एक्स्प्लोर

...म्हणून पार्थ पवार कार्यक्रमस्थळी आल्यावर अजित पवारांनी मंच सोडला

शिवक्रांती कामगार संघटनेने आज पिंपरी येथे एका कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील लोकसभा उमेदवार पार्थ येणार होते. परंतु पार्थ पवारांनी कार्यक्रमांना आणि सभांना उशिरा जाण्यात सातत्य कायम राखलं आहे.

पुणे : शिवक्रांती कामगार संघटनेने आज पिंपरी येथे एका कामगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील लोकसभा उमेदवार पार्थ येणार होते. कार्यक्रम सुरु होण्याच्या ठरलेल्या वेळेत अजित पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले. त्यांनी कामगारांना मार्गदर्शनही केले. कार्यक्रम संपवून अजित पवार तिथून निघाले आणि त्याच वेळी पार्थ पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले. या घटनेमुळे पुन्हा एकदा पार्थ पवारांच्या उशिरा येण्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळमधील लोकसभा उमेदवार पार्थ पवारांचे कार्यक्रमांना, सभांना उशिरा पोहचण्याचे सत्र अद्यापही सुरुच आहे. ज्या कार्यक्रमांना पार्थ यांचे वडील आणि आजोबा वेळेवर पोहोचतात तिथे पार्थ पवार मात्र उशिरा दाखल होतात. गेल्या काही दिवसांत अशा घटना घडल्या आहेत. पिंपरीतल्या कार्यक्रमाला अजित पवार स्वतः वेळेत आले. वेळ न दवडता त्यांनी कामगारांना मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाच्या ठिकाणी पार्थ पवार मात्र तब्बल दीड तास उशिरा पोहोचले. पार्थ तिथे दाखल होईपर्यंत त्यांच्या वडिलांचे भाषण संपले होते. मुलगा मंचावर आला तर वडिलांनी मंच सोडला. या कार्यक्रमानंतर अजित पवार पार्थ यांच्या प्रचारासाठी मावळला निघून गेले. उशिरा पोहोचल्यामुळे आजच्या कार्यक्रमात पार्थ पवारांचे भाषण झालेच नाही. दुसऱ्या बाजूला पार्थ यांच्या प्रचारासाठी त्यांचे वडील अजित पवार कंबर कसून प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी पार्थ पवारांना त्यांच्या उशिरा आल्याबद्दल आणि भाषण न केल्याबद्दल विचारले असता मी बोलणं किंवा दादांनी बोलणं एकच आहे, दादांना जे बोलायचं होतं ते बोलुन गेले, मी कामगारांसाठी काय करणार याच्या सोशल मीडियावर मी पोस्ट टाकल्या आहेत, असं म्हणत पार्थ पवारांनी पुन्हा एकदा वेळ मारून नेहली. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पार्थ पवार बैलगाडीत, समीर भुजबळ ट्रेनमध्ये | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
विधान परिषदेच्या निवडणुकांचं मतदान गुक्त न ठेवता हात वर करुन घेतल्या पाहिजेत, जयंत पाटलांचं वक्तव्य 
Vidhan Parishad Election 2026: पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगितली Inside Story
पुणे विधान परिषदेत राष्ट्रवादीच्या माघारीबाबत बैठकीत काय घडलं? काँग्रेसच्या चंदू कदमांनी सांगितली Inside Story
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?

व्हिडीओ

Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Ladki Bahin Yojana Beneficiary List Check : लाडकी बहीण योजनेतून तुमचं नाव हटवलं तर नाही ना? चेक करा!
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
Shashi Tharoor: 'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
'त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही तरी सुद्धा...' सरफराज खानला भारतीय संघातून वगळताच शशी थरुरांचा थेट सवाल
R. Ashwin on Suryakumar Yadav: जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
जो न्याय रोहित, विराटला तोच न्याय सूर्याला का नाही? तुमची माणुसकी मेली का? BCCIवर अश्विन भडकला
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक घटना... बारामतीत स्कुटी अन् आयशर टेम्पोची धडक; दोन सख्ख्या बहि‍णींचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
LPG price Hike Gas Cylinder Rate: महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
महागाई आता थेट दोनवेळच्या जेवणापर्यंत येऊन पोहोचली, एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ, गॅस किती रुपयांनी महागला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
'फक्त माहितीसाठी सांगतो, आजचं आंदोलन तर फक्त एक 'ट्रेलर' होता..' अमेरिकेतून थेट दिल्लीत धडक देत आंदोलन करताच काॅकरोच संस्थापक अभिजित काय काय म्हणाला?
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण
Shreyas iyer: और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
और हार कर जीतने वाले को 'बाज़ीगर' कहते हैं! BCCI ने केंद्रीय करारात हद्दपार केलं, टी-20 वर्ल्डकपमध्ये कट्ट्यावर बसवलं तोच श्रेयस लेट पण थेट कॅप्टन म्हणून परतला
Embed widget