(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi : महाराष्ट्रातील पराभव अन् झारखंडमधील विजयावर राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी झारखंडमधील विजयावर आणि महाराष्ट्रातील पराभवावर भाष्य केलं आहे.
नवी दिल्ली : देशातील दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला तर झारखंडमध्ये इंडिया आघाडीनं पुन्हा सत्ता मिळवली आहे. महाराष्ट्रातील पराभवावर आणि झारखंडमधील विजयावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असल्याची प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी काय म्हणाले?
झारखंडच्या लोकांनी इंडिया आघाडीला मोठं बहुमत दिलं त्याबद्दल जनतेचे आभार मानतो. मुख्यमंत्री हेमंत सोरेन, काँग्रेसचे आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा असं राहुल गांधी म्हणाले. झारखंडमधील इंडिया आघाडीचा विजय संविधानासह जल, जंगल आणि जमिनीचं संरक्षण करेल, असं राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्रातील निकाल अनपेक्षित असून आम्ही याचं विश्लेषण करणार आहोत, असं राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातील भावा बहिणींचं आणि सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीसाठी धन्यवाद देतो, असं राहुल गांधी म्हणाले.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काय घडलं?
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या. महायुतीला 17 जागा मिळाल्या होत्या.मात्र , विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपनं 133 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यापैकी 98 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेनेला 57 जागांवर आघाडी असून 46 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागांवर आघाडी असून 36 जागा मिळाल्या आहेत.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10, समाजवादी पार्टीला 2 जागांवर यश मिळताना दिसून येतंय. माकपचे विनोद निकोले देखील विजय झाले आहेत.
राहुल गांधी यांचं ट्विट
झारखंड के लोगों का INDIA को विशाल जनादेश देने के लिए दिल से धन्यवाद। मुख्यमंत्री हेमंत सोरेन जी, कांग्रेस और झामुमो के सभी कार्यकर्ताओं को इस विजय के लिए हार्दिक बधाई और शुभकामनाएं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 23, 2024
प्रदेश में गठबंधन की यह जीत संविधान के साथ जल-जंगल-ज़मीन की रक्षा की जीत है।
महाराष्ट्र के नतीजे…
काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत :
महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्याचं पाहायला मिळालं. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, के.सी. पाडवी, यशोमती ठाकूर, माणिकराव ठाकरे यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सत्ता
झारखंड विधानसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस, राजद यांच्या आघाडीनं सत्ता मिळवली आहे. झारखंडमध्ये इंडिया आघाडी पुन्हा सत्तेत आली आहे. झारखंडमधील 81 विधानसभा मतदारसंघांपैकी इंडिया आघाडीला 56 जागांवर विजय मिळेल अशी स्थिती आहे. त्यापैकी 50 जागा इंडिया आघाडीनं जिंकल्या आहेत. भाजपला झारखंडमध्ये 21 जागांवर विजय मिळाला आहे.
इतर बातम्या :