एक्स्प्लोर

Lok Sabha Election Result 2024 : नांदेडमध्ये काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी चिखलीकरांना मोठा धक्का!

Nanded Lok Sabha Election Result 2024 : नांदेडमध्ये लोकसभा निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली. या जागेवर वसंतराव चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर यांच्यात थेट लढत झाली.

Nanded Lok Sabha 2024 Result : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेड हा मतदारसंघ (Nanded Lok Sabha Election) चर्चेच्या केंद्रस्थानी होता. येथे काँग्रेसचे उमेदवारी वसंतराव चव्हाण (Vasantrao Chavan) आणि भाजपचे उमेदवार प्रताप चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांच्यात थेट लढत झाली. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. चिखलीकर यांच्या विजयासाठी भाजपच्या दिग्गजांनी नांदेडमध्ये सभा घेतल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्याही बड्या नेत्यांनी चव्हाण यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या. पण मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनामुळे तसेच वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) उमेदमवारीमुळे मतांची गणितं बदलली आहेत. त्यामुळे या जागेवरून कोण निवडून येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.दरम्यान, या जागेवर आता वसंतराव चव्हाण हे विजयी झाले आहेत. ते 59 हजार 442 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

                           उमेदवाराचे नाव                        पक्ष                        निवडणुकीचा निकाल
                         प्रतापराव चिखलीकर                      भाजप                                 पराभव (469452 )
                          वसंतराव चव्हाण                      काँग्रेस                                 विजयी (528894)

वसंतराव-प्रतापराव यांच्यात थेट लढत 

नांदेडमध्ये प्रतापराव विरुद्ध वसंतराव चव्हाण यांच्यात यांच्यात थेट लढत झाली. या जागेवर वंचित बहुजन आघाडीनेही आपला उमेदवार उभा केला होता.  दुसरीकडे वसंतरावांना मिळणारी काही मतं वंचितमुळे फुटण्याची शक्यता होती. पण तरीदेखील चव्हाण यांनी विजयी पताका फडकवली.  

अशोक चव्हाण यांच्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची 

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते राज्यसभेत खासदार आहेत. दरम्यान, चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर आता ही लोकसभेची निवडणूक होत आहे. याआधी चिखलीकर आणि चव्हाण हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जायचे. पण चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे चव्हाण आणि चिखलीकर यांनी एकत्र प्रचार केला. चव्हाण यांनी चिखलीकरांच्या पाठीमागे पूर्ण ताकद उभी केली. चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील मोठे राजकीय प्रस्थ आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना त्यांचे वजन दाखवण्याची संधी होती. त्यामुळेच चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली होती.  

नांदेडमध्ये 1996 सालापासून प्रत्येक लोकसभा निवडणूक ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एकूण 16 निवडणुकींपैकी 4 निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झालेला आहे.  यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघा विशेष चर्चेत राहिला. या जागेवर महायुतीकडून भाजपचे नेते प्रताप चिखलीकर तर महाविकास आघाडीकडून  वसंतराव चव्हाण यांना तिकीट दिले होते.

2019 साली काय निकाल आला? 

नांदेडमध्ये 2014 सालची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरली होती. या निवडणुकीत सध्या भाजपमध्ये असलेले खासदार अशोक चव्हाण हे काँग्रेसच्या तिकिटावर उभे होते. त्यावेळी चव्हाण यांनी ही जागा जिंकली होती. मोदी लाट असतानाही चव्हाण यांनी या जागेवर विजयी कामगिरी केली होती. 2019 साली मात्र काँग्रेसला ही जागा गमवावी लागली होती. या निवडणुकीत भाजपचे नेते प्रतापराव चिखलीकर हे खासदार झाले होते. चिखलीकर यांना एकूण 4 लाख 86 हजार 806 तर अशोक चव्हाण यांना 4 लाख 46 हजार 658 मतं पडली होती. तेव्हा विजयी मतांचा फरक 40 हजार 138 होता. या निवडणुकीत  वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना 1 लाख 66 हजार 196 मते मिळाले होती. 

2024 सालच्या निवडणुकीतील मतदारांची आकडेवारी

एकूण मतदार- 18 लाख 51 हजार 843
पुरुष मतदार- 9 लाख 55 हजार 84
महिला मतदार- 8 लाख 96 हजार 617
अन्य- 142

किती जणांनी केले मतदान

एकूण झालेले मतदान- 11 लाख 28 हजार 564
पुरुष मतदार-  6 लाख 6 हजार 482
महिला मतदार- 5 लाख 22 हजार 62
अन्य- 20

किती टक्के मतदान झाले

एकूण मतदान- 60.94 टक्के  
पुरुष मतांची टक्केवारी- 63.50
महिला मतांची टक्केवारी- 58.23
इतर मतदारांची टक्केवारी- 14.08

विधानसभा मतदारसंघ क्षेत्रनिहाय मतदारांचे प्रमाण 

भोकर-

एकूण मतदार- 2 लाख 94 हजार 409
प्रत्यक्ष मतदान-1 लाख 92 हजार 446
मतांची टक्केवारी -65.37 टक्के

नांदेड उत्तर- 

एकूण मतदार- 3 लाख 46 हजार 886
प्रत्यक्ष मतदान-2 लाख 3 हजार 42
मतांची टक्केवारी-58.53 टक्के

नांदेर दक्षिण-

एकूण मतदार- 3 लाख 8 हजार 90
प्रत्यक्ष मतदान- 1 लाख 86 हजार 151
मतांची टक्केवारी- 60.28 टक्के

नायगाव- 

एकूण मतदार- 3 लाख 1 हजार 299
प्रत्यक्ष मतदान- 1 लाख 96 हजार 818
मतांची टक्केवारी- 65.32 टक्के

देगलूर- 

एकूण मतदार- 3 लाख 3 हजार 943
प्रत्यक्ष मतदान-1 लाख 81 हजार 806
मतांची टक्केवारी- 59.82 टक्के

मुखेड-

एकूण मतदार- 2 लाख 96 हजार 516
प्रत्यक्ष मतदान- 1 लाख 68 हजार 301
मतांची टक्केवारी- 56.76 टक्के

2024 साली उमेदवारांना विधानसभानिहाय मिळालेले मतदान 

वसंत चव्हाण ( काँग्रेस ) यांना मिळालेली मते 

85 भोकर :- 83490
86 नांदेड उत्तर :- 105135
87 नांदेड दक्षिण :- 90606
89 नायगाव :- 89873
90 देगलूर :- 83606
91 मुखेड :- 74155

एकूण :- 526865

पोस्टल मते:- 2029

भाजपच्या उमेदराला विधानसभानिहाय मिळालेली मते

प्रताप पाटील चिखलीकर ( भाजप ) यांना मिळालेली मते 

85 भोकर :- 84331
86 नांदेड उत्तर :- 64540
87 नांदेड दक्षिण :- 72512
89 नायगाव :- 85491
90 देगलूर :- 82426
91 मुखेड  :- 78152

एकूण :- 467452

पोस्टल मते:- 2000

सध्याचे पक्षीय बलाबल नांदेड जिल्हा (विधानसभा)

नांदेड दक्षिण - काँग्रेस
नांदेड उत्तर - सेना शिंदे गट
भोकर - भाजप
नायगाव - भाजप
मुखेड - भाजप
देगलुर - काँगेस

हेही वाचा :

Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha Result 2024 : संभाजीनगरात खैरे, भुमरे की जलील मारणार बाजी? वाचा संपूर्ण निकाल एका क्लीकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget