एक्स्प्लोर
Advertisement
मोहितेविरुद्ध मोहिते संघर्षाचा नवा अंक, धवलसिंहांचा रणजितसिंहांवर निशाणा
विशेष म्हणजे धवलसिंह यांची कालच (21 मार्च) शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. असं असलं तरी गेल्या वर्षभरापासून धवलसिंह यांनी शिवसेनेचं काम बंद केलं होतं.
पंढरपूर : रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आता मोहिते विरुद्ध मोहिते संघर्षाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली आहे. आजपर्यंत वर्षानुवर्षे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता भोगली, त्यांना जातीयवादी वाटणारा भाजप रात्रीत कसा चांगला वाटू लागला, असा प्रश्न विचारात डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी रणजितसिंह मोहिते पाटलांवर तोफ डागली आहे.
धवलसिंह मोहिते पाटील यांनी काल (21 मार्च) अकलूजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या 'प्रतापगड' या निवासस्थानी जिल्ह्यातील जनसेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पवारांच्या भेटीनंतरच्या निर्णयाबाबत धवलसिंह यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. येत्या दोन दिवसात राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.
धवलसिंह मोहिते-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी
यावेळी धवलसिंह यांनी नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, "ज्यांनी वर्षानुवर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सत्ता भोगली, अनेक मंत्रीपदं भोगली आणि ज्यांनी आजवर भाजपला जातीयवादी पक्ष ठरवलं, त्यांना रातोरात भाजप चांगला कसा वाटू लागला?"
विशेष म्हणजे धवलसिंह यांची कालच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. असं असलं तरी गेल्या वर्षभरापासून धवलसिंह यांनी शिवसेनेचं काम बंद केलं होतं.
रणजितसिंहांच्या भाजपप्रवेशानंतर धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर?
कोण आहेत धवलसिंह मोहिते पाटील?
धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार राज्यमंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. अकलूज परिसरात मोठी ताकद असलेला युवा नेता म्हणून धवलसिंह यांची ओळख आहे. सदाशिवनगर भागातील शंकर सहकारी साखर कारखान्याचं अध्यक्षपद त्यांनी दहा वर्ष भूषवलं होतं. मात्र काही महिन्यांपूर्वी रणजितसिंह मोहितेंनी त्यांना पराभूत करुन कारखाना जिंकला होता. सोलापूर जिल्हा परिषदमध्ये धवलसिंहांनी सदस्य म्हणून काम केलं असून अनेक संस्थांवर ते अध्यक्ष म्हणून काम करत आहेत.
धवलसिंह मोहिते पाटील हे रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू असून कट्टर विरोधक आहेत. राष्ट्रवादीकडून माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी धवलसिंह मोहिते पाटलांच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement