एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंनी स्वतः काही कमावलेलं नाही, जिल्ह्यातील राष्ट्रवादी मात्र त्यांनी यशस्वीपणे स्वतःच संपवली : पंकजा मुंडे

समजा मी भाजपला कमी मतदान झालेल्या बूथची यादी मागवली तरी काय फरक पडणार आहे. धनंजय यांच्या बुद्धिमत्तेची जाणीव मला पूर्ण आहे, जगाला नाही. त्यांनी त्याचं प्रदर्शन करू नये, असेही त्या म्हणाल्या. विरोधकांनी जातीचं राजकारण केलं कारण त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबई : बीडचं स्वतःचं एक राजकारण आहे. पूर्वीपासून भाजपच्या बाजूने आणि त्यांच्या विरोधातली काही मतं आहेत. धनंजय मुंडेंनी स्वतः काही कमावलेलं नाही. त्यामुळं राष्ट्रवादीच्या मतांचं श्रेय त्यांनी घेऊ नये. जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांनी यशस्वीपणे स्वतःच संपवली आहे, असा टोला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला आहे. समजा मी भाजपला कमी मतदान झालेल्या बूथची यादी मागवली तरी काय फरक पडणार आहे. धनंजय यांच्या बुद्धिमत्तेची जाणीव मला पूर्ण आहे, जगाला नाही. त्यांनी त्याचं प्रदर्शन करू नये, असेही त्या म्हणाल्या. विरोधकांनी जातीचं राजकारण केलं कारण त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नव्हता, अशी टीकाही त्यांनी केली. एक्झिट पोलचे आकडे समाधान आणि आनंद देणारे आहेत. आम्ही अंदाज वर्तवले त्याहून चांगले अंदाज देशभरातले दिसत आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत मी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेमध्ये 36 ते 38 जागा लिहून दिल्या होत्या. त्यावर मी आजही ठाम आहे, असे त्या म्हणाल्या. प्रीतम मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचं फक्त पितृत्व पाहिलं पण मी त्यांचं नेतृत्व आणि पितृत्व दोन्ही अनुभवलं. त्यामुळे त्यांच्याशिवाय पहिली सार्वत्रिक निवडणूक लढतांना मी त्यांच्यातला नेता खूप मिस केला, असे मुंडे म्हणाल्या. यावेळेस मुंडे साहेब नसल्याने निर्णय घेण्याची अधिकची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. कोणाला किती जवळ करायचं, कोणाला कसं हाताळायचं, कोणाचे काय सामाजिक परिणाम होऊ शकतात हे या लोकसभा निवडणुकीत शिकायला मिळालं, असं त्या म्हणाल्या. 2014 नंतर बीड जिल्ह्यात पक्षावर नसेल पण मुंडे साहेबांवर प्रेम करणारांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून मतदान केलं. मात्र यावेळेला प्रीतमचं काम, माझी राजकीय शैली आणि संघर्ष या आधारावर होईल, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितलं. जयदत्त क्षीरसागर यांना राष्ट्रवादीनं जेवढं छळलं तेवढं आम्ही जवळ केलं. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र काम केलं म्हणून आज ते आमच्या मित्रपक्षात शामिल होत आहेत, असे त्या म्हणाल्या. जिल्ह्यातले अनेक मोठे राष्ट्रवादीचे नेते पक्षापासून दुरावले. त्यामुळे आता पंकजा विरुद्ध धनंजय असा लढा नसून राष्ट्रवादीला अंतर्मुख करणारा हा लढा आहे. धनंजय यांच्या नेतृत्वात त्यांनी जिल्ह्यात पक्ष संपवला. मी स्वतः अनेक मोठ्या नेत्यांच्या संपर्कात आहे. भविष्यात त्यांचा प्रवेश झाला तर स्वागतच. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असेही पंकजा म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget