एक्स्प्लोर

पराभव होऊनही पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार?

मास लीडर अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांचा परळीत झालेला पराभव हा भाजपसाठी एक धक्का मानला जातोय. पंकजा मुंडेंचा परळी मतदारसंघात जरी पराभव झाला असला तरी त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे.

बीड : धनंजय मुंडे यांनी मोठ्या फरकाने पराभव केल्यानंतर पंकजा मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे, अशा हालचाली भाजपाच्या गोटामध्ये सुरू असल्याची माहिती मिळत आहे. गोपीनाथ मुंडे यांचं भाजपमध्ये असलेले योगदान आणि पंकजा मुंडे यांचं पक्षासाठी केलेलं काम यामुळे पंकजा मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद दिले जाईल, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातच त्यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकीकडे 'अब की बार दो सो पार' अशी घोषणा दिल्यानंतरही भाजपला संभाव्य संख्याबळापर्यंत न पोहोचता न आल्याने कमी झालेल्या जागांची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांच्या पराभवाची देखील चर्चा होत आहे.  परळी विधानसभा मतदारसंघातील लढत होती अत्यंत चुरशीची बनली होती.  या लढतीमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा 30 हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. खरंतर मास लीडर अशी ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांचा परळीत झालेला पराभव हा भाजपसाठी  एक धक्का मानला जातोय.  पंकजा मुंडेंचा परळी मतदारसंघात जरी पराभव झाला असला तरी त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. तिथे नुकसान होऊ नये म्हणून भाजपकडून पंकजा मुंडे यांना पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर केली जात आहे. पंकजा मुंडेंचं मंत्रिपद कायम ठेवून मुंडेंना मानणारा समाज असलेल्या अहमदनगर, पुणे, नाशिक, बुलढाणा आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात याचा फायदा भाजपला मिळेल अशी चर्चा भाजपच्या गोटात ऐकायला मिळत आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने बीडमध्ये मोठा विजय मिळवला आहे. यापुढे  धनंजय मुंडे यांचे आव्हान थोपवण्यासाठी पंकजा मुंडे यांनाच भाजपकडून पुढे आणले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर निवडून आलेल्या आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी केली होती. त्यात पाथर्डीच्या मोनिका राजळे आणि रासपचे रत्नाकर गुट्टे यांचा समावेश आहे. पण पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतले जाण्याचीच जास्त  शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report NCP :कोणत्या खासदाराला फोन? फोडफोडीचं राजकारण किती दिवस चालणार?Special Report Amol Mitkari VS Suresh Dhas : धस हेच बीडच्या इतिहासातील आका, मिटकरींचे गंभीर आरोपSpecial Report Uddhav Thackeray : मिशन मुंबई महापालिका, ठाकरेंच्या शिवसेनेचं एकला चलो रे?Zero Horu Washington : हिमवादळानं वॉशिग्टनमध्ये वाहतूक मंदावली, परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
प्रसुती झालेल्या महिलेचा जुळ्या बाळांसह 80 किमीचा प्रवास, 10 वर्षांनंतरही पालघरचा आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यात शरद मोहोळ गँगच्या सदस्याला अटक, कमरेला होते 2 पिस्तुल; हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
मुंबईत 'केबल कार' प्रकल्प राबविण्यास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता; लवकरच DPR तयार होणार
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
धाराशिवमध्ये पोलीस स्टेशनजवळच स्फोट, सर्वत्र खळबळ; बॉम्बस्कॉड पथक घटनास्थळी
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Video: पंकजा धुतल्या तांदळाची नाही, धनंजयचाही माज उतरवा, सारंगी महाजन आक्रमक
Somnath Suryavanshi : सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सूर्यवंशी कुटुंबीयांनी नाकारली 10 लाखांची मदत
Embed widget