Narayan Rane : आम्ही सगळे एकत्रच, 'ना बटेंगे ना कटेंगे', एखाद्याच्या वक्तव्याचा किती कीस पाडायचा? अजित पवारांच्या वक्तव्यावर नारायण राणे काय म्हणाले?
Narayan Rane On Ajit Pawar : बटेंगे तो कटेंगे हा भाजपचा मुद्दा आम्हाला अमान्य असल्याचं सांगत अजित पवारांनी त्याला विरोध केला. त्यावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून येतंय.
रत्नागिरी : एखाद्याने एखादं वक्तव्य केलं तर त्याचा किती कीस पाडायचा, ना बटेंगे ना कटेंगे, आम्ही सगळे एकत्र आहोत असं वक्तव्य भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलंय. बटेंगे तो कटेंगे हे भाजपचे वक्तव्य आम्हाला मान्य नाही असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानावर महायुतीतील अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. एखाद्याच्या वक्तव्याचा किती कीस पाडायचा असंही ते म्हणाले. आम्ही सगळे एकत्रच असून ना बटेंगे ना कटेंगे असंही राणे म्हणाले.
बारसू रिफायनरी होणारच
खासदार नारायण राणे यांनी बारसू रिफायनरीवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे जिथे विरोध करत आहेत ते प्रकल्प आम्ही आणणारच. बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आम्ही श्रीकांत शिंदेला समजावून सांगू. ती अंदर की बात आहे. कोकणातील जनतेचा विकास होण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याचे आम्ही प्रयत्न करणारच. रिफायनरीमुळे रत्नागिरीत पाच लाख कोटींची गुंतवणूक येईल.
सर्व्हेप्रमाणे महायुतीच्या राज्यात आमच्या 160 हून अधिक जागा येतील असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या सीट येणार नाहीत हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही असा टोलाही राणेंनी लगावला.
Ajit Pawar Statement On Batenge To Katenge : काय म्हणाले होते अजित पवार?
बटेंगे तो कटेंगेवरून महायुतीतले मतभेद चव्हाट्यावर आलेत. बटेंगे कटेंगे महाराष्ट्रात चालणार नाही. फडणवीस काय म्हणतात मला माहिती नाही. पण मला बटेंगे तो कटेंगे आम्हाला अमान्यच आहे असं राष्ट्रवादीचे अजित पवार म्हणाले. बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर अजित पवारांनी सलग दुसऱ्या दिवशी आक्षेप नोंदवला आहे.
देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर
बटेंगे तो कटेंगे या नाऱ्याला विरोध करणाऱ्या अजित पवारांवर फडणवीसांनी मोठं वक्तव्य केलं. बटेंगे तो कटेंगेचा अर्थ अजित पवारांना कळला नसावा किंवा त्यांनी वेगळा अर्थ काढला असावा असं फडणवीसांनी म्हटलंय. एक तर जनतेच्या भावना काही दादांना कळल्या नसतील, किंवा त्यांना त्या नाऱ्याचा अर्थच कळला नसेल. कारण हिंदूविरोधी तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांबरोबर अजित पवार अनेक दशकं राहिले आहेत, अशा शब्दांत फडणवीसांनी आपला मुद्दा मांडला.
ही बातमी वाचा :