एक्स्प्लोर
जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती? नवनीत कौर राणांचा नारा
"जनतेशी आघाडी माझी, जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती", "जीत पक्की, टी.व्ही. नक्की" असे मेसेज अमरावतीतून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास उत्सुक असलेल्या नवनीत कौर राणा यांच्या समर्थनार्थ युवा स्वाभिमान पार्टीकडून वायरल होताना दिसत आहेत.
अमरावती : आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांना आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. नवनीत कौर राणा पुन्हा अमरावतीतून लोकसभा लढवण्यास उत्सुक असून रवी राणांनी राष्ट्रवादीकडे पाठिंब्याची मागणी केली आहे.
नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवनीत राणा आपल्या 'युवा स्वाभिमान पार्टी'कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. सोशल मीडियावर त्या प्रकारचे मेसेज त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फिरत आहेत.
"जनतेशी आघाडी माझी, जनतेशी माझी युती, जनता जनार्दन पाठीशी, मग काय कुणाची भीती", "जीत पक्की, टी.व्ही. नक्की" असे मेसेज युवा स्वाभिमान पार्टीकडून वायरल होताना दिसत आहेत.
VIDEO | राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट
नवनीत कौर राणा राष्ट्रवादीच्या तिकीटावर 2014 मध्ये लोकसभेच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र आता 'टीव्ही' या मतदान चिन्हासह त्या युवा स्वाभिमानी पक्षातूनच निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
'युवा स्वाभिमान पार्टी'ला आघाडीत सामील करुन घ्यावं आणि नवनीत राणा यांना पाठिंबा द्यावा, ही राष्ट्रवादीसोबत सुरु असलेली बोलणी अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. आणखी कोणत्या पक्षाचा पाठिंबा मिळतो का, यासाठी आमदार रवी राणा मुंबईला तळ ठोकून आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement