एक्स्प्लोर

VIDEO | पाचच मतं मिळाल्याने रडणाऱ्या अपक्ष उमेदवाराला प्रत्यक्षात 856 मतं

नीतू वाला यांनी जालंधरमधून अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र मतमोजणीत पाचच मतं मिळाल्याचं समोर आलं

जालंधर : घरात नऊ सदस्यांनी मतदान केलं असतानाही, निव्वळ पाच मतं पडल्यामुळे रडणाऱ्या पंजाबमधील अपक्ष उमेदवाराबाबत वेगळीच माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार नीतू वाला यांना 856 मतं पडली आहेत. त्यामुळे वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तथ्य नसल्याचं दिसत आहे. कुटुंबीयांच्या पाठिंब्याशिवाय राजकारणात यशस्वी होता येत नाही, असं अनेक दिग्गज राजकारणी सांगतात. जालंधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार नीतू वाला यांना याचा प्रत्यय आल्याचं सुरुवातीला वाटत होतं. घरात नऊ सदस्यांनी मतदान केलं असतानाही, आपल्याला निव्वळ पाच मतं पडली, असं सांगत वाला रडत होते. आपल्याला किती मतं मिळाली ते पाहण्यासाठी ते मतमोजणी केंद्रावर गेले. जोरदार प्रचार केल्यामुळे आपल्याला शेकड्याच्या घरात मतं मिळाली, की हजाराच्या, याची उत्सुकता नीतू यांच्या मनात होती. मात्र कोणास ठावूक त्यांना पाचच मतं मिळाल्याचं समजलं. पाचच मतं मिळाल्याचं समजून हताश झालेल्या नीतू वाला यांना एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हा मुद्दा धरुन प्रश्न विचारला होता. त्यावेळी कुटुंबीयांनी आपल्यासोबत गद्दारी केल्याची भावना बोलून दाखवत असतानाच त्यांना कॅमेरासमोरच अक्षरश: रडू कोसळलं. कुटुंबीयांना दोष देतानाच त्यांनी ईव्हीएमवरही खापर फोडलं. नीतू यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. नीतू वाला यांना प्रत्यक्षात 856 मतं मिळाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. कदाचित प्राथमिक फेरीतील हे कल समजल्यानंतर त्यांनी घाईघाईतच प्रतिक्रिया नोंदवली असावी. लोकसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना सत्ता दिली आहे. विशेष म्हणजे यंदा भाजप आणि मित्रपक्षांना गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला पुन्हा एकदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
Inflation : देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार? आरबीआयच्या बैठकीकडे लक्ष
देशामध्ये महागाईचा भडका, आरबीआयची नियंत्रण रेषा ओलांडली, कर्जाचा EMI वाढणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget