एक्स्प्लोर

"असा अहंकार दुर्योधनमध्येही होता," प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

पंतप्रधान मोदींनी एका सभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटलं होतं. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती.

अंबाला : माजी पंतप्रधान राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर एक म्हटल्यानंतर काँग्रेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे. राजीव गांधी यांच्या कन्या आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आता मोदींवर निशाणा साधत आहेत. हरियाणाच्या अंबालामधील एका सभेत प्रियांका गांधींनी पंतप्रधान मोदींची तुलना अप्रत्यक्षरित्या महाभारतातील दुर्योधनाशी केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेचा उल्लेख केला. प्रियांका गांधी म्हणाल्या की, "निवडणूक प्रचारात भाजप नेते कधी हे बोलत नाहीत की त्यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केली की नाहीत. कधी शहीदांच्या नावावर मतं मागतात, तर कधी माझ्या कुटुंबातील शहीदांचा अपमान करतात. त्यांनी माझ्या शहीद वडिलांचा अपमान केला आहे. ही निवडणूक एका विशिष्ट कुटुंबाची नाही. ही त्या सर्व कुटुंबांची आहे, ज्यांची आशा-अपेक्षा या पंतप्रधानांनी पूर्णत: तोडल्या. मोदींची दुर्योधनाशी तुलना प्रियांका गांधी म्हणाल्या की, "देशाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण देशाने अहंकाराला कधीही माफ केलेलं नाही. इतिहास याचा साक्षीदार आहे. महाभारतामध्येही जेव्हा श्रीकृष्ण दुर्योधनाला समजावण्यासाठी गेला होता तेव्हा त्यालाही कैद करण्याचा प्रयत्न झाला होता." यानंतर प्रियांका गांधींनी यावर रामधारी सिंह दिनकर यांची एक कविता ऐकवली. ती अशी, "जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है, हरि ने भीषण हुंकार किया, अपना स्वरुप-विस्तार किया, डगमग-डगमग दिग्गज डोले, भगवान कुपित होकर बोले-जंजीर बढ़ा कर साध मुझे, हां, हां दुर्योधन! बांध मुझे।" भाजपचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची दुर्योधनाशी तुलना केल्याने भाजपनेही पलटवार केला आहे. पश्चिम बंगालच्या रॅलीमध्ये भाजपचे अध्यक्ष अमित शाह म्हणाले की, "प्रियांकांनी मोदींची तुलना दुर्योधनाशी केली आहे. दुर्योधन कोण आहे आणि अर्जुन कोण आहे हे 23 मे (निकाल) रोजी सिद्ध होईल." राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर वन : मोदी पंतप्रधान मोदींनी एका सभेत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटलं होतं. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. तर राहुल गांधी यांनी मोदीजी, लढाई संपली आहे, कर्म तुमची वाट पाहत आहे अशी संयमी प्रतिक्रिया दिली होती. तर आजच्या सभेत प्रियांका गांधी म्हणाल्या की, "आमच्या देशाच्या जनतेमध्ये विवेक आहे, हा विवेक नवा नाही, अनेक वर्ष जुना आहे. तुम्ही देशाच्या जनतेची दिशाभूल करु शकत नाही. काँग्रेस ही निवडणूक मुद्द्यांवर लढत आहे."

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget