसाईंचा हायकोर्टात युक्तिवाद

Nawab Malik News :  नवाब मलिकांची जामीनासाठी मागणी नाही, ती आम्ही मागे घेतो, आम्हाला केवळ बंदोबस्तात जाऊन मतदानाची परवानगी द्या,अमित देसाईंचा हायकोर्टात युक्तिवाद


सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे मतदान करणं महत्त्वाचंय


कारण एक अतिरिक्त उमेदवार उभा राहिल्यानं एरव्ही बिनविरोध होणारी ही निवडणूक लढवली जातेय


जर लढत होणारच नसती तर आम्ही परवानगी मागितलीच नसती


त्यामुळे आम्ही ऐनवेळी ही परवानगी मागत आहोत


अमित देसाईंचा हायकोर्टात युक्तिवाद

Nawab Malik News : नवाब मलिकांच्या याचिकेवर सुनावणी सुरु

Nawab Malik News : न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी  अनिल देशमुखांच्या याचिकांवर सुनावणीस यापूर्वीच नकार दिलेला आहे. त्यामुळे सध्या फक्त नवाब मलिकांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या निकालावर अनिल देशमुखांचं मतदानाचं भवितव्य अवलंबून. जर परवानगी मिळाली तर हा निकाल घेऊन ते अन्य न्यायमूर्तींपुढे दाद मागणार

Rajya Sabha Election 2022 : फडणवीस यांची खेळी यशस्वी होणार, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येणार, भाजप आमदार महेश लांडगे यांचा दावा

Rajya Sabha Election 2022 : फडणवीस यांची खेळी यशस्वी होणार, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येणार, भाजप आमदार महेश लांडगे यांचा दावा

Rajya Sabha Election 2022 : शिवेसेनेकडून मतदानाला सुरुवात, शिवसेनेकडून सुनील राऊत, भास्कर जाधव, रमेश कोरगांवकर, मंगेश कुडाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rajya Sabha Election 2022 : शिवेसेनेकडून मतदानाला सुरुवात, शिवसेनेकडून सुनील राऊत, भास्कर जाधव, रमेश कोरगांवकर, मंगेश कुडाळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rajya Sabha Election 2022 : खेड आळंदी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचेआमदार दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी

Rajya Sabha Election 2022  : खेड आळंदी मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी. मोहिते पाटील म्हणाले,  मी नाराज आहे, हे मी माझ्या वरिष्ठांना कळवले आहे.  मुख्यमंत्र्यांच्यावर माजी नाराजी आहे. म्हणून मी आलो नव्हतो.  अजित पवार सांगतील तस मी मतदान करणार.  मी स्पष्ट बोलतो त्यामुळे मी परिणामांना सामोरं जायला तयार आहे.  भाजपने मला जेलमधये पाठवायची तयारी केली होती. त्यामुळे मी भाजपला मतदान करणार नाही.  माजी नाराजी मी शरद पवार यांना ही कळवली आहे, असं दिलीप मोहिते पाटील म्हणाले. 

Rajya Sabha Election 2022  नवाब मलिकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू

Rajya Sabha Election 2022  नवाब मलिकांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू, मुंबई सत्र न्यायालयानं राज्यसभेच्या मतदानाला हजेरी लावण्याची परवानगी नाकारल्याच्या निर्णयाला आव्हान, मलिकांतर्फे जेष्ठ कायदेतज्ञ अमित देसाई बाजू मांडणार तर ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह युक्तिवाद करणार

Rajya Sabha Election 2022 :  शिवसेनेचे काही आमदार विधान भवनात पोहोचले

Rajya Sabha Election 2022 :  शिवसेनेचे काही आमदार विधान भवनात पोहोचले, मंत्र्यांच्या गाडीत बसून  काही आमदार पोहोचले आहेत. प्रत्येक मंत्र्यावर त्या त्या आमदारांची जबाबदारी दिली आहे

Rajya Sabha Election 2022 : पहिल्या दीड तासात 50 टक्के मतदान पूर्ण

Rajya Sabha Election 2022  : पहिल्या दीड तासात 50 टक्के मतदान पूर्ण, 143 आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क, भाजपाच्या 60हून अधिक आमदारांचे मतदान पूर्ण

Rajya Sabha Election 2022  : पहिल्या दीड तासात 50 टक्के मतदान पूर्ण, 143 आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क, भाजपाच्या 60हून अधिक आमदारांचे मतदान पूर्ण, पहिल्या दीड तासात काँग्रेसच्या 20 आमदारांनी केले मतदान

Rajya Sabha Election 2022 : शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या घरी पूजाअर्चा सुरु; संजय पवार यांचा विजय होईल, पत्नी ज्योत्स्ना पवार यांच्याकडून विश्वास व्यक्त

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या घरी पूजाअर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार संजय पवार यांच्या पाठिशी उभे राहतील आणि त्यांचा विजय होईल असा विश्वास संजय पवार त्यांच्या पत्नी जोस्त्ना पवार यांनी व्यक्त केला आहे. बाळसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद कायम राहिला आहे. त्यामुळे शाखा प्रमुख ते खासदार असा प्रवास राहिला आहे.

Rajya Sabha Election 2022  : पहिल्या तासात राष्ट्रवादीच्या 25, तर भाजपच्या 22 तर काँग्रेसच्या 15 आमदारांनी केले मतदान

Rajya Sabha Election 2022  : पहिल्या तासात 60 पेक्षा अधिक आमदारांनी केले मतदान, राष्ट्रवादीच्या 25, तर भाजपच्या 22 आमदारांचे मतदान, काँग्रेसच्या 15 आमदारांनी केले मतदान

Rajya Sabha Election 2022 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात विधानभवनाकडे रवाना होणार

 Rajya Sabha Election 2022 :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात विधानभवनाकडे रवाना होणार

Rajya Sabha Election 2022 : महाविकास आघाडीच्या दोन मतांचा फैसला थोड्याच वेळात

Rajya Sabha Election 2022 : देशमुख, मलिकांबाबत निर्णय झाल्यानंतर पुढची रणनीती ठरवणार

Rajya Sabha Election 2022 : हायकोर्टाच्या निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उर्वरित आमदार मतदान करणार; देशमुख, मलिकांबाबत निर्णय झाल्यानंतर पुढची रणनीती ठरवणार

Rajya Sabha Election 2022 : शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या घरी पूजाअर्चा सुरू

 Rajya Sabha Election 2022 :   शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांच्या घरी पूजाअर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार पवार साहेब यांच्या पाठीशी उभा राहतील..संजय पवार साहेब यांचा विजय होईल असा विश्वास संजय पवार त्यांच्या पत्नी जोस्त्ना पवार यांनी व्यक्त केला आहे... बाळसाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद कायम राहिला आहे...त्यामुळे शाखा प्रमुख ते खासदार असा प्रवास राहिला आहे, असं त्यांनी म्हटलं

 Rajya Sabha Election 2022 :  शिवसेना आमदार विधानभवनात पोहोचले

 Rajya Sabha Election 2022 :  शिवसेना आमदार विधानभवनात पोहोचले

 Rajya Sabha Election 2022 :  महाविकास आघाडीच्या दोन मतांचा फैसला थोड्याच वेळात, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी

 Rajya Sabha Election 2022 :  महाविकास आघाडीच्या दोन मतांचा फैसला थोड्याच वेळात, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी


मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर होणार सुनवणी


मुंबई सत्र न्यायलयानं परवानगी नाकारल्याच्या निर्णयाला देशमुख आणि मलिकांकडून हायकोर्टात आव्हान

Rajya Sabha Election 2022 : कर्करोगाशी झुंज देत असलेल्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्समधून मतदानासाठी विधानभवनात दाखल

Rajya Sabha Election 2022 : भाजपच्या पुण्यातील आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी विधानभवनात दाखल झाल्या आहेत. मुक्ता टिळक कर्करोगाशी झुंज देत आहेत. परंतु राज्यसभा निवडणुकीत एकही मत कमी पडू नये म्हणून मुक्ता टिळक अॅम्ब्युलन्समधून मतदानासाठी मुंबईत आल्या आहेत.

Rajya Sabha Election 2022 : मतदानासाठी शिवसेनेचे आमदार ट्रायडंट हॉटेलमधून विधानभवनाकडे पायी रवाना

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी शिवसेनेचे आमदार ट्रायडंट हॉटेलमधून रवाना झाले आहेत. आमदार बसने न जाता चालत विधानभवनात दाखल होणार आहेत. निकालानंतर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेवर गेलेले दिसतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते उदय सामंत यांनी दिली.

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, पहिल्या तासात 285 पैकी 60 पेक्षा जास्त आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला

Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीच्या मतदाना 9 वाजता सुरुवात झाली. पहिल्या तासात 285 पैकी 60 पेक्षा जास्त आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  राष्ट्रवादीच्या 25, भाजपच्या 22 आणि काँग्रेसच्या 15 हून अधिक आमदारांनी मतदान केलं.

Rajya Sabha Election 2022 : राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं दोन मतांचा कोटा वाढवला, शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचं टेन्शन वाढवलं
Rajya Sabha Election 2022 : चारही उमेदवार निवडून येतील एवढं संख्याबळ आमच्याकडे : आमदार दत्तात्रय भरणे

Rajya Sabha Election 2022 : "पहिलं मतदान करण्याचा मान मला मिळालं. आमचे चारही उमेदवार निवडून येतील एवढं संख्याबळ आमच्याकडे आहे. आम्हाला कुठलीही चिंता नाही. महाविकास आघाडीत कुठल्या प्रकारचे मतभेद नाहीत. काही गोष्टी असल्या तरी त्यावर चर्चा होऊन विषय संपला आहे," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Rajya Sabha Election 2022 : बहुजन विकास आघाडीचे तीनही आमदार दुपारी दोन वाजता मतदान करणार, हिंतेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मतं कोणाला याबाबत सस्पेन्स कायम

Rajya Sabha Election 2022 : बहुजन विकास आघाडीचे तीनही आमदार दुपारी दोन वाजता मतदान करणार आहेत. हिंतेंद्र ठाकूर यांच्या पक्षाची तीन मतं कोणासाठी याबाबत सस्पेन्स कायम आहे.

Rajya Sabha Election 2022 : धोका नको म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने कोटा वाढवला; शिवसेना उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मतं कमी होणार

Rajya Sabha Election 2022 : धोका नको म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कोटा वाढवला. शिवसेना उमेदवाराची पहिल्या पसंतीची चार मतं कमी होणार आहे. शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचं टेंशन वाढलं. 

Rajya Sabha Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची दुसरी टीम हॉटेल सेंट रेजीसमधून रवाना

Rajya Sabha Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची दुसरी टीम हॉटेल सेंट रेजीसमधून रवाना झाले आहेत. बबन शिंदे,  बाबासाहेब पाटील, यशवंत माने, राजेश पाटील, बाळासाहेब आजबे यांचा दुसऱ्या टीममध्ये समावेश आहे. आम्हाला कोणतंही टेंशन नाही, विजय आमचाच होणार, असा विश्वास आमदारांनी व्यक्त केला आहे.

 Rajya Sabha Election 2022 : मतमोजणीला भाजपाने 35 आमदारांचे गट केले, मतमोजणीला एकूण 11 नेते असतील

 Rajya Sabha Election 2022 : मतमोजणीला भाजपाने 35 आमदारांचे गट केले आहेत.  मतमोजणीला एकूण 11 नेते असतील. त्यात ५ मत मोजणीसाठी तर ६ रिलिव्हर म्हणून काम करतील. त्याप्रमाणे भाजपा आमदार टप्प्याटप्प्याने मतदान करतील

Rajya Sabha Election 2022 : आमदार दिलीप मोहिते पाटील आणि अण्णा बनसोडेंशी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संवाद

खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे या दोन्ही आमदारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः संपर्क केला. यामधे दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी अजित पवार यांनी दूर केली आहे तर अण्णा बनसोडे हे तब्येत ठीक नव्हती त्यामुळे आले नव्हते. मात्र हे दोघेही मतदानासाठी पोहोचणार आहेत

Rajya Sabha Election 2022 : दिलीप मोहिते पाटील आणि अण्णा बनसोडे मतदानाला उपस्थित राहणार

Rajya Sabha Election 2022 : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि अण्णा बनसोडे नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या आमदारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः संपर्क केला. यामधे दिलीप मोहिते पाटील यांची नाराजी अजित पवार यांनी दूर केली आहे तर अण्णा बनसोडे हे तब्येत ठीक नव्हती त्यामुळे आले नव्हते माञ हे दोघेही मतदानासाठी पोहचणार आहेत. 

Rajya Sabha Election 2022 : राष्ट्रवादीच्या 20 आमदारांनी आतापर्यंत मतदान केलं

पिंपरी चिंचवडमधील काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंमुळं महाविकास आघाडीच्या गोटात चिंता वाढली

पिंपरी चिंचवडमधील काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडेंमुळं महाविकास आघाडीच्या गोटात चिंता वाढली. बनसोडे फोन उचलत नसल्याने ते नेमके कुठं आहेत, याबाबत सगळेच अनभिज्ञ आहेत. त्यामुळं ते मतदानाला येणार की नाही? अशी साशंकता निर्माण झालीये.

Rajya Sabha Election 2022 : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचं सर्वात आधी मतदान

 Rajya Sabha Election LIVE :  मतदानाला सुरुवात मात्र शिवसेना आमदार अजूनही ट्रायडेंट हाॅटेलमध्येच

 Rajya Sabha Election LIVE :  मतदानाला सुरुवात मात्र शिवसेना आमदार अजूनही ट्रायडेंट हाॅटेलमध्येच, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे अनेक आमदार विधानभवनात दाखल 


मात्र मोजके शिवसेनेचे आमदार सोडता अनेक आमदार अजूनही ट्रायडेंट हाॅटेलवर 


शिवसेनेच्या दोन्ही बसेस अजूनही ट्रायडेंट हाॅटेल बाहेरच उभ्या

Rajya Sabha Election LIVE : महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील हा आम्हाला विश्वास - भाई जगताप 

महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील हा आम्हाला विश्वास. आज संध्याकाळी आम्ही गुलाल उधळणार. देशमुख आणि मलिकांना मतदानाचा अधिकार नाकारल्यानं आमची तीव्र नाराजी- भाई जगताप 

Rajya Sabha Election LIVE : मंत्री दत्ता भरणे यांनी बजावला पहिला मतदानाचा हक्क

Rajya Sabha Election LIVE :   मंत्री दत्ता  भरणे यांनी बजावला पहिला मतदानाचा हक्क

Rajya Sabha Election LIVE : राज्यसभेचे विधानभवनात दाखल उमेदवार

राज्यसभेचे विधानभवनात दाखल उमेदवार


१) अनिल बोंडे


२) धनंजय महाडिक


३) इम्रान प्रतापगढी


४) संजय पवार


५) प्रफुल्ल पटेल

Rajya Sabha Election LIVE : राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, 4 वाजेपर्यंत आमदार करु शकणार मतदान

Rajya Sabha Election LIVE : राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, 4 वाजेपर्यंत आमदार करु शकणार मतदान

Rajya Sabha Election LIVE :

Rajya Sabha Election LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील पनवेलपर्यंत पोहोचले, राज्यसभेच्या मतदानासाठी वेळेत पोहोचेन, पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिलीय.

Rajya Sabha Election LIVE : आमदार लक्ष्मण जगताप महामार्गाद्वारेच मुंबईला मतदानासाठी जातील

 Rajya Sabha Election LIVE :  आमदार लक्ष्मण जगताप हे महामार्गाद्वारेच मुंबईला मतदानासाठी जातील. ऍम्ब्युलन्स मधूनच ते प्रवास करतील. एअर ऍम्ब्युलन्स ही तयार ठेवलेली होती, मात्र हवामानात वारंवार बदल होत असल्यानं डॉक्टरांनी महामार्गाने जाण्याचा सल्ला दिलाय. : शंकर जगताप - आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ

 Rajya Sabha Election LIVE : भाजप आमदारांची दुसरी बस देखील विधानभवनात दाखल
 Rajya Sabha Election LIVE : भाजप आमदार असलेली एक बस भरून विधानभवनात पोहोचली, भाजपचे सर्व आमदार पोहोचले

 Rajya Sabha Election LIVE : भाजप आमदार असलेली एक बस भरून विधानभवनात पोहोचली, भाजपचे सर्व आमदार पोहोचले

 Rajya Sabha Election LIVE :  राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची आत्तापर्यंत पार पडलेल्या बैठकांना दांडी,

 Rajya Sabha Election LIVE :  राष्ट्रवादीच्या दोन आमदारांची आत्तापर्यंत पार पडलेल्या बैठकांना दांडी, खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील आणि पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे आत्तापर्यंतच्या बैठकांना अनुपस्थित असल्याचं समोर


दिलीप मोहिते यांची मुख्यमत्र्यांवर नाराजी तर अण्णा बसनोडे प्रकृती ठिक नसल्याने बैठकीला उपस्थित नसल्याचं समोरं


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दोन्ही आमदारांशी बोलणं झालं असून आज दोन्हीं आमदार मतदानासाठी उपस्थित राहणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती

 Rajya Sabha Election LIVE : राज्यसभेच्या 6 जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार

 Rajya Sabha Election LIVE : राज्यसभेच्या 6 जागांसाठी थोड्याच वेळात मतदानाला सुरुवात होणार आहे. सकाळी नऊ ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडेल त्यानंतर पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सातवा उमेदवार दिल्याने भाजप आणि महाविकासआघाडी साठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. राष्ट्रवादीचे दोन आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना कोर्टाने परवानगी दिली तर कोटा हा ४२ चा होणार आहे. जर परवानगी नाकारली तर ४१ चा कोटा होणार आहे

Rajya Sabha Election LIVE : राज्यसभा निवडणुकीत एमआयएमचा पाठिंबा महाविकास आघाडीला, खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा

Rajya Sabha Election LIVE : राज्यसभा निवडणुकीत एमआयएमचा पाठिंबा महाविकास आघाडीला, खासदार इम्तियाज जलील यांची घोषणा

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारली

राज्यातल्या महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (शुक्रवारी) मतदान होणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करत या दोघांनी कोर्टात अर्ज केला होता. अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोघेही कोठडीत आहेत. .

राज्यसभा निवडणुकीसाठी विजयी उमेदवाराचा कोटा बदलला

राज्यसभेतील (Rajya Sabha Election 2022) विजयी उमेदवारांचा कोटा आता कमी करण्यात आला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाला परवानगी नाकारल्यानंतर आता विजयी उमेदवाराचा कोटा 40.71 इतका झाला आहे. या आधी तो 41.14 इतका होता. या आधी निवडून येण्यासाठी 42 मतांची गरज असायची. आता विजयी उमेदवाराचा कोटा बदलल्याने त्यासाठी 41 मतांची गरज आहे. 


राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर हा कोटा बदलण्यात आला आहे. समाजवादी पक्ष, एमआयएम सारखे लहान पक्ष आता महाविकास आघाडीकडे झुकले असल्याने महाविकास आघाडीसाठी हा बदललेला कोटा फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं आहे. 

कशी होणार निवडणूक?

  • राज्यसभेसाठी 10 जूनला सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 

  • 4 वाजेनंतर मतदान मोजायला सुरुवात होईल.

  • विधानभवनाच्या सेंट्रल हाॅलमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल

  • मतदान करणार त्या ठिकाणी बुथ कंपार्टमेंट सहा फुटांचा असणार

  • मतदान करताना सदस्यांना मोबाईल बाहेर ठेवून आतमध्ये जाता येणार

  • प्रत्येक पक्षाचा एक प्रतिनिधी आतमध्ये असणार


 

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पहायला मिळत आहे. येत्या 10 जूनला म्हणजेच, आज होणाऱ्या या निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी भाजपसह महाविकास आघाडीला आपल्या पक्षातील आमदारांसह अन्य पक्षांवर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यातच महाविकास आघाडीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तर नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या कारागृहात आहेत. या अटीतटीच्या निवडणुकीत त्यांना मतदान करता यावं यासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील होती. त्यामुळे आपल्याला मतदान करता यावं यासाठी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी न्यायालयात अर्ज केला होता. आता त्यांना मतदान करता येणार नाही, असा निकाल न्यायालयाने दिला आहे. 


 

सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात 

विद्यमान संख्याबळानुसार राज्यात भाजपचे दोन आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र तिन्ही पक्षातील उर्वरित मतांच्या जोरावर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे, तर भाजपनेही उर्वरित मतांच्या आणि अपक्षांच्या मतांवर दावा करत कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे.

सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार

 


आज राज्यातील राज्यसभेच्या जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात. विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत. 

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने (Shiv Sena) आमदारांना व्हिप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेना आणि भाजपनं (BJP) आपापल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलं आहे. 

पार्श्वभूमी

Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा (Rajya Sabha Election 2022 Live Update) उडाल्याचं पाहायला मिळालं.  राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी झाले. निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला असून भाजपकडून राज्यात सगळीकडे जल्लोष साजरा केला जात आहे.


महाविकास आघाडीतील 3 आणि भाजपचे 3 असे उमेदवार विजयी झाले. प्रफुल्ल पटेल  (राष्ट्रवादी काँग्रेस- 43) इम्रान प्रतापगढी (काँग्रेस- 44),  संजय राऊत (शिवसेना- 42) आणि एकट्या भाजपचे तीन उमेदवार पियुष गोयल (भाजप- 48) अनिल बोंडे (भाजप- 48) धनंजय महाडिक (भाजप-42) यांनी बाजी मारली.


राज्यसभेच्या निवडणुकीत यावेळी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. निवडणुकीच्या निकालासाठी पहाट झाली. भाजपने यावेळी उत्तम कामगिरी बजावत बाजी मारल्याने पुण्यासह इतर शहरात पहाटेपासून भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.


भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यामुळे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48-48 मते मिळाली. आमच्या तिसर्‍या उमेदवाराला मते मिळाली. शिवसेनेपेक्षा जास्त मते मिळाली, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.






फडणवीसांच्या कामाचं सर्वत्र कौतुक


या विजयामुळे देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील फडणवीसांंचं कौतुक केलंय. सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावे लागेल असेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे पवार यांनी म्हटले, अशा शब्दात शरद पवारांनी फडणवीसांचंं कौतुक केलं.


महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. त्यात प्रफुल्ल पटेल  (राष्ट्रवादी काँग्रेस- 43) इम्रान प्रतापगढी (काँग्रेस- 44),  संजय राऊत (शिवसेना- 42) यांनी विजय मिळवला. राज्य सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारसाठी आवश्यक असणारे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे हे या मतांवरून स्पष्ट दिसून येत असल्याचे पवार यांनी म्हटले. 





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.