Nagpur District Assembly Constituency : नागपूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासातील मतदानाची आकडेवारी समोर; देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात सर्वाधिक मतदान!
Election 2024: सकाळी 9 वाजतापर्यंत नागपूरसह विदर्भात किती टक्के मतदान झाले ज्याची आकडेवारी समोर आली आहे. यात देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात काही प्रमाणात जास्त मतदान झाले आहे.
Nagpur District Vidhan Sabha Election 2024: संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीची(Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी आज रंगते आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज (बुधवारी) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विरोधी महाआघाडी महाविकास आघाडी (MVA) ला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी 6 वाजता ही निवडणुकीची सांगता होत मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद होणार आहे आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी नंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सकाळी 9 वाजतापर्यंत नागपूरसह विदर्भात किती टक्के मतदान झाले ज्याची आकडेवारी समोर आली आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात काही प्रमाणात जास्त मतदान झाले आहे. विशेष म्हणजे नागपुरातील एकूण 12 मतदारसंघातील नागपूर शहर आणि ग्रामीण मधील इतर मतदारसंघाच्या तुलनेत देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात ही काही प्रमाणात जास्त मतदान झाल्याचे चित्र आहे.
मतदान टक्केवारी,सकाळी 9 वाजेपर्यंत
नागपूर (सरासरी) - 6.86%
- हिंगणा - 5.32 %
- कामठी - 6.71
- काटोल - 5.20
- मध्य - 6.14
- पूर्व - 8.01
- उत्तर - 3.54
- दक्षिण - 8.40
- दक्षिण -पश्चिम - 8.92
- पश्चिम - 7.50
- रामटेक - 6.71
- सावनेर - 7.25
- उमरेड - 8.98
अमरावती जिल्ह्यातील सकाळी 9 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी
अचलपूर - 8.77%
अमरावती - 4.63%
बडनेरा - 6.32%
दर्यापूर - 4.70%
धामणगाव रेल्वे- 4.35%
मेळघाट - 6.20%
मोर्शी - 7.34%
तिवसा - 6.75%
जिल्ह्यातील 7 मतदार संघातील 9 वाजे पर्यंत झालेले मतदान टक्केवारी
आर्णी- 8.34
दिग्रस- 6.57
पुसद- 6.42
राळेगाव- 7.32
उमरखेड- 5.60
वणी- 9.00
यवतमाळ- 7.20
कोणकोणत्या कागदपत्रांसह मतदान करता येईल?
मतदान करण्यासाठी मतदान कार्ड हे प्रमुख कागदपत्र आहे. ज्या नागरिकांकडे हे कागदपत्र असेल, त्यांना मतदान करता येईल. मात्र हे कागदपत्र नसेल तर निवडणूक आयोगने मतदानासाठी इतरही काही कागदपत्रांना परवानगी दिली आहे. तुमच्याकडे एकूण 12 कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र असेल, तर तुम्हाला मतदान करता येईल. तुमच्याकडे मतदानकार्ड नसेल आणि तुमचे मतदार यादीत नाव असेल तर खालील कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही मतदान करू शकता.
1. पासपोर्ट
2. आधार कार्ड
3. पॅन कार्ड
4. ड्रायव्हिंग लायसन्स
5. मनरेगा कार्ड
6. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं आयडी कार्ड
7. फोटो असलेलं पेन्शन कार्ड
हेही वाचा :