एक्स्प्लोर

देशातली हवा मुंबईकरांना आधी समजते, मुंबईतील सभेत मोदींचा मध्यमवर्गीय-कोळी बांधवांना चुचकारण्याचा प्रयत्न

भाजप नाही, तर सर्व सर्व्हे म्हणत आहेत की एनडी 300 चा आकडा पार करेल. 325 च्या पार जाईल, 400 पर्यंत पोहचेल, देशातील सर्वात जुना पक्ष 50 चा आकडा तरी पार करेल, की 40 वरच थांबेल, अशी चर्चा असल्याचंही मोदी म्हणाले.

मुंबई : देशातली हवा मुंबईकरांना लवकर समजते, देशातली हवा भाजपसोबत आहे. काँग्रेसची स्थिती विदारक आहे. त्यांची अवस्था 2014 पेक्षाही वाईट होणार, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी वांद्र्यातील बीकेसीमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोदींनी मध्यमवर्गीयांसह कोळी बांधव, डबेवाले, टॅक्सीचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. कसं काय मुंबई? सगळं काही ठीक आहे ना? असं विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लौकिकानुसार मराठीत भाषणाला सुरुवात केली. मुंबादेवी, सिद्धिविनायक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन मोदींनी भाषणाला सुरुवात केली. माझे लहान भाऊ उद्धव ठाकरेजी असा उल्लेख करायलाही ते विसरले नाहीत. भाजप नाही, तर सर्व सर्व्हे म्हणत आहेत की एनडी 300 चा आकडा पार करेल. 325 च्या पार जाईल, 400 पर्यंत पोहचेल, देशातील सर्वात जुना पक्ष 50 चा आकडा तरी पार करेल, की 40 वरच थांबेल, अशी चर्चा असल्याचंही मोदी म्हणाले. स्वातंत्र्यानंतर 2014 मध्ये काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या, फक्त 44. तर 2019 मध्ये काँग्रेसने आतापर्यंत सर्वात कमी जागा लढवल्या आहेत, हे या निवडणुकीचं विशेष असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. मुंबईची जनता हवेची दिशा ओळखण्यात माहीर आहे. मत बरबाद करण्यात समजूतदारपणा आहे, की उपयुक्त ठरवण्यात आहे, याचा विचार करा, असंही मोदी म्हणाले. 'देशाच्या सांस्कृतिक नगरीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सामर्थ्य-समृद्धी असलेल्या नगरीतून आशीर्वाद घ्यायला आलो. आज उद्धव ठाकरेंचे जाहीर आभार मानतो की त्यांनी वाराणसीत यायला वेळ काढला.' अशा शब्दात मोदींनी उद्धव ठाकरेंचे आभार व्यक्त केले. काँग्रेस आता कन्फ्युजनचं दुसरं नाव झालंय. दुनिया बदलली, जमाना बदलला, हे मान्य करायला ते तयारच नाहीत. ही विकल्पची नाही संकल्पाची निवडणूक आहे, वाद्यांची नाही इराद्यांची निवडणूक आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले. मी मुंबईच्या समुद्र तटाला सुरक्षित ठेवणाऱ्या कोळी बांधवांचे आभार मानायला आलोय. काळी पिवळी टॅक्सी चालकांनी कधी मुंबईचा वेग कमी होऊ दिला नाही, त्यांचे आभार मानायला आलो आहे, असंही मोदींनी सांगितलं. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, अतिरेक्यांना घुसून मारणार, अशी गर्जनाही मोदींनी केली. मोदींचं देशातील मध्यमवर्गीयांसमोर नमन राष्ट्रनिर्मितीसाठी सर्वात मोठं योगदान मध्यमवर्गीयांचं आहे. माझा जन्म झाला, तेव्हा देवाने माझ्या सॉफ्टवेअरमध्ये छोटा विचार दिलाच नाही, मोठा विचार करण्यासाठीच बनवलं आहे. इतर अनेक देशाच्या लोकसंख्येपेक्षा आपल्या देशात आयुष्यमान भारत योजनेचा लाभ झाला आहे. मध्यमवर्गीयांच्या करामुळेच देशाचा उद्धार होत आहे, अशा शब्दात मोदींनी मध्यमवर्गाचं कौतुक केलं. मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासह शिवसेना-भाजपमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. लातूरमधील सभेनंतर पुन्हा एकदा उद्धव आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले. नरेंद्र मोदींच्या सभेला अंबानींचे पुत्र अनंत अंबानी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकायला आणि देशाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, अशी एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया सभेला उपस्थित अनंत अंबानी यांनी 'एबीपी माझा'ला दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
Embed widget