एक्स्प्लोर
वायनाडवासियांनो, माझ्या भावाची काळजी घ्या, प्रियांकांची भावनिक साद
'माझा भाऊ, माझा सच्चा मित्र, आतापर्यंत माझ्या माहितीतला सर्वात शूर व्यक्ती, वायनाडवासियांनो त्याची काळजी घ्या. तो तुम्हाला निराश करणार नाही' अशा आशयाचं ट्वीट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.
नवी दिल्ली : वायनाडवासियांनो, माझ्या भावाची काळजी घ्या, अशी भावनिक साद काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांनी ट्विटरवरुन घातली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत वायनाडमधून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
'माझा भाऊ, माझा सच्चा मित्र, आतापर्यंत माझ्या माहितीतला सर्वात शूर व्यक्ती, वायनाडवासियांनो त्याची काळजी घ्या. तो तुम्हाला निराश करणार नाही' अशा आशयाचं ट्वीट प्रियांका गांधी यांनी केलं आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी पारंपरिक मतदारसंघ अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही लढण्याचा निर्णय घेतला आहे. आजी इंदिरा गांधींप्रमाणे राहुल गांधींनी दक्षिणेतून दुसरा मतदारसंघ निवडला आहे. वायनाडमध्ये एनडीएचे उमेदवार तुषार वेल्लापल्ली यांच्यासोबत राहुल गांधींची मुख्य लढत असेल. तुषार वेल्लापल्ली हे भारत धर्म जन सेनेचे (बीडीजेएस) अध्यक्ष आहेत. केरळमध्ये भाजप आणि बीडीजेएस यांची आघाडी आहे. तुषार वेल्लापल्ली यांच्या नावाची घोषणा भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. तुषार वेल्लापल्ली यांनी काल वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अमेठीमध्ये राहुल गांधींचा सामना भाजप नेत्या स्मृती इराणींसोबत होणार आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही स्मृती इराणी अमेठीत राहुल गांधी यांच्याविरोधात मैदानात उतरल्या होत्या, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. रोडशो दरम्यान राहुल गांधींची माणुसकी वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींचा रोड शो सुरु होता. त्यांच्या या रोड शोला प्रचंड गर्दी होती. या रोड शोचं रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकारांच्या ट्रकवरील बॅरिकेट तुटलं आणि काही पत्रकार जखमी झाले. ही बाब प्रियांका गांधींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राहुल गांधींना याबाबत सांगितलं. राहुल गांधींनी तातडीने आपला ताफा थांबवला आणि पत्रकारांपर्यंत पोहचून त्यांची विचारपूस केली. यानंतर पत्रकारांना आधार देत राहुल गांधींनी स्वत: रुग्णवाहिकेपर्यंत नेलं आणि मग ते आपल्या गाडीत जाऊन बसले. राहुल गांधींनी एखाद्याला मदत करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही त्यांनी अनेक जखमींना मदत केली होती.My brother, my truest friend, and by far the most courageous man I know. Take care of him Wayanad, he wont let you down. pic.twitter.com/80CxHlP24T
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 4, 2019
संबंधित बातम्या :
राहुल गांधी यांचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल
वायनाडमधील रोड शोमध्ये अपघात, राहुल गांधींचा जखमी पत्रकारांना मदतीचा हात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement