एक्स्प्लोर
निवडणुकांच्या तोंडावर बॉक्स ऑफिसवरही नमो वर्सेस रागा, राहुल गांधींवरील 'माय नेम इज रागा'चा टीझर प्रदर्शित
राहुल गांधींच्या बालपणापासून सुरु होणाऱ्या 'माय नेम इज रागा' या चित्रपटात त्यांच्या वयाचे विविध टप्पे दिसणार आहेत. वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी, बहीण प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह अशा विविध व्यक्तिरेखा त्यानंतर पडद्यावर दिसतात.
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय चरित्रपटांची संख्या दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 'माय नेम इज रागा' या सिनेमाचा ट्रीझर नुकताच रिलीज झाला.
टीझरच्या सुरुवातीलाच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येची घटना दिसते. राहुल गांधींच्या बालपणापासून सुरु होणाऱ्या या चित्रपटात त्यांच्या वयाचे विविध टप्पे दिसणार आहेत. वडील राजीव गांधी, आई सोनिया गांधी, बहीण प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह अशा विविध व्यक्तिरेखा त्यानंतर पडद्यावर दिसतात. लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर टीझरचा अखेर होतो.
रुपेश पॉल यांनी या चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता अश्विनी कुमार या चित्रपटात राहुल गांधींच्या भूमिकेत दिसत आहे. 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटात मनमोहन सिंहांची भूमिका साकारणारे अनुपम खेर या सिनेमातही तीच भूमिका साकारणार आहेत. तर हिंमत कपाडिया पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा सादर करत आहेत.
नुकतंच मनमोहन सिंग, बाळासाहेब ठाकरे यासारख्या राजकारणातील दिग्गजांवर चरित्रपट येऊन गेले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे 'नमो वर्सेस रागा' ही टक्कर बॉक्स ऑफिसवरपण रंगणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
पाहा टीझर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement