स्टेजवर आहेत तेच काम करतात, बाकीचे फक्त नावाला सोबत, अजितदादांपुढेच यशवंत मानेंची खंत!
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ हा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे.
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) मतदानाला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या 20 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दरम्यान, प्रचारारम्यान वेगवेगळ्या पक्षाचे नेते आपल्या राजकीयव विरोधकांवर सडकून टीका करताना दिसत आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार आहे. त्यामुळे काही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीतील मतभेदही समोर येत आहेत. सोलापूरमध्ये याचीच प्रचिती आली. आमदार यशवंत माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढेच आपली खदखद बोलून दाखवली आहे.
यशवंत माने नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच आमदार यशवंत माने यांनी आपली खदखद बोलून दाखवली आहे. यशवंत माने यांनी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली आहे. महायुती धर्म पाळणे ही सर्वांची जबाबदारी आहे. मात्र आपल्यातील काही लोक मदत करत नाहीत, असे यशवंत माने म्हणालेत. जे स्टेजवर आहेत तेवढेच आपले काम करत आहेत. बाकीचे केवळ आपल्यासोबत आहेत, पण काम करत नाहीत. दादा हे आपल्या इथे एक बोलतील आणि मुंबईत येऊन तुम्हाला कानात सांगतील आम्ही काम करतोय म्हणून, असंही यशवंत माने म्हणाले.
यशवंत माने यांची नाराजी नेमकी कशामुळे
सोलापूरच्या टाकळी सिकंदर भीमा सहकारी कारखाना आहे. या कारखान्यावर धनंजय महाडिकांच्या प्रॅनलची सत्ता आहे. येथे महाडिक विरुद्ध अजित पवार पटाचे माजी आमदार राजन पाटील यांच्या कारखान्याच्या निवडणुकीपासून संघर्ष पाहायला मिळतो. त्यातच कारखान्याचे वाईस चेअरमनं असलेले सतीष जगताप यांन महाविकास आघाडीचे उमेदवार राजीव खरे यांना उघडपणे पाठिंबा जाहीर केला आहे. दुसरीकडे धनंजय महाडिक किंवा त्यांचे कार्यकर्ते महायुतीचे उमेदवार असलेल्या यशवंत माने यांच्या प्रचारार्थ कुठे सक्रिय सहभागी नाहीयेत. त्यामुळे यवशंत माने यांनी मंचावरूनच उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.
मोहोळ मतदारसंघात नेमकी कोणाकोणात लढत होणार?
मोहोळ हा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे राजू खरे हे येथून निवडणूक लढवत आहेत. ते शरद पवार यांच्या पक्षाचे नेते आहेत. तर दुसरीकडे याच जागेवर महायुतीने या जागेवर यशवंत माने यांना तिकीट दिले आहे. यशवंत माने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आहेत.
हेही वाचा :