Pune Zilla Parishad Election 2026: पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचं ठरलं, भाजपचाही पुन्हा स्वबळाची नारा; उद्धव ठाकरे अन् शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
Pune Zilla Parishad and Panchayat Election 2026 पुणे : राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात हालचालींना वेग आला असून राजकीय पक्ष स्थानिक स्थरावर मोर्चेबांधणी करताना दिसताय.

Pune Zilla Parishad and Panchayat Election 2026 पुणे : राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसंदर्भात हालचालींना वेग आला असून राजकीय पक्ष स्थानिक स्थरावर मोर्चेबांधणी करताना दिसताय. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी (Pune Zilla Parishad Election 2026) पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीने विशेष स्ट्रॅटेजी (NCP Alliance) आखली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसकडून घड्याळ आणि तुतारी वाजविणारा माणूस या पक्ष चिन्हांचा सोयीनुसार वापर करण्यात येणार आहे. जिथे जे चिन्ह फायद्याचं ठरेल तिथे ते चिन्ह वापरून उमेदवार उभे केले जाणार, अशी माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, पुण्यातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपने देखील पुन्हा एकदा स्वबळाचा नारा दिलाय. भाजप महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणूक देखील स्वबळावर लढणार आहे.
नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. भाजपने तब्बल 119 जागी विजय मिळवला आहे. तर अजित दादांच्या राष्ट्रवादीला 27 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 3 तर, ठाकरेंच्या शिवसेनेला अवघ्या एका जागी यश आले आहे. अशातच आता अजित पवार आणि शरद पवार या दोघांची राष्ट्रवादी देखील जिल्हा परिषद निवडणूक महापालिकेप्रमाणेच एकत्र लढण्याची तयारी केली आहे. सोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना काही ठिकाणी स्वबळावर, तर काही ठिकाणी राष्ट्रवादीसोबत युती करणार आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना काही ठिकाणी स्वबळावर लढणार आहे. तर काही ठिकाणी काँग्रेससोबत युती करणार आहे. त्यामुळे महापालिकेत झालेल्या उभ्या आडव्या युत्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला भरघोस मताधिक्य मिळालं आता जिल्हा परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार हे बघावे लागणार आहे. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे त्यानंतर युतीच चित्र स्पष्ट होईल.
Pune Election Result 2026: पुणे महापालिका निकाल
एकूण जागा १६५
भाजप- ११९
शिवसेना -०
ऊबाठा-१
राष्ट्रवादी शरद पवार -३
राष्ट्रवादी अजित पवार -२७
काँग्रेस -१५
एमआयएम-०
अपक्ष-०
इतर -०
Pune Election Result 2026: पुणे कोण कोणासोबत लढला
१. भाजप-रिपाइं (आठवले) युती
२. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र
३. काँग्रेस-उद्धवसेना-मनसे आघाडी
४. शिंदेसेना स्वतंत्र.
५. वंचित स्वतंत्र.
Pune News : मावळात राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
वडगाव मावळमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले आहेत. यावेळी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने सामने आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसची पंचायत समिती चौकात सभा सुरू असताना त्यावेळी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यासह भाजपचे उमेदवार हे सभस्थळावरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले. यावेळी भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आमदार सुनील शेळके यांना नमस्कार केला तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे उमेदवार व नेते जात असताना एकच जल्लोष केला त्यामुळे भाजपचे जेष्ठ नेते गणेश भेगडे यांनी संताप व्यक्त करत अपशब्द वापरले.




















