एक्स्प्लोर

तोंडी परीक्षा | पार्थ पवारांनी आजोबा, आत्याला कर्ज दिलं; सुप्रिया सुळे म्हणतात...

मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आजोबा शरद पवार यांना 50 लाख आणि आत्या सुप्रिया सुळे यांना 20 लाख रुपये कर्ज दिल्याचा उल्लेख केला आहे. घरातल्या घरात कर्ज कसं दिलं याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं.

मुंबई : मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात आजोबा शरद पवार यांना 50 लाख आणि आत्या सुप्रिया सुळे यांना 20 लाख रुपये कर्ज दिल्याचा उल्लेख केला आहे. घरातल्या घरात कर्ज कसं दिलं याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं. त्या म्हणाल्या की, "आम्ही एक कुटुंब आहोत. जॉईंट फॅमिलीमध्ये अशा गोष्टी होत राहतात. आम्ही जॉईंट फॅमिली आहोत, आमचं क्रॉस होल्डिंग असेल तर अडचण काय? दोन कुटुंबात मीडियानेच भांडणं लावली आहेत. इधर तुम्हारी दान नहीं गलने वाली..." तसंच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे खरंच गाडी नाही का, असा प्रश्न विचारला, असता त्या म्हणाल्या की, "सुप्रिया सुळेंकडे गाडी नाही हे हास्यास्पद आहे. माझ्याकडे कंपनीची गाडी आहे." एबीपी माझाच्या 'तोंडी परीक्षा' या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर तपास यंत्रणांच्या वापराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. आमच्यावर करण्यासाठी दुसरे कोणतेच आरोप राहिले नाहीत, म्हणून ते अशी विधानं करत असावेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सरकारी यंत्रणांचा वापर केला असता तर काँग्रेस-राष्ट्रवादीत अनेक शीर्षस्थ नेते राहिले नसते, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एबीपी माझाच्या मुलाखतीत म्हणाले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं की, "ईडी, सीबीआयमध्ये एक आणि दोन क्रमांकाच्या अधिकाऱ्यांमध्येच वाद सुरु आहे. पाच वर्षात त्यांची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. ईडी, सीबीआय, आरबीआय हे थेट पंतप्रधानांना रिपोर्ट करतात. तपास यंत्रणांचा वापर करण्याबाबतचं विधान त्यांचेच लोक करतात. या निवडणूक आली की त्यांना हे सूचतं." मोदी दुष्काळ, बेरोजगारीऐवजी आमच्या कुटुंबावर बोलत आहेत पंतप्रधान मोदींसह विरोधकांना बोलण्यासाठी दुसरे मुद्दे नसल्याने ते आता आमच्या कुटुंबावर भाष्य करत आहेत. मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी दुष्काळ, बेरोजगारावर बोलावं, अशी अपेक्षा होती. पण ते आमच्या कुटुंबावर बोलले, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. ...म्हणून पार्थबद्दल बोलतात "पवार कुटुंबात काहीतरी चाललंय अशी कुजबूज कायम होते. पण माझ्या माहेरी काय चाललंय याची खबर मला नेहमीच असते. माझ्यासाठी माझं कुटुंब अतिशय महत्त्वाचं आहे. जगातील कोणताही व्यक्ती दादा आणि माझ्यात अंतर आणू शकत नाही. आम्ही चांगली टीम आहोत आणि आम्ही दहा वर्ष करुन दाखवलं आहे. दादा आणि माझ्याबद्दल अनेक वेळा बोलून बोअर झाले आहेत. त्यामुळे आता ते पार्थबद्दल बोलत आहे," असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं. विजयसिंह मोहिते पाटलांवर अन्याय केला नाही शरद पवार यांच्या भूमिकेमुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील भाजपच्या जवळ गेले असा प्रश्नही सुप्रिया सुळेंना तोंडी परीक्षा कार्यक्रमात विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, "विखे पाटील आणि त्यांच्या मुलाबद्दल मी काही बोलू शकणार नाही. पण विजयसिंह मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादीने कोणताही अन्याय केला नाही. पक्षात त्याचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यांना माढ्यातून तिकीट मिळणारच होतं. पण त्यांनीच नकार दिला. मात्र ज्यांनी पक्ष बदलला त्यांना तरी कुठे तिकीट मिळालं?"

महत्त्वाच्या बातम्या

Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk on Pradhan Resignation :
"तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं काय झालं?"; मध्यरात्री उपोषण मागे घेताना सोनम वांगचुक यांनी दिली महत्त्वाची माहिती
Fast Track Court for NEET: पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
नीट पेपरफुटीप्रकरणी पंतप्रधानांच्या घोषणेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाच मोठं पाऊल; फास्ट ट्रॅक कोर्टाचे विशेष न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगांची नियुक्ती
Palghar Rain News: पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
Vanita Kharat Joined Students Protest: हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
हातात संविधान अन्...; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर विद्यार्थ्यांसोबत उतरल्या रस्त्यावर, PHOTOs
Mumbai Protest Video Viral: मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील आंदोलनात सिव्हील ड्रेसमधील पोलिसाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचा विरोधकांचा आरोप; दादरमधील व्हिडीओ व्हायरल
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: 'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
Embed widget