एक्स्प्लोर

Raj Thackeray: राज ठाकरेंनी शेवटच्या प्रचारसभेत भाजप अन् शिवसेना शिंदे गटाचे मानले आभार; उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Raj Thackeray Maharashtra Vidhan Sabha Election 2024: शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी आज जाहीर सभा घेतली. 

Raj Thackeray Bala Nandgaonkar मुंबई: बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना व्हीलचेअरवर बघून मला जनता पक्षाचा काळ आठवला. जयप्रकाश असेच भाषण करायचे. विधानसभेची आज माझी ही शेवटची सभा आहे. प्रत्येकवेळी शेवटची सभा इकडेच असते. 20 तारखेला मतदान असणार आहे. त्यावेळी 2 नंबरवर असलेल्या बाळा नांदगावकरांना एक नंबरवर आणायची जबाबदारी तुमच्यावर आहे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं. शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी आज जाहीर सभा घेतली. 

राज ठाकरेंनी भाजप अन् शिवसेना शिंदे गटाचे मानले आभार

शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आमच्या बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिल्याने मी त्यांचे आभार मानतो. असे आभार अनेक मतदार संघात मानता आले असते... पण जाऊदेत, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राचा एकोपा होता. पण आपण सर्व विसरलो, का तर यांच्या स्वार्थासाठी, असंही राज ठाकरेंनी सांगितले. 

उत्तर प्रदेश बिहारसारखे अवस्था महाराष्ट्रात होऊ नये- राज ठाकरे

2019 ला शिवसेना भाजपला लोकांनी मतदान केले आणि मग युती तोडून मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांच्या विरोधात होते त्यांच्यासोबत गेले. हे कोणते राजकारण आहे?, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. या महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये लढत शरद पवारांनी घडवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर हे सर्व सुरू झाले, असा आरोप राज ठाकरेंनी केला. तसेच राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे. उत्तर प्रदेश बिहारसारखे अवस्था महाराष्ट्रात होऊ नये, असं राज ठाकरे म्हणाले.

...मग उद्धव ठाकरे आडवा येतो कसा?; राज ठाकरेंचा हल्लाबोल

मी मशिदीवरचे भोंगे उतरविले...आले पण खाली आहे. हनुमान चालीसा म्हणणार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि माझ्या 17 हजार मानसैनिकांवर केसेस टाकल्या. बाळासाहेब ठाकरे स्वत: म्हटलं होते की भोंगे उतरवा आणि राज ठाकरे करतो...तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. दरम्यान, गेल्या 5 वर्षात काय केले या सगळ्याची उजळणी करा..सर्व आठवा आणि  मग 20 तारखेला बाळा नांदगावकरांना मतदान करा...मनसेचे राज्यातील जे उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या..., असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. 

भोंग्यांचा विषय, राज ठाकरे म्हणाले..उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?, Video:

संबंधित बातमी:

Sanjay Raut: तुम्ही ठाकरे आहात तर ठाकरेंसारखं वागा, दिल्लीचे बूट चाटू नका; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना

व्हिडीओ

Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report
Mahapalikecha Mahasangram Sangli : सांगली महानगरपालिकेत कोणाचा गुलाल? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Amravati : रस्ते नालेसफाईच्या मुद्द्यावरून अमरावतीकरांचा संतप्त सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
कोण होतास तू, काय झालास तू? अमित शाहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget