एक्स्प्लोर
लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांची महाआघाडी होणार, राहुल गांधींचं सूचक वक्तव्य
आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करतील, असे सूचक वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्ष एकत्र येऊन महाआघाडी करतील, असे सूचक वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, "सर्व विरोधी पक्षांना मिळून नरेंद्र मोदी यांना हरवायचं आहे. त्यामुळे सर्वजण नक्कीच एकत्र येतील."
राहुल गांधी म्हणाले की, "काही राज्यांमध्ये धर्मनिरपेक्ष आघाड्या झाल्या आहेत. देशातल्या सर्व विरोथी पक्षांचे प्रमुख काम हे नरेंद्र मोदींना हरवण्याचे आहे. त्यामुळे संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र यावं लागेल."
आगामा काळातील काँग्रेसच्या अजेंड्याबाबत राहुल गांधी म्हणाले की, "आपल्याला संविधानाचे रक्षण करायचे आहे. भारतीय जनता पक्षापासून इथल्या संस्था आणि सामाजिक वारशाला वाचवायचे आहे. त्यासोबतच आपल्याला देशाचा विकास दर वाढवायचा आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे, नव्या नोकऱ्या निर्माण करणे, अन्याय आणि असमानता दूर करणे ही आपली आगामी काळातली कामं आहेत."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement