एक्स्प्लोर
अंबानींचं तळ्यात मळ्यात, नरेंद्र मोदींच्या सभेला मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकायला आणि देशाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, अशी एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया सभेला उपस्थित अनंत अंबानी यांनी 'एबीपी माझा'ला दिली.
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक अंबानी कुटुंब यांचा पाठिंबा काँग्रेसला आहे की भाजपला, असा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांनी काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरांची पाठराखण केली असताना आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला अंबानींचे पुत्र अनंत अंबानी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकायला आणि देशाला पाठिंबा देण्यासाठी आलो आहे, अशी एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया सभेला उपस्थित अनंत अंबानी यांनी 'एबीपी माझा'ला दिली.
मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. मिलिंद देवरा हे मुकेश अंबानी यांच्या जिओ या टेलिकॉम नेटवर्कच्या कॅम्पेनशी संबंधित होते.
"दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा योग्य व्यक्ती आहेत. मिलिंद यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीची सखोल माहिती आहे." असं मुकेश अंबानी म्हणाले आहेत. देशाच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती एखाद्या उमेदवाराचं खुलेपणाने समर्थन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
विशेष बाब म्हणजे मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी हे सातत्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निशाण्यावर आहेत.
मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्र्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. लातूरमधील सभेनंतर पु्न्हा एकदा उद्धव आणि मोदी एकाच व्यासपीठावर येत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement