एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांना अल्बमसाठी 500 रुपये द्यायची इच्छा, येवल्याच्या 'त्या' अर्धनग्न तरुण शेतकऱ्याला नजरकैदेत ठेवले
2 दिवसांपूर्वी त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून कृष्णा डोंगरेने कुठलीही गडबड करू नये म्हणून काल संध्याकाळपासून स्थानिक पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या नागरसूल येथील कृष्णा डोंगरे हा तरुण शेतकरी शेतमालाला भाव नाही म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहे. सध्या त्याचे अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी त्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून कृष्णा डोंगरेने कुठलीही गडबड करू नये म्हणून काल संध्याकाळपासून स्थानिक पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत म्हणून मला त्यांच्या कुटुंबाने काढलेल्या अल्बमसाठी 500 रुपये द्यायचे होते. मात्र पोलिसांनी आपल्याला नजरकैदेत ठेवले असल्याचे त्याने एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
मोदी सरकार जाईपर्यंत कपडे न घालण्याचा तरुणाचा निर्धार
परवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सभा पार पडली. या सभेदरम्यान कृष्णा अर्धनग्न अवस्थेत शरद पवारांना निवेदन देण्यासाठी स्टेजवर गेला होता. भाजप सरकार राज्यातून आणि केंद्रातून जात नाही, तोपर्यंत आपण कपडे घालणार नसल्याचा निर्धार याकृष्णाने केला आहे.
कृष्णा मोदी सरकारचा निषेध म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. कृष्णाने जमिनीच्या प्रश्नावरुन काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. परंतु सरकारनं दडपशाही केल्याचा आरोप त्यानं केला आहे. त्यानंतर मार्च महिन्यात कृष्णाने आपले कपडे आणि चप्पल पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवले आहेत.
भाजप सरकार शेतकऱ्यासाठी काहीतरी करेल, या आशेने 2014 साली सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केलं. मात्र भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांची अवस्था आणखीच बिकट झाली आहे. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे केंद्रातून आणि राज्यातून भाजप सरकारला हटवलं पाहिजे. विधानसभेचं मतदान होईल त्यावेळी मी कपडे घालेन, असं कृष्णाने सांगितलं आहे. पोलिसांकडून माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही होत असल्याचा आरोप कृष्णाने केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement