एक्स्प्लोर
Advertisement
युतीचा निवडणुकीचा पूर्ण आराखडा तयार होतो, आघाडीत मात्र चर्चाच संपत नाही : स्वाभिमानी
उद्यापर्यंत स्वाभिमानीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर स्वाभिमानी अन्य मार्गानं जाईल आणि 15 ठिकाणी उमेदवार उभे करेल, असे तुपकर यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले, वर्धा, बुलढाणा या जागांसाठी आग्रही आहे, असेही तुपकर यांनी सांगितले.
मुंबई : भाजप-सेना युतीच्या प्रचारसभा, महामेळाव्यांच्या तारखा जाहिर झाल्यानंतर आघाडीच्या मित्रपक्षांमधली अस्वस्थता वाढली आहे. युतीचा निवडणुकीचा पूर्ण आराखडा तयार होतो, मात्र आघाडीत मात्र चर्चाच संपत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. युतीचा निवडणूकीचा संपूर्ण आराखडा तयार होतो, आघाडीत मात्र चर्चाच संपत नाही, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.
आघाडीने आता आणखी वेळ वाया घालवू नये, जागावाटप करुन लवकरात लवकर प्रचाराला लागलं पाहिजे. आणखी वेळ घालवल्यानं मतदारांमध्येही संभ्रम निर्माण होत आहे. आघाडीच्या मनात नेमकं आहे तरी काय? सत्तापरिवर्तनाबाबत आघाडीचे नेते खरंच गंभीर आहेत का?, असा सवालही तुपकर यांनी केला आहे.
एकीकडे युतीच्या प्रचारसभांच्या तारखा जाहिर होतात आणि आघाडीचे नेते चर्चेतच वेळ काढत आहेत. असंच सुरु राहिलं तर त्याचे नकारात्मक परिणाम होतील, अशी भीतीही तुपकर यांनी व्यक्त केली आहे.
उद्यापर्यंत स्वाभिमानीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नाही तर स्वाभिमानी अन्य मार्गानं जाईल आणि 15 ठिकाणी उमेदवार उभे करेल, असे तुपकर यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले, वर्धा, बुलढाणा या जागांसाठी आग्रही आहे, असेही तुपकर यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement