एक्स्प्लोर

राज्याच्या सत्तेची सूत्रं पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या हाती गेली तर... नागपूरमध्ये नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Nitin Gadkari : आजवर जेवढा विकास तुम्ही पाहिला तो फक्त ट्रेलर होता, असली पिक्चर तो अभी बाकी है! त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना संधी द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलंय.

Maharashtra Assembly Elections 2024 नागपूर : गेल्या दहा वर्षात नागपूरात एक लाख कोटी पेक्षा जास्त निधीचे विकास कामे झाले. यात चांगले रस्ते झाले, 70 टक्के नागपुरकरांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळते आहे. आम्ही मिहानमध्ये 78 हजार स्थानिक तरुणांना नोकरी दिली आहे. जे देशात, जगात कुठे नाही, असे अनेक प्रकल्प एकट्या नागपुरात बघायला आज मिळत आहे. गेल्या 60-70 वर्षात काँग्रेसला जे जमले नाही ते महायुतीने दहा वर्षात केलं आहे. ही सर्व विकासकामे माझ्यामुळे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  किंवा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) अथवा अन्य कोणामुळे नाही. तर तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे झाले आहे. आजवर जेवढा विकास तुम्ही पाहिला तो फक्त ट्रेलर होता, असली पिक्चर तो अभी बाकी है! त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना,देवेंद्र फडणवीसांना संधी द्या, असे आवाहन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) केलंय. ते नागपुरातील (Nagpur) भाजपच्या शक्तिप्रदर्शन रॅलीत बोलत होते.

दुसऱ्या पक्षातील नेत्यांना केवळ आपल्या मुलाबाळांच्या उमेदवारीची चिंता

दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आपल्या मुलाबाळांना उमेदवारी देण्याची चिंता आहे. मात्र आम्हाला नागपूर आणि राज्याच्या विकासाची, गोरगरीबांच्या मुलांची काळजी आहे. तरुणांना आम्ही नोकरी मिळवून देत आहोत. प्रगतीच्या दिशेने देशाला पुढे नेत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तेची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात द्या, देवेंद्र फडणवीस बावनकुळे सारखे लोक सत्तेत गेले, तर ते पुन्हा चांगले काम करून दाखवतील, असा विश्वासही नितीन गडकरींनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. 

 नागपूरच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संविधान चौकातून ते आपला नामांकन अर्ज भरण्यासाठी रॅली काढणार आहेत. त्यानंतर ते तहसील कार्यालयात जात आपला अर्ज सादर करणार आहेत. याबबात बोलताना हा विजयाचा शंखनाद असेल अशी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांनी आपल्या विजयाचा विश्वास बोलून दाखवला आहे.

आपल्यापेक्षा आपले काम बोलतं आहे -देवेंद्र फडणवीस

आपल्यापेक्षा आपले काम बोलत आहे. म्हणून आज जास्त बोलायची गरज नाही. गडकरींच्या नेतृत्वात आपण नागपुरात केलेला बदल लोक आज डोळ्यांनी पाहत आहेत. गेल्या दहा वर्षात आम्हाला साडेसात वर्षे मिळाले, आमच्या साडेसात वर्षाचा काळ आणि त्यापूर्वीचा पंधरा वर्षाचा काळ (महाआघाडीचा सरकार) तुलना करा. तुमच्या आशीर्वादानेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री होते आले. मोदींनी नवीन भारताची निर्मिती सुरू केली आहे आणि त्यांचे नेतृत्वात आम्ही नवीन महाराष्ट्राची निर्मिती सुरू केली आहे. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स
एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Varud Morshi Vidhansabha : वरुड मोर्शीमधून राष्ट्र्वादीच्या भुयारांना उमेदवारी देण्यास भाजपचा विऱोधNana Patole On Rahul Gandhi : सोशल मिडियावरुन राहुल गांधींना बदनाम करण्याचं कामEknath shinde On Maharashtra Vidhansabha : विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातलीPune Gold Seize | सोन्याने भरलेला टेम्पो पकडला, पुणे पोलिसांची मोठी कारवाई ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
सीमेवर देशाचे रक्षण करणारे सैनिक मतदानाचा हक्क कसा बजावतात? जाणून घ्या सविस्तर
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
अमित शाह, याला दारात तरी उभं करतील का?; इंदापुरातूनच हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
कोल्हापूर जिल्ह्यात चार मतदारसंघात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडी तिढा सुटता सुटेना!
एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स
एकनाथ शिंदेंचा मोठा डाव, आदित्य ठाकरेंविरुद्ध उतरवला खासदार; वरळीत तिरंगी लढत फिक्स
Mayuresh Vanjale: आई अन् बहीण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; भाऊ रमेश वांजळे मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले 'आता जिंकल्यावरच...'
आई अन् बहीण अजित पवारांच्या राष्ट्रवादीत; भाऊ रमेश वांजळे मनसेकडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; म्हणाले 'आता जिंकल्यावरच...'
Ruturaj Patil Net Worth : गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
गेल्या पाच वर्षात संपत्तीमध्ये 14 कोटींची वाढ, एकही गुन्हा दाखल नाही; आमदार ऋतुराज पाटील किती कोटींचे मालक?
खळबळजनक... वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून पाच रायफलींची चोरी, जळगावातील घटना
खळबळजनक... वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमधून पाच रायफलींची चोरी, जळगावातील घटना
Ajit Pawar: 'महाराष्ट्रात ताठ मानेने फिरेल असं...', अजित पवारांनी मतदारांना घातली साद, बारामतीच्या उमेदवारीवर देखील केलं भाष्य
'महाराष्ट्रात ताठ मानेने फिरेल असं...', अजित पवारांनी मतदारांना घातली साद, बारामतीच्या उमेदवारीवर देखील केलं भाष्य
Embed widget