MP Election Results 2023 : मध्यप्रदेशात भाजपला बहुमत! पहिल्या कलांमध्ये भाजप 133, काँग्रेस 93 जगांवर आघाडीवर
पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मध्यप्रदेशाच किंगमेकर होण्याचं काँग्रेसचे स्वप्न भंगलं आहे.
![MP Election Results 2023 : मध्यप्रदेशात भाजपला बहुमत! पहिल्या कलांमध्ये भाजप 133, काँग्रेस 93 जगांवर आघाडीवर MP Election Results 2023 BJP majority in Madhya Pradesh BJP leads on 133, Congress on 93 Seats initial leading MP Election Results 2023 : मध्यप्रदेशात भाजपला बहुमत! पहिल्या कलांमध्ये भाजप 133, काँग्रेस 93 जगांवर आघाडीवर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/01/af1b2a304060e83ebb066b500cc358a11701428467503490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MP Election 2023: मध्यप्रदेशात (MP Election 2023) विधानसभेच्या 230 जागांसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. पहिल्या कलामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने पहिल्या कलात 133 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने अवघ्या 93 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतरांनी दोन जागांवर आघाडी घेतली आहे. पहिल्या कलांमध्ये भाजपने बहुमतासाठीचा आकडा पार केल्याने मध्यप्रदेशाच किंगमेकर होण्याचं काँग्रेसचे स्वप्न भंगलं आहे.
राज्यात बहुमतासाठी 116 जागा आवश्यक आहे. पहिल्या कलात भाजपने 133 जागांवर आघाडी घेऊन बहुमताचा आकडा पार केला आहे. तर काँग्रेस 93 जागांवर आघाडीवर आहे. इतरांनी दोन जागांवर आघाडी घेतली आहे. कल हाती येताच मध्यप्रदेशात भाजप 125 ते 150 जागा जिंकेल असा विश्वास मध्य प्रदेशातले मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी व्यक्त केला आहे.
सुरूवातीच्या कलानुसार भाजप आघाडीवर
राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. यांपैकी मध्य प्रदेशात काँग्रेसची हवा असल्याचं सांगितलं जात होतं. पण निकाल भलताच लागू शकतो. कारण भाजप आणि काँग्रेसमध्ये इथं काँटे की टक्कर होण्याचा अंदाज एक्झिट पोल्सनं वर्तवला होता. त्यानुसार सकाळी 9 - 9.30 च्या सुमारास आलेल्या कलानुसार भाजप आघाडीवर आहे. भाजपसाठी हा मोठा दिलासा आहे.
मध्यप्रदेशात ऑपरेशन लोटसचा यशस्वी प्रयोग करत 2018 साली गेलेली सत्ता पुन्हा मिळवत भाजपनं पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री केलं. मात्र, या निवडणुकीत भाजपला केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेसाठी उतरवण्याची वेळ आली. प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणाऱ्या भाजपनं पहिल्यांदाच कोणत्याही नावाची घोषणा नाही.तर काँग्रेसने मध्य प्रदेशातली निवडणूक ज्येष्ठ नेते कमलनाथ सेंट्रिक केली. कमलनाथ यांनी सॉफ्ट हिंदुत्ववादी भूमिका घेत, शिवराज यांच्या नीतींचा विरोध केला. त्यातच राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा मुद्दा प्रचारात आणत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं. ऑपरेशन लोटस, आदिवासींचे हक्क आणि शिवराज यांच्या विरोधातील नाराजी.. याच मुद्दांना प्रचारात केंद्रस्थानी आणत काँग्रेसनं सत्तेसाठी मोठी दावेदारी उभी केली.
2018 च्या निवडणुकांमध्ये जनतेचा कौल कुणाला?
मध्यप्रदेशात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत निवडणूक निकाल स्पष्ट झालेले नव्हते. राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार? याचं चित्र अगदी उशीरापर्यंतही अस्पष्ट होतं. अंतिम निकाल हाती आला, गेल्या निवडणुकीत भाजप मतांच्या संख्येत तर काँग्रेस जागांच्या बाबतीत पुढे होती. त्यावेळी मध्य प्रदेशात 75.2 टक्के मतदान झालं होतं. त्यापैकी भाजपला 41.6 टक्के मतं मिळाली होती, तर 230 पैकी 109 जागा जिंकल्या होत्या.
हे ही वाचा :
मध्यप्रदेशात काँग्रेस अलर्ट मोडवर; 'विजयी उमेदवारांनी भोपाळला या' , कमलनाथ यांचे आदेश, रिसॉर्ट पॉलिटिक्स पुन्हा चर्चा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)