एक्स्प्लोर

Rajya Sabha Election Maharashtra Results Celebration 11 June Live : आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले - देवेंद्र फडणवीस

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभेच्या सहापैकी पाच जागांचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात या विजयाचं सेलिब्रेशन सुरु आहे. पाहा प्रत्येक अपडेट्स....

LIVE

Key Events
Rajya Sabha Election Maharashtra Results Celebration 11 June Live :  आपण जिंकल्यानंतर अनेकांच्या तोंडाचं पाणी पळाले - देवेंद्र फडणवीस

Background

Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा (Rajya Sabha Election 2022 Live Update) उडाल्याचं पाहायला मिळालं.  राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी झाले. निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला असून भाजपकडून राज्यात सगळीकडे जल्लोष साजरा केला जात आहे.

महाविकास आघाडीतील 3 आणि भाजपचे 3 असे उमेदवार विजयी झाले. प्रफुल्ल पटेल  (राष्ट्रवादी काँग्रेस- 43) इम्रान प्रतापगढी (काँग्रेस- 44),  संजय राऊत (शिवसेना- 42) आणि एकट्या भाजपचे तीन उमेदवार पियुष गोयल (भाजप- 48) अनिल बोंडे (भाजप- 48) धनंजय महाडिक (भाजप-42) यांनी बाजी मारली.

राज्यसभेच्या निवडणुकीत यावेळी हाय होल्टेज ड्रामा बघायला मिळाला. निवडणुकीच्या निकालासाठी पहाट झाली. भाजपने यावेळी उत्तम कामगिरी बजावत बाजी मारल्याने पुण्यासह इतर शहरात पहाटेपासून भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांकडून विजयाचा जल्लोष साजरा केला जात आहे.

भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाल्यामुळे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. पियुष गोयल आणि अनिल बोंडे यांना प्रत्येकी 48-48 मते मिळाली. आमच्या तिसर्‍या उमेदवाराला मते मिळाली. शिवसेनेपेक्षा जास्त मते मिळाली, अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.

फडणवीसांच्या कामाचं सर्वत्र कौतुक

या विजयामुळे देवेंद्र फडणवीसांच्या कामाचं सर्वत्र कौतुक होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील फडणवीसांंचं कौतुक केलंय. सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावे लागेल असेही त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विविध मार्गाने या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात यश आले असल्याचे पवार यांनी म्हटले, अशा शब्दात शरद पवारांनी फडणवीसांचंं कौतुक केलं.

महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. त्यात प्रफुल्ल पटेल  (राष्ट्रवादी काँग्रेस- 43) इम्रान प्रतापगढी (काँग्रेस- 44),  संजय राऊत (शिवसेना- 42) यांनी विजय मिळवला. राज्य सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारसाठी आवश्यक असणारे संख्याबळ महाविकास आघाडीकडे आहे हे या मतांवरून स्पष्ट दिसून येत असल्याचे पवार यांनी म्हटले. 

15:44 PM (IST)  •  11 Jun 2022

राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनीच आम्हाला मदत केली - आमदार संतोष दानवे

राज्यसभा निवडणुकीत अब्दुल सत्तारांनीच आम्हाला मदत केली,गद्दारांच्या यादीत अब्दूल सत्तार यांचं नाव पहिलं असायला हवं अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे यांनी दिलीय. राज्यसभा निवडणुकीत सत्तारांनी भाजपला मदत केल्याचा आमदार संतोष दानवे यांनी दावा केलाय... काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे फुटून महाविकास आघाडी ला मतदान करतील असा दावा केला होता, त्याला  प्रत्युत्तर देताना आमदार संतोष दानवे यांनी हा नवीन दावा केलाय.

15:20 PM (IST)  •  11 Jun 2022

अपक्षांना बदनाम करून चालणार नाही; महाविकास आघाडीचा गेम बिघडला कारण...: बच्चू कडू

...म्हणून महाविकास आघाडीचा गेम बिघडला; बच्चू कडूंची प्रतिक्रिया

Bacchu Kadu On Rajya Sabha Election : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu यांनी देखील राऊतांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. 

14:45 PM (IST)  •  11 Jun 2022

Nanded : नांदेड - राज्यसभा निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या यशाचा पेढे वाटून व आतिषबाजी करून कार्यकर्त्यांचा जल्लोष

राज्यसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचा नांदेडमध्ये भाजपने जल्लोष साजरा केलाय. ढोल ताश्याच्या आवाजावर भाजप कार्यकर्त्यांनी भांगडा करत व नाचत,आनंदोत्सव साजरा केलाय. यावेळी पेढे वाटून व फटाक्याची मोठया प्रमाणात आतिषबाजी करण्यात आली

13:56 PM (IST)  •  11 Jun 2022

Kolhapur : "शोले'मधला रुपया माझ्याकडे आहे, कसाही उडवा, महाडिकच जिंकणार", अप्पा महाडिक, नाम तो सुना होगा!

'शोले'मधला रुपया माझ्याकडे आहे, कसाही उडवा, महाडिकच जिंकणार', अप्पा महाडिक, नाम तो सुना होगा!

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला अप्पा महाडिक हे नाव माहित नाही असं एकही घर नसेल... जी कॉलर उडवण्याची स्टाईल उदयनराजेंमुळे महाराष्ट्राला परिचीत आहे, ती सर्वात आधी अप्पा महाडिकांची स्टाईल होती.

13:41 PM (IST)  •  11 Jun 2022

Rajya Sabha Election 2022 : काँग्रेसनं 44 मतं घेतली हा संशोधनाचा विषय! मविआमध्ये 42चा कोटा ठरला होता : प्रफुल्ल पटेल

मविआमध्ये 42चा कोटा ठरला होता : प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मी अधिकृतपणे सांगू शकतो की आम्ही आमचे 51 मत व्यवस्थित वापरले आहे. कुठेही एकही मतचा नुकसान झालेला नाही. आमच्या आमदारांनी ठरल्याप्रमाणेच मतदान केलेः प्रफुल्ल पटेल

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Embed widget