Miraj : भाजपचे सुरेश खाडे चौकार मारणार की महायुतीचे तानाजी सातपुते मैदान जिंकणार? मिरजच्या लढतीचं चित्र काय?
Miraj Assembly Constituency Election :
सांगली : जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मिरज मतदारसंघात यंदा चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. मिरजमधून भाजपकडून यंदा चौथ्यांदा सुरेश खाडे मैदानात असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे तानाजी सातपुते यांचं आव्हान आहे.
सुरेश खाडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असून ते मंत्री असले तरी मिरज सोडून इतर मतदारसंघात राजकीय हस्तक्षेप करत नाहीत. त्यामुळे इतर पक्षांच्या बड्या नेत्यांकडून मिरजमध्येही हस्तक्षेप होत नाही. नेमक्या याच गोष्टीचा फायदा हा सुरेश खाडे यांना होतो. यावेळी तो फायदा खाडे यांना होतो की तानाजी सातपुते यांना होतो ते पाहावं लागेल.
या आधी जत मतदारसंघ हा राखीव होता. 2004 साली सुरेश खाडे हे जतमधून निवडून आले होते. त्यानंतर 2009 साली मिरज हा मतदारसंघ राखीव झाला. सुरेश खाडे 2009 पासून त्या ठिकाणी तीन वेळा निवडून आले. आता सुरेश खाडे विजयाचा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत.
सुरेश खाडे यांच्या विजयाचा वारू रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाने तानाजी सातपुते यांना उमेदवारी दिली. तानाजी सातपुते यांना राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते किती मदत करतात त्यावर त्यांचे यश अवलंबून असेल.
लोकसभेच्या निवडणुकीला अपक्ष असलेल्या विशाल पाटील यांना मिरजमधून 24 हजारांचे मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी यंदा पोषक वातावरण असल्याचं चित्र आहे.
2019 सालचा निकाल काय?
- सुरेश खाडे (भाजप) - 96,369
- बाळासाहेब होनमारे (स्वाभिमानी शेतकरी संघटना) - 65,971
ही बातमी वाचा: