एक्स्प्लोर

Marathwada MLA List : मराठवाड्यात कोणाचं वर्चस्व? कोणत्या पक्षाचे किती आमदार? सविस्तर माहिती एका क्लिकवर

Marathwada MLA List Vidhansabha Election : मराठवाड्यात नेमकं कोणाचं वर्चस्व आहे? कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? याबाबतची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.  

Marathwada MLA List Vidhansabha Election News : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी संपली आहे. यानंतर आता राज्यात पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काही नेत्यांनी तर विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीनं दौरे सुरु केले आहेत. राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)  यांची सत्ता आहे. मात्र, या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार हा येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, मराठवाड्यात नेमकं कोणाचं वर्चस्व आहे? कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला सत्ता मिळाली होती. मात्र, निकालानंतर राजकीय समीकरणं बदलली होती. राज्यात शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीचं सरकार स्थापनं केलं होतं. त्यानंतर अडीच वर्षांनी पुन्हा शिवसेनेत फूट पडली आणि राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं. यामध्ये एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर काही काळातच अजित पवार यांनी देखील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. ते देखील उपमुख्यमंत्री झाले. 

मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे

दरम्यान, पुढच्या काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार? याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे, लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. 45 प्लसचा नारा देणाऱ्या महायुतीच्या वाट्याला राज्यात फक्त 17 जागा आल्या होत्या. तर महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या होत्या. तर अपक्षाने एका जागेवर विजय मिळवला होता. आता विधानसभा निवडणुकीत नेमकं काय चित्र असणार हा येणार काळच ठरवेल. पण सध्या मराठवाड्यात महायुतीचं वर्चस्व असल्याचं पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मनाबाद, लातूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. 

मराठवाड्यात कोणत्या पक्षाचे किती आमदार?

औरंगाबाद/ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आमदार : 09  (Chhatrapati Sambhaji Nagar MLA List)

1) सिल्लोड विधानसभा -  अब्दुल सत्तार (शिवसेना - एकनाथ शिंदे)
2) कन्नड विधानसभा -  उदयसिंग राजपूत (शिवसेना- उद्धव ठाकरे)
3) फुलंब्री विधानसभा -  हरिभाऊ बागडे (भाजप)
4) औरंगाबाद मध्य विधानसभा -  प्रदीप जयस्वाल (शिवसेना - एकनाथ शिंदे)
5) औरंगाबाद पश्चिम विधानसभा -  संजय शिरसाठ (शिवसेना - एकनाथ शिंदे)
6) औरंगाबाद पूर्व विधानसभा -  अतुल सावे (भाजप)
7) पैठण विधानसभा -  संदीपान भुमरे (शिवसेना - एकनाथ शिंदे) - सध्या खासदार
8) गंगापूर विधानसभा -  प्रशांत बंब (भाजप)
9) वैजापूर विधानसभा -  रमेश बोरनारे (शिवसेना - एकनाथ शिंदे)

बीड जिल्ह्यातील आमदार : 06  (Beed MLA List) 

1) गेवराई विधानसभा -  लक्ष्मण पवार (भाजप)
2) माजलगाव विधानसभा -  प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी - अजित पवार)
3) बीड विधानसभा -  संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी - शरद पवार)
4) आष्टी विधानसभा -  बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी - अजित पवार)
5) केज विधानसभा -  नमिता मुंदडा (भाजप)
6) परळी विधानसभा -  धनंजय मुंडे (राष्ट्रवादी - अजित पवार)

लातूर जिल्ह्यातील आमदार  : 06 (Latur MLA List) 

1) लातूर ग्रामीण विधानसभा -  धीरज देशमुख (काँग्रेस)
2) लातूर शहर विधानसभा -  अमित देशमुख (काँग्रेस)
3) अहमदपूर विधानसभा -  बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी - अजित पवार)
4) उदगीर विधानसभा -  संजय बनसोडे (राष्ट्रवादी - अजित पवार)
5) निलंगा विधानसभा -  संभाजी पाटील निलंगेकर (भाजप)
6) औसा विधानसभा -  अभिमन्यू पवार (भाजप)

उस्मानाबाद / धाराशिव जिल्ह्यातील आमदार : 04  (Dharashiv MLA List)

1) उमरगा विधानसभा -  ज्ञानराज चौगुले (शिवसेना - एकनाथ शिंदे)
2) तुळजापूर विधानसभा -  राणा जगजितसिंह पाटील (भाजप)
3) उस्मानाबाद विधानसभा -  कैलास पाटील (शिवसेना- उद्धव ठाकरे)
4) परांडा विधानसभा -  तानाजी सावंत (शिवसेना - एकनाथ शिंदे)

जालना जिल्ह्यातील आमदार  : 05  (Jalna MLA List)

1) परतूर विधानसभा -  बबन लोणीकर (भाजप)
2) घनसावंगी विधानसभा -  राजेश टोपे (राष्ट्रवादी - शरद पवार)
3) जालना विधानसभा -  कैलास गोरंटियाल (काँग्रेस)
4) बदनापूर विधानसभा -  नारायण कुचे (भाजप)
5) भोकरदन विधानसभा -  संतोष दानवे (भाजप)

नांदेड जिल्ह्यातील आमदार: 09  (Nanded MLA List)

1) किनवट विधानसभा - भीमराव केरम (भाजप)
2) हदगाव विधानसभा - माधवराव पाटील जवळकर (काँग्रेस)
3) भोकर विधानसभा - अशोक चव्हाण (काँग्रेस)
4) नांदेड विधानसभा - उत्तर बालाजी कल्याणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
5) नांदेड विधानसभा - दक्षिण मोहन हंबर्डे (काँग्रेस)
6) लोहा विधानसभा - श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)
7) नायगाव विधानसभा - राजेश पवार (भाजप)
8) देगलूर विधानसभा -  जितेश अंतापूरकर (काँग्रेस)
9) मुखेड विधानसभा - तुषार राठोड (भाजप)

हिंगोली जिल्ह्यातील आमदार : 03 (Hingoli MLA List)

1) वसमत विधानसभा - चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी - अजित पवार)
2) कळमनुरी विधानसभा - संतोष बांगर (शिवसेना - एकनाथ शिंदे)
3) हिंगोली विधानसभा - तानाजी मुटकुळे (भाजप)

परभणी जिल्ह्यातील आमदार : 04  (Parbhani MLA List)

1) जिंतूर विधानसभा - मेघना बोर्डीकर (भाजप)
2) परभणी विधानसभा - राहुल पाटील (शिवसेना - उद्धव ठाकरे)
3) गंगाखेड विधानसभा - रत्नाकर गुट्टे (रासप)
4) पाथरी विधानसभा -  सुरेश वर्पूरडकर (काँग्रेस)

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!

व्हिडीओ

Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Nagpur Mahapalika Husban Wife : पतीची बंडखोरी, पत्नी गेली माहेरी; राजकारणातला रुसवा.. कुटुंबात रुसवाफुगवा! Special Report
Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ichalkaranji Municipal Corporation: इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
इचलकरंजीत भाजपकडून शिंदेसेनेचा टप्प्यात आणून कार्यक्रम? शिंदे गटाला सुटलेल्या जागांवरही भाजपने दिले एबी फॉर्म!
Cyber Fraud  : आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
आठ कोटींच्या फसवणुकीनंतर निवृत्त IPS अधिकाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्याकडे बोट
Devendra Fadnavis: भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
भाजप उद्या प्रचाराचा नारळ फोडणार; सीएम देवेंद्र फडणवीसांचा इचलकरंजीत रोड शो, रवींद्र चव्हाणांची कोल्हापुरात पदयात्रा
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास भीषण अपघात; ट्रॅव्हल्स आगीत भस्मसात, एकाचा मृत्यू, तर 31 प्रवासी थोडक्यात बचावले!
Mumbai Crime News: नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं, प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले; मुंबईतील धक्कदायक प्रकार
Nagpur Election 2026 : नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
नागपूरात भाजपकडून एका एबीफॉर्मवर दोन उमेदवारांची नावं; 6 उमेदवारांना फटका, अपक्ष ठरलेले अर्ज मागे घेणार?
Public Angrey On Shah Rukh Khan: 'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
'शाहरुख खानची जीभ छाटणाऱ्याला 1 लाखांचं रोख बक्षीस...'; किंग खानविरोधात देशात संतापाची लाट, नेमकं त्यानं केलंय काय?
Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Embed widget