मोठी बातमी! राजस्थानात भाजप 100 जागांवर आघाडीवर

Rajasthan Assembly Election Results 2023 : चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत असून, राजस्थानमध्ये भाजपचा करिश्मा पाहायला मिळत आहे. राजस्थानात भाजप 100 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान करण्यात आले. त्यामुळे आता संपूर्ण जनेतसह राजकारणी देखील अंतिम निक्लाची वाट पाहत आहे. दरम्यान राजस्थानमध्ये काँग्रेस आपली सत्ता टिकवण्यात यशस्वी होणार की भाजप बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्या राजस्थानमध्ये भाजप 101 जागांवर तर काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर आहे.
(ही ब्रेकिंग न्यूज अपडेट होत आहे. लेटेस्ट अपडेटसाठी रिफ्रेश करा)



















