एक्स्प्लोर

गद्दारांची ओळख पटली, त्या आमदारांवर कारवाई होणार, पक्षात स्थान नाही, क्रॉस व्होटिंगवर नाना थेटच बोलले!

Vidhan Parishad Election Result : ज्या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली, त्यांना सोडला जाणार नाही. त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही. जे घडलं ते वरिष्ठांना कळवलं आहे, त्यांच्याकडून भेटायला बोलावलं जाईल

Nana Paotle : विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election Result) काँग्रेस पक्षाची काही मते फुटली होती. निवडणूक झाल्यानंतर आमची काही मतं फुटली असल्याचे खुद्द नाना पटोले (Nana Patole) यांनी मान्य केलं आहे. काँग्रेस पक्ष या फुटीर आमदारांचे विश्लेषण करत आहे. वरिष्ठांना याबाबत कळवण्यात आले आहे. ज्या आमदारांनी काँग्रेस (Congres) सोबत गद्दारी केली त्यांची नावे समोर आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.  

नाना पटोलेंचा इशारा -

ज्या आमदारांनी पक्षासोबत गद्दारी केली, त्यांना सोडला जाणार नाही. त्यांना पक्षात कोठेही स्थान राहणार नाही. जे घडलं ते वरिष्ठांना कळवलं आहे, त्यांच्याकडून भेटायला बोलावलं जाईल. किती लोक फुटले याचा आकडा येईल. आमचा सगळ्या आमदारांवर विश्वास होता, पण ह्या लोकांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघात केला. आम्ही जी स्टेटर्जी केली, त्याला देखील हे लोक वागले नाहीत. त्यांना पक्षात स्थान नाही हीच कारवाई असेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिलाय. 

भाजपवर निशाणा - 

घोडाबाजरा करणारी लोक भाजपची आहेत, पण जनतेच्या दालनात हे आता उतरणार आहेत. आम्ही ह्या आधी सांगत होतो की हे लोक राज्याला लुटत आहेत, कर्जबाजरी केलं आहे. ह्या लोकांनी महागाई केली आणि जनता ह्या लोकांना माफ करणार नाही,  कॅगचा तसा रिपोर्ट आहे. भाजपच्या लोकांना निवडून दिलं, पण ह्या लोकांना कसा काळिमा लावला हे नागरिकांनी पाहिलेय.  भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैश्यावर बोलत आहेत, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. 

मागील 10 वर्षात भाजपा सरकारने मुंबई व महाराष्ट्राचे सर्वच बाबतीत खच्चीकरण केले आहे. मुंबईतील जागतिक वित्तीय केंद्रासह अनेक महत्वाच्या कंपन्यांची कार्यालये, प्रकल्प गुजरात व इतर राज्यात पळवले. महाराष्ट्रातून सर्वात जास्त कर दिल्लीला दिला जातो असे असतानाही राज्याला परतावा देताना भेदभाव केला जातो हे उघड असताना मुंबईला जागतिक आर्थिक केंद्र करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन फसवे वाटत असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेली फेकाफेकी आहे, असे पटोले म्हणाले.

पुढच्या आठवड्यात काँग्रेसची बैठक - 

19 जुलै 2024 रोजी काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. जागावाटपा संदर्भातली ही बैठक असली तरी विधानपरिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात होणार मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.  या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतून केसी  वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चन्नीथला  उपस्थित राहणार आहेत. विधान परिषदेत निवडणुकीत जे आमदारांनी पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलं आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याची इतर नेते मागणी करणार आहे. या मागणीनंतर तात्काळ कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. कार्यकारणीची बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा काही निवडक नेत्यांची बैठक होणार आहे, या बैठकीत स्ट्रॅटेजी आखली जाणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Embed widget