एक्स्प्लोर

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ : नाथाभाऊंना तिकीट मिळणार का?

मुक्ताईनगर हा फडणवीस मंत्रिमंडळातील एकेकाळचे सर्वात ज्येष्ठ मंत्री असलेल्या नाथाभाऊंचा मतदारसंघ. नाथाभाऊ म्हणजे एकनाथ खडसे फक्त मुक्ताईनगरचेच नाही तर पूर्ण खानदेशचे नेते होते. खानदेशात त्यांनी भाजप रुजवली. आता मात्र फासे पलटलेत. त्यांनाच भाजप तिकीट देईल की नाही याची चर्चा मुक्ताईनगरसह जळगाव जिल्ह्यात रंगलीय.

जिल्ह्यातील सर्वाधिक लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणून यावर्षी मुक्ताईनगरकडे पाहिले जात आहे. कारण गेली ४० वर्षे एकनिष्ठेनं भारतीय जनता पक्षाचे सेवेकरी राहिलेले आणि कायम निवडून येत असलेले आमदार एकनाथराव खडसे यांचा हा मतदारसंघ आहे. सध्या एकनाथराव खडसेंना पक्षाने चारही बाजूने कोंडीत पकडत त्यांना मंत्रीमंडळातून दूर केलं आहे. विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांनी सभागृह दणाणून सोडले होते असा करारी आवाज आज स्वपक्षानेच दडपला आहे. स्वत: आमदार एकनाथ खडसे यांनी अनेकदा जाहीर भाषणात याबाबत सूचक वक्तव्य केलंय. नुकतंच शेवटचं विधानसभा अधिवेशन पार पडलं त्यावेळी देखील त्यांनी नालायक आणि भ्रष्ट आमदार म्हणून येथून जायचे नाही, असं म्हणत भावनांना वाट करून दिली होती. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ : नाथाभाऊंना तिकीट मिळणार का? सत्ताधारी गटाकडून नाथाभाऊ खडसेना तिकीट मिळणार की नाही अशा अफवा उठवल्या गेल्याची आहेत.  जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात ज्यांचा वाटा राहिला आहे, अशांपैकी एक महत्वाची व्यक्ती एकनाथ खडसे यांची ओळख आहे. आमदार  खडसेंवर लावण्यात आलेले आरोप, त्यांच्यावरील चौकश्या समित्या या सर्व चक्रव्यूहातून त्यांची सुटका झाली असली तरीही भाजपमधील त्यांना विरोध करणारा गट अजूनही शांत बसलेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत २०१४ साली भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली. एकनाथराव खडसेंविरुद्ध शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील अशी लढत झाली होती. सुमारे १० हजार मतांच्या फरकाने एकनाथ खडसे विजयी झाले.  पाचवेळा निवडून आलेल्या खडसेंना चंद्रकांत पाटील यांनी कडवी झुंज दिली होती. तब्बल एक दशकापासूनची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती या निवडणुकीत उघड झाली. याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार असले तरी भाजप-शिवसेनेपुढे ते पूर्ण नापास होतात हा इतिहास आहे. भाजपा शिवसेना युती झाली तर मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तिकीट मिळणे अवघड होणार आहे. त्यांना अपक्ष लढणं किवा युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणं एवढेच पर्याय त्यांच्यापुढे असतील. असं झालं तर यंदा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळेल यात काही शंका नाही. पक्षांतर्गत कारवाया आणि गिरीश महाजनांच्या नेतृत्वाचा उदय झाल्याने खडसे पक्षात मागे पडले आहेत. यावेळी स्वतःची उमेदवारी मिळवणंदेखील नाथाभाऊंसाठी मोठं आव्हान असल्याचं पक्षात बोललं जात आहे. खडसे यांनी स्वत: लढण्याची तयारी दाखवल्यास जागा शिवसेनेला सोडण्याची खेळी देखील भाजपा करण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास खडसेंना थांबविण्यासाठी भाजपकडूनच शिवसेनेला रसद पुरविली जाऊ शकते अशीही एक चर्चा आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचीही चांगली ताकद आहे. या मतदारसंघातही गिरीश महाजन यांची भूमिका महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. एकनाथराव खडसे यांना अथवा त्यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी जर दिली गेली नाही तर खडसे काय भूमिका घेतात, त्यातून भाजपला नुकसान किंवा फायदा काय होईल हे चित्र नक्कीच पाहण्यासारखे राहील. मुक्ताईनगर मतदारसंघ लेवा पाटीदार बहुल समाज आहे. मात्र मराठा आणि कोळी समाजाचेही तेवढंच प्राबल्य आहे. त्यामुळे एकनाथराव खडसेंना स्वपक्षातील नेते, कार्यकर्ते कितपत मदत करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यंदा एकनाथराव खडसेंसह त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे, माजी जिप अध्यक्ष अशोक कांडेलकर हे भाजपाकडून इच्छुक असल्याचं चित्र असून शिवसेनेकडून चंद्रकात पाटील यांच्याशिवाय अजूनतरी कोणी इच्छुक नाही. कॉंग्रेसचे जगदीश पाटील, एसए भोई, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अॅड.रविंद्र पाटील, विनोद तराळ, वंचित बहुजन आघाडीकडून नितीन कांडेलकर, संतोष बोदडे यांची नावे चर्चेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Supriya Sule PC : दम देतात तर राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर दादांनी द्यावं : सुप्रिया सुळेSupriya Sule Pune : पुण्यातच नाही तर इतर ठिकाणीही पाणी प्रदूषणाचा प्रश्न : सुप्रिया सुळेAjit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने येणार, वेळ अन् ठिकाण सुद्धा ठरलं! भाजप-शिवसेना अन् काँग्रेसचे आमदार भिडण्याची शक्यता
Beed News : बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
बीडमध्ये DPDC बैठकीवेळी धनंजय मुंडेंच्या भावाला पोलिसांनी गेटवरच रोखलं; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नेमकं काय घडलं?
Beed Ajit Pawar: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
बीड डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांच्या बाजूला कोण बसलं, धनंजय मुंडेंना कुठे बसवलं?
Param 8000 is India First Supercomputer : आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
आता अमेरिकेच्या एआयला चीनचे चॅलेंज, पण तेव्हा अमेरिकेनं भारताला ठेंगा दाखवताच राजीव गांधी जिद्दीला पेटले; देशाच्या पहिल्या सुपर काॅम्प्युटरची 'परम' कहाणी!
Ladki Bahin Yojana : ...ज्या महिलांना योजनेचा लाभ गेलाय, त्या कुणाच्याही खात्यातून पैसे घेणार नाही,आदिती तटकरेंनी संभ्रम दूर केला
30 लाख अपात्र लाभार्थ्यांचा आकडा ना मुख्यमंत्री, ना उपमुख्यमंत्री अन् माझ्याकडे, आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या?
Sanjay Raut : ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
ते तर आमचे मित्र...; उद्धव ठाकरे अन् चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर राऊतांचा सूर बदलला!
Supriya Sule : अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
अजितदादा बीडमध्ये असतानाच सुप्रिया सुळे आक्रमक; संतोष देशमुख प्रकरणावरून थेट दिल्लीत अमित शाहांच्या दरबारी धडकणार; म्हणाल्या...
Donald Trump : मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, जगात चर्चा रंगली, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
मामला तब्बल 432 कोटींचा! डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कंडोम वाटपाचा निधी रोखला, थेट एलाॅन मस्क चौकशी करणार, प्रकरण नेमकं काय?
Embed widget