एक्स्प्लोर

काँग्रेसला मोठा धक्का : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा पराभव, 'वंचित'च्या फॅक्टरचा दणका

नेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊन सर्वाधिक फटका आघाडीच्या विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. नांदेडमध्ये देखील याच 'वंचित' फॅक्टरमुळे अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे पराभूत झाले आहेत. अंतिम आकडेवारी हाती आली नसली तरी भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी जवळपास ४० हजाराहून अधिक मतांनी त्यांचा पराभव केला आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी दीड लाखाहून तसेच पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अशोक चव्हाण स्वतः निवडणूक लढविण्यास इच्छुक नव्हते. मात्र पक्षाचे आदेश आल्यानंतर त्यांनी मैदानात उडी घेतली होती. 2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत अशोक चव्हाण यांनी विजय मिळवला होता. त्यांना 4,93075 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपचे डी.बी.पाटील यांना 4,11,620 मतं मिळाली होती. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. 542 पैकी जवळपास साडेतीनशे जागांवर आघाडी मिळवत भाजपप्रणित एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर यूपीएचा अक्षरश: सुपडासाफ झाला आहे. महाराष्ट्रात तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंधड्या झाल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सहाच जागा मिळवता आल्या. त्यापैकी काँग्रेसचा एकच उमेदवार आघाडीवर आहे. राज्यातील 48 जागांपैकी जवळपास 43 जागांवर विजयी आघाडी मिळवत, मागील लोकसभा निवडणुकीतील विक्रमही मागे टाकला आहे. राज्यात काँग्रेसचं पतन होण्यामागे वंचित बहुजन आघाडीचा मोठा वाटा असल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊन सर्वाधिक फटका आघाडीच्या विशेषत: काँग्रेसच्या उमेदवारांना बसला. नांदेडमध्ये देखील याच 'वंचित' फॅक्टरमुळे अशोक चव्हाणांसारख्या दिग्गज नेत्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांची सभा झाली होती. तसेच राज ठाकरे यांची भाजप विरोधात सभा झाली होती. मात्र मोदींच्या सभेच्या प्रभावासमोर राज यांचा करिष्मा अपुरा पडला असल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget