Jayant Patil on Ajit Pawar : मी काही अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखे खासगी साखर कारखाने खरेदी करत बसलो नाही किंवा खासगी कारखाने काढण्याचे स्वप्न आम्ही बघत नाही असे म्हणत जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारसभेत जयंत पाटील बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
आष्टामधील सभेत अजित पवार यांनी संभाजी पवारांचा कारखाना जयंत पाटील यांनी घेतला असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाला आज जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही किंवा आमचे कारखाने बळकवण्याचीही भूमिका नाही असे जयंत पाटील म्हणाले. राजाराम बापू साखर कारखाना हा काय माझा खासगी कारखाना नाही. तर तो सहकारी साखर कारखाना असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले. सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. खानापुरात धनुष्यबाण आणि तुतारीमध्ये लढत होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध शरद पवार गटाकडून वैभव पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे.
साखर कारखाने सुरु व्हावेत ही आमची भूमिका
धुराडं पेटवणार म्हणजे काय? आम्ही साखर कारखाने सुरु व्हावेत ही आमची भूमिका आहे. साखर कारखाने बळकावण्याची आमची भूमिका नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. आष्टामध्ये एका नेत्याने सांगितले की संभाजी पवार यांचा कारखाना जयंत पाटील यांनी घेतला. संभाजी पाटील यांना डोळ्यातून अश्रू काढले, हा कारखाना चुमच्याकडे घ्या म्हणाल्याचे जयंत पाटील म्हणाले. मी यावेळी बँकांना बोलावलं, वन टाईम सेटलमेंट केलं, 70 75 कोटी रुपये होते. राजारमबापू कारखान्यानं ते पैसे भरले, त्यातून कारखाना सोडवल्याचे जयंत पाटील म्हणाले. पाच वर्ष आम्ही कारखाना चालवू, शेवटच्या दोन वर्षात त्यांनी पैसे द्यावेत आणि त्यांनी साखर कारखाना ही प्रक्रिया होती. ही प्रक्रिया त्यांनी केली नाही. त्यामुळ राजारामबारू हा कारखाना माझा खासगी कारखाना नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. आम्ही सहकारातील लोक आहोत. सहकाराशी प्रामाणिक राहू असे जयंत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
जयंत पाटलांना पाडणं एवढं सोपं नाही, अजून बारामतीत गेलो नाही, जयंत पाटलांचं अजितदादांना थेट आव्हान!