एक्स्प्लोर
Advertisement
काळजी घ्या, महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे : जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लहान मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असा टोला भाजपला लगावला आहे.
मुंबई : विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लहान मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी असा टोला भाजपला लगावला आहे.
सुजय विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर "महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी" असं ट्विट आव्हाडांनी केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी दरम्यान चर्चा सुरु होती. सुजय विखे पाटील यांच्यासाठी अहमदनगरच्या जागेची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सुजय विखे पाटील यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संबंधित बातम्या : काँग्रेसला धक्का, सुजय विखे पाटील यांचा भाजपात प्रवेश साहेब, आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करा, नातू रोहित पवारांचं आजोबांना आवाहन पार्थ, सुजयनंतर आता आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात? | मुंबई | एबीपी माझामहाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 12, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement